‘तडे जाऊ लागले..’ हा अग्रलेख (१३ जून) वाचला. मविआ आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार घालविणे या एककलमी कार्यक्रमात पुढे काय वाढून ठेवले याची सुतराम कल्पना, देवेंद्र फडणवीस आणि राज्य भाजपला नसेल. केंद्राने सत्तांतरात शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवून, देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा इशारा दिला इथेच बलाढय़ राज्य भाजप २५ वर्षे मागे गेला. गेल्या वर्षभरात शिंदे आणि ठाकरे गटांचे न्यायालयीन निकाल, जनतेचा किरकोळ विरोध, उद्धव ठाकरे गटाचे थंडावलेले राजकारण याचा फायदा शिंदे गट अधिकच घेत आहे. त्यात भाजपचा कसबा आणि कर्नाटक निवडणुकीतील झालेला पराभव शिंदे गटाच्या पथ्यावरच पडला आहे. आजच्याच अंकातील मुखपृष्ठावरील जाहिरातीत हे दिसून आले. ‘टक्केवारीत शिंदेच सरस’ दाखवून, त्यांनी भाजपची पुरती जिरवली आहे. म्हणजे आयजीच्या जिवावर बायजी एवढा उदार झाला की राज्य भाजपला माविआ पाच वर्षे सत्तेत राहिलेले परवडले असते. या मुखपृष्ठ जाहिरातीने तडे तर जातीलच पण दरीसुद्धा रुंदावेल, निवडणुकीपर्यंत फूट पडल्यास आश्चर्य वाटायला नको, एवढी अवस्था बिकट दिसते. एकंदरीत राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपची अवस्था प्रादेशिक पक्षापेक्षा कठीण झालेली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र हातचा जायला वेळ लागणार नाही, हे नक्की. -विजयकुमार वाणी, पनवेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दोन्हीकडील काही मंत्र्यांना नारळ द्यावा

‘तडे जाऊ लागले..’ हे संपादकीय वाचले. खरे तर तडे आधीच गेले होते, आता ते किती मोठे होतात किंवा शिंदे-फडणवीस ते बुजवण्याचा प्रयत्न करतात का हे पाहणे महत्त्वाचे. खरे तर मंत्रिमंडळ स्थापन करताना शिंदे गटातील काही आमदारांना बाहेर ठेवण्याबाबत भाजपने शिंदे यांच्यावर त्याच वेळी दबाव आणायला हवा होता. औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे बाळासाहेब ठाकरे यांचे कुठले हिंदूुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी शिंदे गटात सामील झाले, हे त्यांनाच माहीत. दुसरे विदर्भातील संजय राठोड यांच्यावरील आरोप एवढे गंभीर होते की यांना खरे तर शिंदे गटात घ्यायलाच नको होते. इतरही अनेक जण वादग्रस्त विधाने करत असतात.
या मंडळींना नारळ जरी दिला तरी त्यांना परत स्वगृही जाणे सोपे नाही. एकदा गद्दार म्हणून ज्यांना हिणवले, खोके घेतल्याचे आरोप केले त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाणे कठीण. युती, आघाडीत स्थानिक स्तरावर कुरबुरी सुरूच राहतात. तशा त्या शिवसेना-भाजप युतीमध्ये असत. पण वरिष्ठ नेते त्या वेळीच सावरून घेत. खरे तर भाजपमधीलही काही मंत्र्यांना नारळ द्यावयास हवा. कारण वादग्रस्त विधाने करणारे तिथेही आहेत. उदाहरणार्थ चंद्रकांत पाटील! वादग्रस्त मंत्र्यांना वेळीच नारळ देऊन शिंदे- फडणवीस यांनी तडे सांधणे आवश्यक आहे. –डॉ. संजय पालीमकर, दहिसर (मुंबई)

..पण तुम्ही जनतेच्या पाठीशी आहात का?

शिवसेना (शिंदे) पक्षाने बहुतेक वृत्तपत्रांतून ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ ही पानभर जाहिरात मुखपृष्ठावर दिली आहे. त्यात जनतेचे अफाट प्रेम मिळत असल्याची आकडेवारी झळकली आहे. त्यात तथ्य असेलही. परंतु केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या मागे उभे असल्याचे चित्र निदान शहरांत तरी दिसत नाही. स्वयंपाकाच्या गॅस सििलडरचा भाव गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून ११०० रुपयांच्या वर गेला आहे. शेतकऱ्यांच्या मालखरेदीसाठी दलाल (ज्यापैकी बहुतेक राजकीय आहेत) अडवणूक करतात. त्यांना हमीभाव मिळत नाही, त्यामुळे त्यांना दूध, भाजी रस्त्यावर टाकून द्यावी लागते. लघुउद्योजकांना सरकार किती सवलती देते? एकीकडे लोकप्रतिनिधींना निवृत्तिवेतन मिळते आणि छोटय़ा उद्योजकांना मात्र ठेंगा दाखविला जातो. बँका त्यांना कर्ज देण्यास खळखळ करतात. हे सर्व सरकार महोदयांना दिसत नाही का? –सुधीर ब. देशपांडे, विलेपार्ले (मुंबई.)

नव्याचे नऊ दिवस?

‘तडे जाऊ लागले..’ हा अग्रलेख (१३ जून) वाचला. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपसह त्यांचे समर्थक उदाहरणार्थ- कंगना राणौत, गुणरत्न सदावर्ते यांच्यासारखी ज्यांचा सत्तेशी सुतराम संबंध नाही अशी मंडळीही हे सरकार पडावे म्हणून प्रयत्न करू लागली होती. त्यांची ही तपश्चर्या ज्यांनी फळास आणली त्यांच्याविषयी फडणवीस किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काहीच माहीत नसणे शक्य नाही. त्यामुळेच हे सरकार म्हणजे नव्याचे नऊ दिवस होते. –सुनील समडोळीकर, कोल्हापूर</strong>

‘विनोद विशेषांका’कडून निराशा

‘लोकसत्ता’चे (१३ जून) मुखपृष्ठ पाहताच वाटले की आजचे वृत्तपत्र हा ‘विनोद विशेषांक’ असावा. पण ‘उलटा चष्मा’मधील व्यंग सोडल्यास इतर कुठेही विनोद आढळला नाही. हिरमोड झाला. बारीक अक्षरातली नोंद पाहिल्यावर तो विनोद ही प्रायोजित निघाला. -नरेंद्र दाभाडे, चोपडा

किनाऱ्यावर जीवरक्षक का नव्हते?

‘जुहूतील समुद्रात चार मुले बेपत्ता’ ही बातमी (लोकसत्ता- १३ जून) वाचली. अरबी समुद्रात चक्रीवादळ सुरू असल्याने समुद्र खवळलेला असणार हे माहीत असूनही समुद्र किनारी जाणे चुकीचेच आहे, पण मुलांना हटकायला जीवरक्षक किंवा अन्य कुणीही त्या किनाऱ्यावर नसणे हेही खटकणारे आहे. अलीकडे दरवर्षी एक तरी चक्रीवादळ येतेच, त्यामुळे या काळात समुद्रकिनारी जाऊ नये हे सर्वाना चांगलेच ठाऊक आहे. असे असताना ही पाच मुले जुहूला गेली, ती समुद्रात वाहून गेली हे स्थानिकांनी बघितल्यामुळे एकाचा तरी जीव वाचला नाहीतर ही मुले घरी आली नाहीत म्हणून पालक पोलिसांकडे गेल्यानंतरच काय झाले हे कळले असते. असा धोका पत्करणे जिवावर बेतू शकते हे तरुणांच्या कधी लक्षात येणार? -माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

डिजिटल आरोग्य देशभर तरी पोहोचले का?

