‘धर्म? नव्हे अर्थ!’ हा अग्रलेख वाचला (१० जानेवारी). ‘अर्थ नव्हे, त्या त्या वेळेचा स्वार्थ’ असे त्याचे पुढचे स्वरूप आहे असे तो लेख वाचून वाटते. नुकतीच ‘आयसी १८४’च्या अपहरणाला २६ वर्षे झाली. त्यावेळी तालिबानबद्दल देशभर उसळलेली संतापाची लाट, आज त्याच तालिबानींशी भारत चर्चा करतो आहे ही एक बाजू झाली. ज्या देशाचे विमान अपहरण करून, प्रवाशांना ओलीस ठेवून अतिरेकी सोडण्याची मागणी केली त्याच देशाकडून आज गरम कपडे, औषधे, लशी, गहू असे जिन्नस ‘मदत’ म्हणून स्वीकारले जात आहेत ही त्याची दुसरी बाजू. अमेरिकेत ९/११चा नरसंहार घडवून आणलेले व त्यांचे आश्रयदाते अशा देशांबरोबर अमेरिकेचे संबंधही आज उत्तम आहेत. तिआनमेन चौकात जे काही घडले त्यानंतरही अशीच संतापाची व निषेधाची लाट अनेक देशांत उसळली होती. आज चीनशी त्या सर्व देशांचा व्यापार व राजनैतिक संबंध व्यवस्थित आहेत. भा. रा. तांबे यांची ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ही कविता किती यथार्थ आहे याची जाणीव अशा प्रसंगांतून होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा