माहिती अधिकाराच्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सतर्क नागरिक संघटनेच्या अंजली भारद्वाज यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने राज्ये व केंद्राची कानउघाडणी केलीच, शिवाय आयुक्तांच्या नेमणुका करण्यासाठी पाच आठवड्यांचा कालबद्ध कार्यक्रम आखून दिला. त्याची अंमलबजावणी करणे मुख्य सचिव तसेच डीओपीटीला बंधनकारक असले तरी सरकारे यातही पुन्हा वेळकाढूपणा अवलंबतील का हा प्रश्न आहेच. त्याचे कारण वर उल्लेखलेल्या सरकारांचे वागणेही तसेच आहे. सरकारच्या पातळीवर नेमके काय चालले आहे याची माहिती जाणून घेण्याचा अधिकार या कायद्याने प्रत्येक नागरिकाला बहाल केला त्याला आता १९ वर्षे झाली. या काळात हा कायदा अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा व सरकार तसेच प्रशासन अधिक पारदर्शी व्हावे अशी अपेक्षा होती. ती सर्वांनी मिळून पूर्णपणे फोल ठरवली. ती कशी याचे उत्तर याच संघटनेने याचिकेत जोडलेल्या माहितीत दडले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा