‘हिमालयाचा मुलाहिजा’ (८ ऑक्टोबर) अग्रलेख वाचला अन् वाचता- वाचताच असे वाटू लागले की, माझ्याच विचारांना वाचा फुटली की काय.. उत्तरकाशी (उत्तराखंड) येथील ‘नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माउन्टेनियिरग’च्या प्रशिक्षणार्थी पथकाच्या दुर्दैवी अपघाताचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून डोक्यात विचारांचे वादळ माजले होते अन् झालेल्या अपघाताला कोण जबाबदार – निसर्ग का आपण स्वत: हे द्वंद्व चालले होते. अग्रलेखात नमूद केल्याप्रमाणे, अलीकडेच वाढलेल्या गिर्यारोहण क्षेत्रातील अपघातांकरिता ‘विकासा’च्या नावाखाली निसर्गाशी आपणच मांडलेला जीवघेणा खेळ तर जबाबदार आहेच पण त्याचबरोबर गिर्यारोहण आणि पदभ्रमणासारख्या जोखमीच्या क्षेत्रात घसरत चाललेला दर्जाही तितकाच जबाबदार आहे. मला आठवतेय, १९८५ मध्ये म्हणजेच आजपासून जवळजवळ ३७ वर्षांपूर्वी ज्या वेळेस मी याच संस्थेतून गिर्यारोहणाचा बेसिक कोर्स पूर्ण केला तेव्हा या क्षेत्राची एक प्रतिमा होती व फारच कमी लोकांना संस्थेविषयी माहिती होती. पण आता मात्र तसे राहिलेले नाही. आज कुणीही येतो अन् या ना त्या संस्थेत प्रवेश घेऊन स्वत:ला ‘गिर्यारोहक’ म्हणून मिरवण्याची हौस भागवतो. त्या वेळी ज्यांना या क्षेत्राबद्दल खरोखर आवड होती, तेच या क्षेत्रात काही करण्याकरिता धडपडत असत. या क्षेत्राबद्दल त्यांना आदरभावही असायचा. आता मात्र तसे काहीच दिसत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा