कोलकात्यामधील आर. जी. कार सरकारी वैद्याकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचे प्रकरण वाटते तितके सरळ नाही. ‘रविवारपर्यंत तपास मार्गी लावा, नाहीतर सीबीआयकडे सोपवू’ असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील ‘रविवारपर्यंत प्रकरण मिटवा’ असेच सुचवत होत्या की काय, अशी शंका घेण्यास जागा आहे. त्यामुळेच, रविवारची वाट न पाहता हा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला, त्याचे स्वागत. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील यंत्रणेने हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले त्यावरून संशयाला अधिक वाव निर्माण झाला. ही दुर्दैवी विद्यार्थिनी गेल्या शनिवारी पहाटे महाविद्यालयाच्या कक्षात मृतावस्थेत आढळली. महाविद्यालयाच्या प्रशासनाने आधी आत्महत्या असल्याचेच चित्र उभे केले. मुलीच्या कुटुंबीयांना महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन तास थांबवून ठेवण्यात आले. मुलीचा मृतदेह दाखविण्यास आधी टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र ही आत्महत्या असू शकत नाही, चौकशी कराच, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा