धर्मगुरू, साहित्यिक आणि सामाजिक त्यातही पर्यावरणवादी कार्यकर्ते या तशा एकमेकांपासून वेगवेगळ्या असणाऱ्या भूमिका. कारण धर्मगुरू सहसा समाजकारणात शिरत नाहीत. सामाजिक कार्यकर्ते किंवा साहित्यिक एकमेकांच्या क्षेत्रात ‘लुडबूड’ करताना दिसत नाहीत. पण या तीनही भूमिका खऱ्या अर्थाने आणि परिणामकारकरीत्या जगलेले व्यक्तिमत्त्व म्हणून फादर प्रान्सिस दिब्रिटो यांचे योगदान कधीच नाकारता येणार नाही. १९७२ पासून ते वसईत ख्रिाश्चन धर्मगुरू होते. ‘सुवार्ता’ या मराठी मासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले. ‘सुबोध बायबल’ असे बायबलचे मराठीत रूपांतर केले. धर्मगुरू म्हणून वावरताना स्थानिक भाषेशी, स्थानिक संस्कृतीशी जोडून घेण्याची त्यांची वृत्ती थेट फादर स्टीफन्स यांच्याशी नातं सांगणारी ठरली. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मराठीतून विपुल लेखन केले. ‘नाही मी एकला’ हे त्यांचे आत्मकथनही प्रसिद्ध आहे. त्यांची ही साहित्यसेवा त्यांना ९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन गेली. असे अध्यक्षपद भूषवणारे फादर द्रिब्रिटो हे एकमेव धर्मगुरू. विशेष म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड सर्व विभागांतून सहमतीने झाली होती. वसईतील ख्रिास्ती समाजाने जास्तीत जास्त मराठीचा वापर करावा यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक बिशप थॉमस डाबरे आणि फादर दिब्रिटो यांच्या प्रयत्नांमुळे वसईतील ख्रिास्ती समाजात मराठीचा प्रसार झाला.
अन्वयार्थ: पर्यावरणप्रेमी फादर
धर्मगुरू, साहित्यिक आणि सामाजिक त्यातही पर्यावरणवादी कार्यकर्ते या तशा एकमेकांपासून वेगवेगळ्या असणाऱ्या भूमिका. कारण धर्मगुरू सहसा समाजकारणात शिरत नाहीत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-07-2024 at 02:37 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth priest literary and social environmental activist father francis dibrito amy