मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्रप्रकल्पात ऐन दिवाळीच्या दिवसात दहा हत्तींचा झालेला मृत्यू केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे वाघ व चित्ते सांभाळले म्हणजे झाले वन्यजीवांचे रक्षण असेच स्वरूप अलीकडे या धोरणाने घेतल्याचे दिसते. यातून याच जंगलात वावरणाऱ्या व निसर्गसाखळीतील तेवढेच महत्त्वाचे घटक असलेल्या इतर प्राण्यांकडे कमालीचे दुर्लक्ष होते, याचा प्रत्यय या मृत्यूंतून येतो. बांधवगड प्रकल्पाच्या परिसरात पावसाळा संपल्यावर उगवणारी कोदो कुटकी नावाची विषारी वनस्पती या हत्तींच्या मृत्यूला कारणीभूत ठरली असा वनखात्याचा प्राथमिक अंदाज आहे. सखोल परीक्षणानंतर यातले खरे कारण बाहेर येईलही; पण या महाकाय प्राण्याला विषबाधा कशामुळे होते? त्यापासून त्याला सांभाळता कसे येईल हे व्यवस्थापनातले प्राथमिक धडेसुद्धा राज्याच्या वनखात्याने गिरवले नसल्याचे यातून स्पष्ट झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा