‘हार्पर्स बझार’ या फॅशन-क्षेत्रात जागतिक आघाडी मिळवणाऱ्या नियतकालिकाशी सुतराम् संबंध नसलेले ‘हार्पर्स’ हे वैचारिक अमेरिकी नियतकालिक. त्याच्या संपादकपदी १९७६ मध्ये लुइस लॅपम (स्पेलिंग मात्र ‘लेविस लॅपहॅम’सारखे) आले आणि मधल्या उण्यापुऱ्या वर्षभराचा अपवाद वगळता २००७ पर्यंत ‘हार्पर्स’चे संपादकपद त्यांनी सांभाळले. या तीन दशकांत ‘न्यू यॉर्कर’, ‘अॅटलांटिक’ या अमेरिकी नियतकालिकांपेक्षा ‘हार्पर्स’ची निराळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यामुळेच, २३ जुलै रोजी रोममध्ये झालेल्या त्यांच्या निधनानंतर न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट आदींनी आदरांजली-लेख प्रकाशित केले. जगभर विखुरलेले ‘हार्पर्स’चे एकेकाळचे वाचकही ‘सडेतोडपणाचे धडे देणारा संपादक गेला’ म्हणून हळहळले. भारतीयांसाठी लॅपम यांची आणखी एक ओळख म्हणजे : ‘बीटल्स’ या गाजलेल्या बॅण्डचे भारताशी काय गूळपीठ आहे, हे शोधण्यासाठी महेश योगींच्या केवळ अमेरिकेतील आश्रमात घिरट्या न घालता, भारतात येऊन त्या वेळच्या ‘अध्यात्म/ शांती/ व्यक्तिवाद/ व्यसन’ लाटेची इत्थंभूत दखल घेणारे वार्तांकन त्यांनी केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा