साठोत्तरीच्या काळात जी भय-रहस्य मासिके पुण्या-मुंबईतून निघत, त्यांनी एक विचित्र ग्रह मराठी वाचकांच्या मनात निर्माण केला.. आल्फ्रेड हिचकॉक हा चित्रपट दिग्दर्शक कथालेखक देखील असल्याचा! ‘‘हिचकॉक’च्या कथा’ अशी दरमहा सदरेच काही मासिकांनी चालविली होती. कित्येकांनी किडूक-मिडूक वकुबात ‘हिचकॉकच्या (तथाकथित) कथां’ना मराठीत वाचकांच्या माथी मारण्याचा सपाटा लावला. प्रत्यक्षात पटकथांखेरीज लेखन न करणारा भयपटांचा हा बादशहा वगैरे बिरुद मिळविलेला चित्रपट दिग्दर्शक कधीही कथा लिहित नव्हता. नाही म्हणायला, ‘हिचकॉक प्रेझेण्ट्स’ नावाने येणाऱ्या संकलन ग्रंथात या दिग्दर्शकाची कुंथत कुंथत लिहिलेली जेमतेम दीड-दोन पानांची प्रस्तावना असे. त्यांत त्याला आवडलेल्या भयकथांबद्दलची कारणे चार-दोन वाक्यात उरकलेली असत. ‘टेल्स ऑफ टेरर’ (५८ कथा), ‘द बेस्ट ऑफ मिस्टरी’ (६३ कथा), ‘पोट्र्रेट्स ऑफ मर्डर’ (४७ कथा), ‘स्टोरीज दॅट ईव्हन स्केअर्ड मी’ (२३ कथा) आणि ‘स्टोरीज दॅट गो बम्प इन द नाइट’ हे या ‘हिचकॉक प्रेझेण्ट्स’ मालिकेतले महत्त्वाचे ग्रंथ. यांतल्या सगळय़ा कथा महाराष्ट्रभूमीतल्या वेगवेगळय़ा लेखकांनी परत-परत वेगवेगळय़ा चुकांसह, व्यक्तिरेखांच्या नावांच्या बहुआकलनी उच्चारांसह मराठीत आणल्या. अजूनही एखाद्या दिवाळी अंकामध्ये हिचकॉकच्या जनकत्वासह एखादी शब्द भूतरत्नकळा सापडू शकतेच. ‘ओ माय गॉड’ या मराठी वाक्यांसह पात्रांची कठीण समयी किंचाळण्याची पद्धत सगळय़ा अनुवादांत ओळखीची व्हायला लागते. हिचकॉकच्या चित्रपटांमध्ये जसे धक्कातंत्र सापडते, तशा या कथा चमकदार शेवटासाठी हिचकॉकने निवडल्या होत्या. इंग्रजीत त्या वाचताना खरेच त्यात भयघटक असल्याची खात्री होते, मात्र मराठीत त्याचे ‘स्वैरावैरा’ झालेले रूपांतर किंचितही धक्का देत नाही. या अनुवादांपैकी एका पुस्तकाचे नाव ‘हिचकॉक’च्या धक्कांतिका असले, तरीही गेल्या पन्नासेक वर्षांत त्यांतील कथा वाचून कुणाला तीव्र वा सौम्य धक्का बसल्याचे ऐकिवात नाही. या ‘हिचकॉक प्रेझेण्ट्स’ भयग्रंथमालांची आठवण झाली, ती सांप्रत काळात भय-धक्कातंत्रात मुरलेल्या जॉर्डन पील या आफ्रो-अमेरिकी दिग्दर्शकाने संपादित केलेल्या नव्या कृष्णवंशीय लेखकांच्या भयकथांच्या ताज्या पुस्तकामुळे.

पीलचे नाव अलीकडे चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रचंड लोकप्रिय आहे. ‘गेट आऊट’ (२०१७), ‘अस’ (२०१९) आणि ‘नोप’ (२०२२) या त्याच्या वांशिक भेदाशी संबंधित भयपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये दुभंगलेल्या, किडलेल्या समाजाच्या वर्तनांमधून भयाची नवीच मात्रा उभी राहते. वर्णभेद, वर्गभेद, सामाजिक अन्याय यांच्याआधारे शिकार आणि शिकारी यांच्यामधले लवचीक नाते त्याच्या पहिल्या दोन भयपटांमधून उघड झाले. तिसरा चित्रपट विज्ञान-भयाचे नवे रूप सादर करतो. कुठल्याशा परग्रहावरून आलेल्या तबकडीचा अमेरिकेतील विशिष्ट प्रांतामधील वावर दहशतीच्या वातावरणासह अनपेक्षित भय-धक्का प्रेक्षकाला शेवटापर्यंत देतो.

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
career animal love
चौकट मोडताना : प्राणिप्रेमाची धास्ती
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
pune pustak Mahotsav latest news
‘लिटफेस्ट’च आता ग्रंथतारक…

‘आऊट देअर स्क्रीमिंग : अ‍ॅन अ‍ॅन्थॉलॉजी ऑफ न्यू ब्लॅक हॉरर’ नावाचा जॉर्डन पील संपादित ग्रंथ काही महिन्यांपूर्वीच प्रकाशित झाला. यातील भयकथा या पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही स्वरूपातील आहेत. पारंपरिकाचा विचार करताना भूतकथांची आपल्या नारायण धारपांच्याच नजरेतून व्याख्या समजून घ्यावी. मृत व्यक्तीच्या आत्म्याचा किंवा प्रभावाचा, अतृप्त वासना वा सूड या हेतूने मानवी व्यवहारात प्रवेश झाला तर ती भूतकथा. आणि काही अनैसर्गिक, अतिमानवी वा अमानवी शक्तींचा रोजच्या जगात वावर होऊ लागला तर ती भयकथा. धारपांच्या समकालीन लेखकांच्या भूत तसेच भयकथांना एडगर एलन पो, ब्रॅम स्ट्रोकर, वॉल्टर डी मेअर, एच.पी. लव्हक्राफ्टपासून डझनावरी भयलेखकांचे संदर्भ जोडता येतात. लोकांना पुरते घाबरवून सोडण्याची क्षमता असणाऱ्या आणि अदृश्य शक्तींकडून पुढे काय होणार याची उत्कंठा वाढविणाऱ्या कथा अनेक दशके लिहिल्या जात आहेत. स्टीवन किंग, स्टीवन ग्रॅहम जोन्स, पीटर स्ट्रॉब आणि पॉल ट्रेम्बलीसह अनेक नावे आज भयकथांमध्ये आहेत.

‘आऊट देअर स्क्रीमिंग’मध्ये १९ कृष्णवंशीय लेखकांच्या भयकथा आहेत. यातल्या एका कथेत वांशिक भेदातून अत्याचार करणाऱ्या पोलिसाची कहाणी आहे; तर आपल्या आई-वडिलांना मारणाऱ्या राक्षसाचा बळी घेण्यासाठी सज्ज झालेली मुलगी आहे. सैतानी शक्ती असलेल्या बहीण-भावांचीही एक गोष्ट आहे, तर भविष्यात नष्ट झालेल्या पर्यावरणामुळे तयार झालेल्या नव्या भुताळी समस्येची कथा आहे. जॉर्डन पीलने या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आपल्या सिनेमांतील भयघटकावर चर्चा केली आहे. त्यामुळे भयपट आणि भयकथा या दोन्हींच्या प्रेमींना हा ‘जॉर्डन पील प्रेझेण्ट्स’ स्वरूपाचा ग्रंथ उपयुक्त ठरू शकेल.

हे ही वाचा..

‘केन’ हा आफ्रिकी देशातील कथालेखकांपैकी वर्षांतील सर्वोत्तम कथेला दिला जाणारा पुरस्कार. यंदा हा पुरस्कार सेनेगलमधील एका दाम्पत्याने लिहिलेल्या भयकथेला मिळाला. ‘नेव्हर व्हिसल अ‍ॅट नाइट’ नावाच्या भयकथांच्या संकलनात ही कथा संकलित झाली असली, तरी मोफत येथून उतरवता येईल.

https:// shorturl. at/ ejMY5

‘आऊट देअर स्क्रीमिंग’ या ग्रंथाच्या निमित्ताने त्यातील एका कथालेखिकेची मुलाखत. वांशिक भयासंदर्भात आणि आपल्या कथेसंदर्भात आजच्या काळावर टाकलेला प्रकाश या मुलाखतीत पाहायला मिळतो.

https:// shorturl. at/ rEQ48

स्टीव्हन किंग हे भयकथांच्या जगतातील परमोच्च नाव सर्वाच्या परिचयाचे असले, तरी सध्या या प्रांतात गाजणारा ताजा लेखक पॉल ट्रेम्बली आहे. हा लेखक आजच्या समाजमाध्यमांनी दिलेल्या संदर्भाना घेऊनही उत्तम भय निर्माण करू शकतो. त्याच्याविषयी जाणून घ्या या मुलाखतीतून.

https:// shorturl. at/ iknor

Story img Loader