मालदीवच्या निवडणुकीत अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेसने (पीएनसी) विरोधी पक्ष माल्दिव्हियन डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) पार धुव्वा उडवला आहे. एमडीपी हा भारताच्या बाजूने झुकणारा पक्ष. त्यामुळे त्या पक्षाचे सत्तेत येणे भारतासाठी भू-राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते. हिंदी महासागरात असलेले मालदीवचे मोक्याचे स्थान जागतिक व्यापार आणि सामरिकदृष्ट्याही कळीचे आहे. असे असताना ‘एमडीपी’चा पराभव होऊन चीनधार्जिण्या ‘पीएनसी’चा मोठा विजय भारतापुढे आव्हाने निर्माण करणारा आहे. ‘पीएनसी’ सत्तेत आल्याने हिंदी महासागरात आणखी हात-पाय पसरविण्यासाठी टपून बसलेल्या चीनला नक्कीच आनंद झाला असणार. तसेही सहा महिन्यांपूर्वी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून मालदीवचे अध्यक्षपद पटकावलेले भारतद्वेष्टे मुईझ्झू मोठा चर्चेचा विषय बनून राहिले होतेच. आता त्यांच्या पक्षाच्या कायदे मंडळातील विजयामुळे त्यांचे हात आणखी भक्कम झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा