राज्य मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा घेतला आहे. सुमारे आठ हजार कोटींचा तोटा असलेल्या एसटी मंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनापुढे हात पसरावे लागतात एवढी गंभीर परिस्थिती या मंडळाची आहे. तोटा भरून काढण्याबरोबरच एसटी मंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता मंडळाच्या मालमत्तेचे खासगीकरण करून निधी जमा करण्याची गेली अनेक वर्षे योजना आहे. एसटी मंडळाकडे ७५०च्या आसपास बस स्थानके आणि आगारांच्या जागा आहेत. व्यापारी तत्त्वावर एसटीच्या जागेचा विकास करण्याचा हा मंत्रिमंडळाने पहिल्यांदा घेतलेला निर्णय नाही. याची सुरुवात २००१ मध्ये झाली होती. पण गेल्या २३ वर्षांत त्यात फारशी प्रगती झालेली दिसत नाही. २००६ मध्ये पुन्हा धोरणात काही बदल करण्यात आले. मध्यंतरी मंडळाच्या जागांचे चलनीकरण (मॉनेटायझेशन) करून निधी उभारण्याची योजना होती. पण याही प्रस्तावाची फारशी प्रगती झालेली दिसत नाही. २०१७ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सर्वाधिक वर्दळीच्या १३ आगारांचा खासगीकरणातून विकास करण्याचा निर्णय घेतला, त्याचाही प्रभाव दिसलेला नाही. उलट पनवेल आगाराच्या विकासाची योजना रखडली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई सेंट्रल येथील मंडळाच्या मुख्यालयाचा विकास करण्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले होते. ४९ मजली इमारत उभारण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. विविध सरकारी कार्यालये या इमारतीत सुरू करण्याची योजना होती. पण गेल्या पाच वर्षांत बांधकामाची एक वीटही हलली नाही. पाच वर्षांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर व्यापारीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. गेल्या दोन दशकांत एसटीच्या ४५ जागांचा व्यापारी तत्त्वावर विकास करण्यात आला. त्यातून एसटी महामंडळास अधिमूल्य स्वरूपात फक्त ३२ कोटी रुपये मिळाले. २२ कोटी मूल्याचे बांधकाम करून मिळाले. खासगीकरणातून विकास झाला त्या स्थानकांची अवस्था फार काही चांगली नाही. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात खोपट आगाराचे काही वर्षांपूर्वी व्यापारीकरण करण्यात आले. ठेकेदाराने विक्रीसाठी अद्यायावत इमारत उभारली, पण एसटी स्थानकाच्या जागेची दुरवस्था कायम आहे. एसटी स्थानकांची देखभाल आणि दुरुस्ती होत नाही. परिणामी अनेक स्थानकांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य आहे. निधीची चणचण या ‘विकासा’नंतरही कायम असल्याने एसटी मंडळाचे हात बांधले गेलेले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा