न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताचे रोहित शर्मा, विराट कोहली आदी रथी-महारथी फलंदाज पुण्यातील मैदानावर नांग्या टाकत असताना त्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री हळूच भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा संघ जाहीर करण्यात आला. रात्री उशिरा आलेल्या त्या ई-मेलच्या माध्यमातून जगापर्यंत माहिती पोहोचवण्याचे सोपस्कार उरकून टाकले गेले. न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपण्याआधी असे का केले गेले, याविषयी खुलासा वगैरे करण्याची विद्यामान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची परंपरा नाही. कदाचित ही तारीख पूर्वनिर्धारित होती. ती जेव्हा ठरवली गेली त्यावेळी न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरूच झाली नसेल. कदाचित मालिका गमावण्याची नामुष्की आपल्यावर येईल, असे बीसीसीआयला किंवा निवड समितीला वाटले नसेल. गेलाबाजार ती ०-३ अशी गमवावी लागेल याची तर शक्यताही त्यांनी गृहीत धरली नसेल. पण त्यावेळची परिस्थिती पाहून हा निर्णय पुढे ढकलता आला असता. बेंगळूरुतील कसोटी भारताने गमावली होती. पुण्यात पहिल्या डावात १५६ धावांपर्यंत भारताला कशीबशी मजल मारता आली. त्या सामन्यात आपण पिछाडीवर होतो. दिवसअखेरीस न्यूझीलंडने अडीचशेहून अधिक धावांची आघाडी घेतली आणि त्यांचा निम्मा संघ बाद व्हायचा होता. म्हणजे भारत सामनाच नव्हे, तर मालिका गमावण्याचीही शक्यता होती. १२ वर्षे आणि १८ मालिका वगैरे अपराजित राहिलेला भारतीय संघ मालिका गमावण्याच्या स्थितीत असताना, त्या परिस्थितीची जराही दखल घेण्याची गरज बीसीसीआयला वाटली नाही. यापूर्वीही ऐन मालिकेदरम्यान इंडियन प्रीमियर लीगचे लिलाव वगैरे पुकारण्याचे प्रकार झालेले आहेत. कोटी-कोटी किंवा लक्ष-लक्षच्या बोली लागत असताना (किंवा नसताना) कोणता खेळाडू सामन्यावर लक्ष केंद्रित करू शकेल, अशी विचारणा त्यावेळीही झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा