‘बजरंगाचा प्रकोप!’ हा अग्रलेख (१४ मे ) तसेच या निकालाचे इतर सदरांमधून केलेले सखोल विश्लेषण वाचले. दोन मुद्दे या व इतर राज्यांतील निवडणुकीतून प्रकर्षांने समोर येतात. पहिला मुद्दा – विधानसभा निवडणूक ही राज्यांची असल्याने ती स्थानिक नेतृत्वाखाली व त्यांच्याच चेहऱ्यांवर लढ्वली जायला हवी. कारण निवडणूक जिंकल्यानंतर त्या – त्या राज्यांतील नेतृत्वालाच राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवावे लागणार असतात. प्रत्येक वेळी मोदीजींचा चेहरा समोर ठेवून व स्थानिक नेतृत्वाला डावलून निवडणूक जिंकता येत नाही. हे आता हिमाचल व कर्नाटक राज्याने दाखवून दिले. दुसरा मुद्दा असा की निवडणुका त्या- त्या राज्यांतील प्रश्नांवर लढवल्या गेल्या पाहिजेत. टिपू सुलतानसारख्या मुद्दय़ांपेक्षा महागलेला  गॅस, पिण्याचे पाणी, रस्ते, युवकांना रोजगार, आर्थिक वृद्धी, तत्सम मुद्दय़ांवर प्रचाराचा भर हवा होता. मोदीजी, ओवेसी वगैरे धर्माच्या आधारे मते मागू लागले तर कोणत्याही निवडणुका धर्मनिरपेक्षरीत्या पार पडणार नाहीत. याबाबत खरे तर निवडणूक आयोगाने दखल घेणे गरजेचे होते, कारण हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरतो. परंतु तसे होणे नाही.

  • नवनाथ रुख्मनबाई डापके, लिहाखेडी (ता. सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर)

हे यश केंद्रीय नेतृत्वाचे नाही, ही नांदी नाही..

कर्नाटकातला विजय हे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे यश नसून तेथील स्थानिक नेतृत्वाने ज्या प्रकारे बांधणी केली आणि मेहनत घेतली त्याचे हे यश आहे. तसेच हा विजय म्हणजे केंद्रातल्या २०२४ मधल्या विरोधी पक्षांच्या विजयाची नांदी असे म्हणण्याचे कारण नाही. बजरंग बलीवरून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न असफल झाला; उलट इतर समाज घटकांचे त्यामुळे ध्रुवीकरण झाले.

Arvind Kejriwal latest marathi news
विश्लेषण: केजरीवाल यांच्या घोषणेने भाजपची अडचण? मुदतपूर्व निवडणुकीमागे आत्मविश्वास की जुगार?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
CM Siddaramaiah
CM Siddaramaiah : कर्नाटकात का होतेय मुख्यमंत्री बदलाची चर्चा? सिद्धरामय्यांशी निष्ठावान समजल्या जाणाऱ्या ‘या’ नेत्यांची CM पदासाठी चर्चा!
Ghodbunder, Citizens Ghodbunder protest,
घोडबंदरमधील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात ठिय्या
BJP Thackeray group thane,
ठाण्यात भाजप, ठाकरे गटाचा संयुक्त मोर्चा ? कोलशेतमध्ये स्थानिकांच्या रोजगारासाठी ग्रामस्थांनी काढला मोर्चा
bjp leader harshvardhan patil marathi news
हर्षवर्धन पाटील यांची महायुतीतील नेत्यांवर नाराजी, इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर ठाम; लवकरच निर्णय
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Ajit Pawar, Maratha reservation, Marathwada, NCP, Lok Sabha elections, Muslim community, Ramgiri Maharaj, protest, Vasmat, Ahmedpur, ncp
अजित पवार यांना मराठवाड्यात विरोध; मराठा, मुस्लीम समाजांच्या नाराजीचा फटका

कशाच्याही नावे मते मागणाऱ्यांना नकार

कर्नाटकातील भाजपचा दारुण पराभव हा त्यांच्या ‘मास्टर माइंड’चा आणि लोककेंद्री धोरणे आखण्याऐवजी सतत ‘इलेक्शन मोड’वर असणाऱ्या नेतृत्वाचा पराभव मानायला हवा. देशभर एकच पक्ष, एकच विचारधारा, एकच धर्म या विकृतीला कानडी जनतेने ठोकरून लावले. शहीद झालेल्या जवानांच्या नावाने, आत्महत्या केलेल्या नटाच्या नावाने, धर्माच्या नावाने, राममंदिरच्या नावे मते मागणारे पक्ष आणि लोकांच्या मनकी बात न ऐकणारे एकपात्री नेतृत्व यांना  वठणीवर आणणारा हा निकाल आहे.

  • प्रमोद तांबे, भांडुप (मुंबई)

डबल इंजिन प्रयोग अयशस्वी

उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज संस्थांमध्ये जरी भाजपला यश मिळाले असले तरी कर्नाटकमध्ये  त्यांचा दारुण पराभव झाला आहे. यावर भाजपने आत्मपरीक्षण करणे योग्य आहे. प्रत्येक राज्यात डबल इंजिनचा प्रयोग यशस्वी होत नाही हे मतदारांनी दाखवून दिले आहे. भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठा पणाला लावून, सर्व यंत्रणांचा पुरेपूर वापर करून आत्मविश्वासाने लढवली होती. एकाधिकार पद्धतीने सुरू असलेला भाजपचा राजकीय प्रवास, प्रादेशिक पक्षांना गृहीत धरून, तपास यंत्रणांबाबत होत असलेला पक्षपात, धार्मिक व धर्माध मुद्दे, तसेच ‘बजरंग बली की जय’ यासारख्या घोषणांनी सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? याउलट काँग्रेसने सर्वसामान्य जनतेशी निगडित प्रश्न/समस्या यांवर भर दिला. याचा केंद्रीय नेतृत्व व राज्यातील नेतृत्वाने विचार आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

  • पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली

राज्यघटनेने दिलेली ताकद

‘बजरंगाचा प्रकोप’ (१४ मे) हे संपादकीय वाचले.  लोकशाही राज्यात हुकूमशाहीप्रमाणे शासन करणाऱ्यांना अस्मान दाखवण्याची ताकद राज्यघटनेने जनतेला दिली आहे. सत्ताधाऱ्यांकडून देशातील मनमानी राज्यकारभारामुळे अनेक वेळा घटनेचा अनादर झाला आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, फोडाफोडीचे (‘प्लॅन बी’चे!) राजकारण, धार्मिक गोष्टींचा वापर, गैरमार्गाने सत्ता हस्तगत करणे अशा अनेक कारणांचे परिणाम इथून पुढे सत्ताधारी पक्षास पाहायला मिळतील.

  • आशुतोष वसंत राजमाने, बाभुळगाव (ता.पंढरपूर, जि. सोलापूर)

भारतीय लोकशाहीसाठी आशादायक

कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिले आहे की धार्मिक मुद्दे बाजूला ठेवून निव्वळ जनतेच्या दैनंदिन प्रश्नांवर निवडणुका मोठय़ा फरकाने जिंकता येतात. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार इत्यादी मुद्दे मतदारांनी उचलून धरले, ही भारतीय लोकशाहीसाठी आशादायक बातमी आहे. केवळ धार्मिक मुद्दे घेऊन, मतदारांची दिशाभूल करून ध्रुवीकरण करणाऱ्या पक्षांना कर्नाटक मतदारांनी दिलेली ही सणसणीत चपराक आहे.

