भरगच्च सत्रांमुळे प्रेक्षकांची पळापळ.. किती पाहू नि किती ऐकू अशी स्थिती.. यातूनही ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीनं टिपलेले हे काही क्षण!

गर्दीने ओथंबलेला जयपूर साहित्य महोत्सवातील सर्वात प्रशस्त ‘फ्रण्ट लॉन’ परिसर ‘गुलजार साब’ नामक सत्रात साक्षात गुलजारांचा शब्दोत्साह ऐकण्यासाठी कान एकवटून स्तब्ध झालेला. पैकी त्यांच्या फाळणीउत्तर दृश्य-काव्यांतील दाह जाणवत श्रोत्यांच्या डोळय़ांतूनही दाद येत होती. मग टागोरांच्या कवितेच्या जवळ जाण्याचा किस्सा सांगताना आपल्या वाचनारंभ काळातील आठवणीचा एक तुकडा गुलजारांनी सादर केला. आठवडय़ाला चार आणे दराने जासूसी उपन्यास वाचायला घेण्याची आणि त्या कादंबऱ्या एका रात्रीत संपवून दुसरी बदलण्याची खुमखुमी सांगताच लोकांनी त्यांच्या त्या वाक्यावर भरपूर हसून घेतले. समोर बसलेल्या ‘रहस्यकथांना फालतू मानणाऱ्या सर्वपिढी’च्या वाचकवृंदासमोर गुलजार उर्दूतल्या शहजादा तबस्सुम आणि इरानी परवेज या लेखकांनी लावलेल्या गारुडाबद्दल सांगत होते. ज्यात बातमीदारांना किंवा गुलजारांच्या चाहत्यांनाही फारसे स्वारस्य दिसत नव्हते. पैकी शहजादा तबस्सुम हे नंतरच्या काळातही वाचकप्रिय झालेले नाव नाही. ‘नीलम जासूस’ नामक जुन्या नोव्हेंबर १९५९ सालातील मासिकात ‘कोहे-तूर की चोरी’ (कोहिनूरसारखाच हिरा असावा) या नावाने त्यांच्या जासूसी कादंबरीचे हिंदीत लिप्यांतर झाल्याचा दाखला सापडतो. पण इरानी परवेज हे नाव शोधूनही सापडत नाही. हे सत्र संपल्यानंतर ‘मीडिया रूम’मधून गुलजार यांची बातमी आपापल्या वृत्तघरांत दाखल करण्यासाठी जी घाई लागलेली, त्यात सर्व हौशे-नवशे आणि जाणते गुलजारांनी बोलता बोलता दिलेल्या लक्षखेचू ‘इण्ट्रो’चे आचमन करीत होते. ‘पाकिस्तान मला शेजारच्या खोलीतील भिंतीइतका जवळ आहे, त्या भिंतीच्या खिडकीइतका समीप आहे.’ हा मुद्दा ऑनलाइन फ्लॅश करण्यासाठी अभूतपूर्व घाई लागली होती. गुलजारांच्या रहस्यकथाप्रेमाचा मुद्दा त्यांच्या लेखी शून्यासमान होता. या रहस्यकथा देणाऱ्या माणसाने त्याच्या नुकसानाचा बदला म्हणून गुलजारांना दिलेल्या टागोरांच्या अनुवादित काव्यातून त्यांचे आयुष्य कसे बदलले, हा मुद्दाही नंतर कुणी छापून आलेल्या वृत्तात घेतला नाही.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…

जयपूर साहित्य महोत्सवात तुम्हाला सापडणाऱ्या गोष्टी इतरांना सापडतीलच असे नाही. इतरांना काही तुमच्यापेक्षा अधिक चांगलेही सापडू शकण्याची शक्यता अधिक. त्यामुळे प्रत्येकासाठी हा महोत्सव ‘सातांधळेपणाचा हत्ती’देखील होऊ शकतो. यंदाची आकर्षण केंद्रे भरपूर होती.

 ख्रिस्तोफर नोलानचा ‘ओपनहायमर’ चित्रपट वर्षभर गाजत आहेच. वर ऑस्करसाठी सर्वाधिक नामांकने असताना आत्ता नव्या चर्वणात त्याचा लेखक काय बर्ड हादेखील प्रकाशझोतात आहे. त्यामुळे जयपूर महोत्सवात ‘ओपनहायमर’चे चर्चासत्र आणि त्यानंतर पुस्तकाचे विक्रीसत्र अपेक्षेप्रमाणे झाले. आणखी एका चर्चासत्रात काय बर्ड यांनी पुस्तक आणि त्याची सिनेमा बनविण्याची प्रदीर्घ प्रक्रिया यांबद्दल सांगितले.

बॉनी गारमस यांच्याविषयी आणि त्यांच्या पुस्तकाविषयी गेले वर्षभर भरपूर लिहून आलेले आहे. कादंबरीवर बेतलेल्या ‘लेसन्स इन केमिस्ट्री’ या मिनीसिरीजचा दर्शक आणि जयपूर महोत्सवातील दोन सत्रांमधून या लेखिकेची नव्याने माहिती झालेला वर्ग तिच्या पुस्तकाच्या प्रती घेऊन सहीसाठी गर्दी करीत होता. (बहुधा मराठीतही त्याचा अनुवाद येण्याच्या वाटेवर आहे.) पुरुषसत्ताक कार्यालयातील झालेल्या अपमानाच्या रागातून या कादंबरीची निर्मिती कशी झाली, याची प्रक्रिया यांवर एका सत्रात, तर पुस्तकाचे ‘टीव्ही सिरीज’मधील रूपांतर यावर दुसऱ्या सत्रात गप्पा मारल्या.

डेमन गालगट हे दक्षिण आफ्रिकी लेखक. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या ‘प्रॉमिस’ या कादंबरीला बुकर मिळाले असल्याने महोत्सवात त्यांच्या कादंबरीबद्दलचे खास चर्चासत्र होते. त्यांत त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती यांमधून आपली कादंबरी कशी लिहिली गेली यावर भाष्य केले. पुस्तकांचे भविष्य आजच्या ई-बुकच्या काळातही उज्ज्वल असल्याचे त्यांचे म्हणणे होते. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये ई-बुक सुरुवातीच्या काळामध्ये लोकप्रिय झाली. पण आता ती तिथून हद्दपार होत आहेत. वाचकांची पसंती ई-बुकांऐवजी पुस्तकांनाच राहील, यावर ते ठाम आहेत. त्यांच्या भर दुपारच्या उन्हातील चर्चासत्रानंतरही आश्चर्यकारकरीत्या सहीउत्सुक वाचकांची रांग दमलेली नव्हती.

‘वाणी फाऊंडेशन’च्या अनुवाद पुरस्काराचे सत्र हे महत्त्वाचे असले, तरी एक बिलकूल गर्दीखेचू नसणारे म्हणून ओळखले जाते. गेल्या वर्षी हा पुरस्कार गीतांजली श्री यांची कादंबरी इंग्रजीत नेणाऱ्या डेझी रॉकवेल यांना मिळाला होता. यंदा ऑस्कर पुजोल या संस्कृतमधून स्पॅनिश भाषेत अनुवाद करणाऱ्या लेखकाला मिळाला. या ऑस्कर पुजोल यांनी संस्कृतमधून स्पॅनिश भाषेत शब्दकोश तयार केला असून भगवतगीतेचा नुकताच केलेला स्पॅनिश अनुवाद त्यांना पुरस्कारासाठी पात्र ठरवणारा होता.

शशी थरूर आपल्या चर्चासत्रात एकाच वेळी मुलाखतकार आणि श्रोत्यांवर छबीदार वाक्यांची वर्षां कसरत करीत असताना खरोखरचा पाऊसदेखील आला. तरीदेखील त्यांनी सहीसत्रास बगल दिली नाही, कारण त्याच मंचावर नंतरच्या तासाला पुढील वक्त्याला ऐकणाऱ्या लोकांहून अधिक त्यांचे पुस्तक विकत घेणाऱ्या लोकांची रांग लांबच लांब वाढत चालली होती.

सुधा मूर्ती यांच्या सत्रातील सुसंस्कृत, सुसंस्कारी, सुव्यसनी दर्शकांनी ‘लहानपणापासून माझ्यासाठी माणसे पुस्तकासारखीच असून त्यांनादेखील मी वाचतच आले.’ सारखी टाळीफेक वाक्यांची बरसात केली. नंतर त्यांचा हात स्व:नामाची आवर्तने करण्यात वाचकांनी गुंतवला.

यंदा (विशाल भारद्वाज, गुलजार यांखेरीज) सिनेसेलिब्रिटींचा वावर नसला तरी बुकर, इंटरनॅशनल बुकर अशा सर्व पुरस्कारांनी गाजत असलेल्या लेखक तारांकितांनी जयपूर महोत्सव गाजवला. कुठलीही वादग्रस्त विधाने आणि मुद्दय़ांविना घडलेला गेल्या दशकभरातला हा बहुधा पहिला जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल असावा.

हेही वाचा

‘वर्ड्स विदाऊट बॉर्डर्स’ हे न्यू यॉर्कमधून कार्यरत असलेले  साहित्यिक संकेतस्थळ. जगातील अनेक भाषांमधील साहित्य इंग्रजीत येत असल्यामुळे ते सुपरिचित. या संकेतस्थळातील महत्त्वाच्या पदावर भारतीय वंशाच्या कल्पना रैना यांचा समावेश आहे. काश्मीरमध्ये जन्मलेल्या रैना यंदा जयपूर मेळय़ामध्ये या संकेतस्थळाबद्दल आणि अनुवादाच्या सौंदर्याबद्दल एका चर्चासत्रात वक्त्या होत्या. या संकेतस्थळावरील कथा येथे मोफत वाचता येतील.

  https:// shorturl. at/ imwEX

‘वाणी प्रकाशना’चा अनुवाद पुरस्कार यंदा संस्कृतातून स्पॅनिशमध्ये भाषांतर करणाऱ्या ऑस्कर पुजोल यांना जयपूर महोत्सवात प्रदान करण्यात आला. गेली अनेक वर्षे संस्कृतचा अभ्यास करणारे हे ऑस्कर पुजोल कोण, त्यांचा अभ्यास काय, हे जाणून घेण्यासाठी त्यांची करोनापूर्वीच्या वर्षांतील एक मुलाखत.

https:// shorturl. at/ AVX89

बॉनी गारमस यांचे ‘लेसन्स इन केमिस्ट्री’ हे पुस्तक अद्याप माहिती नसेल, तर ते आपल्या जवळच्या कोणत्याही खूपविक्या पुस्तकांच्या दुकानात मिळेल. ऑनलाइन खरेदीत पारंगत असाल, तर वेगवेगळय़ा आकर्षक आवृत्त्याही मिळतील. जयपूर महोत्सवामध्ये गारमस यांची दोन चर्चासत्रे झाली. त्यात महिन्यापूर्वीच्या या लेखातील मुद्दय़ांची पुनरावृत्ती आणि अधिकचे नवे थोडेच होते. त्यामुळे ते जाणून घ्यावे वाटल्यास ही मुलाखत. 

https:// shorturl. at/ defu4