‘सर्वासाठी आरोग्याचे डिजिटल विश्वरूप’ हा ‘पहिली बाजू’ सदरातील लेख (१३ जून) वाचला. यात कोविड- १९ साथीदरम्यान सरकारने लसीकरण आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी विकसित करून घेतलेल्या ॲप्सची माहिती आणि महत्त्व विशद करण्यात आले आहे, मात्र ज्यांना संगणक वा स्मार्टफोन वापरता येत नाही, जे खेडेगावात राहतात, त्यांना या ॲपचा कितपत लाभ झाला, असा प्रश्न पडतो. शहरांतील रहिवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला, मात्र बहुसंख्य ग्रमीण रहिवासी या सुविधेपासून वंचितच राहिले असण्याची शक्यता आहे. –उदयराज चंदन चव्हाण, नांदेड

तेव्हा समाजात आजच्याएवढी तेढ नसावी

गेल्या आठवडय़ात कोल्हापूर शहरात उसळलेल्या दंगलीचा विचार करता इतिहासाचा ऊहापोह करणे गरजेचे वाटते. एक दिल्लीचा बादशहा आणि दुसरा म्हैसूरचा राजा. दोन्हीही मुस्लीम. क्रियेच्या विरुद्ध प्रतिक्रिया नक्कीच अपेक्षित असते. दोन्ही बाजूंनी इतिहासाचा शोध घेतला असता तर नक्कीच दंगल, कटुता व उसवलेली सामाजिक वीण नक्कीच सावरता आली असती. उत्तर भारताने औरंगजेबाचा जुलूम सोसला होता तर दक्षिण भारत जिंकण्याच्या त्याच्या अट्टहासामुळे युद्धाच्या झळा मराठी जनतेला सोसाव्या लागल्या होत्या. एकविसाव्या शतकात काही व्यक्तींनी त्याचे छायाचित्र व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले, म्हणून संपूर्ण समाजाला वेठीस धरणे कितपत योग्य आहे?
सध्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची तयारी सुरू असल्याचे दिसते. त्यासाठीसुद्धा ज्ञात इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. टिपू सुलतानाचा पाडाव करण्यासाठी इंग्रज, निजाम आणि पेशवे एकत्र लढले. परिणामी निजामशाही व ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती म्हैसूर राज्य गेले. जुन्या वोडीयार राजांना इंग्रज व निजामाची नामधारी राजा म्हणून मान्यता मिळाली. टिपू सुलतानाला वीरगती प्राप्त झाल्यानंतर (१७९९) ब्रिटिश लेखकाने त्याच्या शौर्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकावरून हरी नारायण आपटे यांनी ‘म्हैसूरचा वाघ’ ही कादंबरी लिहिली. स्वराज्यासाठी लढलेल्या टिळकांचे ते शिष्य होते. कदाचित त्या काळी समाजात आजच्याएवढी तेढ नसावी. दुसरे उदाहरण- यशवंत नरसिंह केळकर (केसरीचे संपादक न. चिं. केळकर यांचे चिरंजीव) यांनी १९३२साली ‘केसरी’मधील लेखात टिपू सुलतानाच्या कबरीविषयी लिहिले आहे- ‘कृष्णेवर येऊन पेशव्यांशी झुंजेन अशी महत्त्वाकांक्षा ज्याने धरली आणि जवळजवळ पूर्ण करून दाखवली अशा त्या प्रतापी पिता-पुत्राच्या कबरी पाहून ज्याला इतिहासाची यित्कचितही ओळख आहे त्याला ते मराठय़ांचे शत्रू असतानाही आदराने अभिवादनाचा करभार स्वेच्छेने द्यावासा वाटल्याशिवाय राहत नाही.’ कोल्हापूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा इतिहासाचा कानोसा! –गायत्री साळवणकर, कोल्हापूर