  • सतीश शिवराम फडते, पर्वरी (गोवा)

अपप्रचाराने नेहमीच जिंकता येत नाही

‘हा निकाल का महत्त्वाचा?’ हा सुहास पळशीकर यांचा लेख (रविवार संपादकीय- १४ मे) वाचला. लोकशाहीमध्ये एकपक्षीय नेतृत्व काही कामाचेही नाही आणि शाश्वत तर नक्कीच म्हणता येणार नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा पक्षाला मीच शहाणा आणि माझाच विजय होणार असा अतिआत्मविश्वास निर्माण होतो. तेव्हा  त्या व्यक्तीला आणि पक्षाला चांगलीच किंमत चुकवावी लागते. हे या निकालाने दाखवून दिले आहे. अपप्रचाराने  निवडणूक नेहमीच जिंकता येत नाही, हेदेखील या निकालामुळे सिद्ध झाले.

  • शिल्पा सुर्वे, पुणे

नेत्यांनाही जाणीव होईल?

आता मतदारांना रोजच्या जगण्याशी संबधित प्रश्न महत्त्वाचे वाटतात हे कर्नाटक विधानसभा निकालातून दिसते. भेदभाव किंवा तेढ निर्माण करणे चुकीचे आहे याची जाणीव नेत्यांनाही होईल का?

  • प्रफुल्लचंद्र मु.काळे, सातपूर (नाशिक) 

‘मध्य प्रदेश स्टोरी’, ‘राजस्थान फाइल्स’ टळोत

कोणता पक्ष जिंकला आणि कोणता हरला हा मुद्दा काही वेळाकरिता बाजूला ठेवून कर्नाटकच्या निवडणुकीकडे बघितले तर आपल्याला एक वेगळेच चित्र दिसेल अन् ते म्हणजे एका अशा मतदार राजाचे, जो कुठल्याही मोहाला बळी पडला नाही, ज्याच्यावर कुठल्याही अपप्रचाराचा पगडा बसला नाही. ज्याने बलाढय़ पक्षाला जाणीव करून दिली की, आता येनकेनप्रकारेण सत्तेवर आरूढ होण्याकरिता जनतेला दिग्भ्रमित करण्याचा काळ सरत आला आहे. कर्नाटकच्या जनतेने ‘काश्मीर फाइल्स’नंतरच्या ‘द केरला स्टोरी’सारख्या प्रायोजित आणि वित्तपोषित चित्रपटांना धुडकावून लावले आणि पुनश्च सिद्ध केले की, अजूनही आमची विचारक्षमता शाबूत आहे! असे जर न होते तर देशाच्या जनतेवर लवकरच ‘द राजस्थान फाइल’, ‘द मध्य प्रदेश स्टोरी’ आणि नंतर ‘द छत्तीसगड फाइल’ बघण्याची पाळी आली असती. आपल्या पंतप्रधानांचेही कष्ट कमी झाले, नाही तर त्यांनाही आपल्या पदाची गरिमा बाजूला ठेवून असल्या चित्रपटांच्या प्रचाराला जुंपावे लागले असते.

  • विनोद द. मुळे, इंदूर

निकालानंतर बोम्मईंची प्रतिक्रिया संतुलित

कर्नाटकमधील निकाल मतदानोत्तर सर्वेक्षणांच्या अंदाजांपेक्षा चांगले आले. निकालानंतर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. उपमुख्यमंत्री तसेच इतर बोलघेवडे नेते ज्या रीतीने बोलले त्यामधून त्यांची घमेंडखोर वृत्तीच दिसून आली. त्या मानाने कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे प्रतिक्रिया देताना खूप संतुलित बोलले.

मग, याला काय म्हणावे?

कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकल्यावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांना होणारा आनंद म्हणजे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ अशी अवस्था आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला हे वृत्त वाचले. तसे असेल तर ताशेरे ओढत, सारी पिसे उपटत महाराष्ट्रातल्या २०२१ मधील सत्तांतराविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानंतर शिंदे गट आणि भाजप साजरा करत असलेल्या आनंदोत्सवाला  ‘आयजीची खाट आणि बायजीचा थाट’ असे  म्हणावे काय?

  • बकुल बोरकर, विले पार्ले (मुंबई)