दिल्लीवाला
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमधील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडलेलं आहे. पहिल्या आंदोलनात त्यांनी पंतप्रधान मोदींना गुडघे टेकायला लावले होते. २०२१ मधील धडा मोदी विसरलेले नाहीत. त्यांनी यावेळी चूक सुधारलेली आहे. गेल्या वेळी मोदींसह भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना दूषणं दिली होती, अगदी संसदेमध्ये आंदोलनजीवी, परोपजीवी असे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं होतं. आता तीन वर्षांनंतर शेतकऱ्यांचं आंदोलन होत असलं तरी भाजपच्या नेत्यांनी अद्याप तरी दूषणं दिलेली नाहीत. यावेळी मोठा फरक असा की, हे आंदोलन केंद्र सरकारने दिल्लीपर्यंत येऊ दिलेलं नाही. आंदोलन करायचं असेल तर दिल्लीपासून दोनशे किमी लांब पंजाब-हरियाणाच्या सीमेवर करा, असं अप्रत्यक्षपणे केंद्रानं बजावलं आहे. एकदा आंदोलक दिल्लीच्या वेशीवर आले की, केंद्राला त्यांचं आंदोलन हाताळणं जड जाईल. त्यामुळं शंभू सीमेवरच हे आंदोलन थांबवण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. शक्य झालं तर केवळ अश्रुधुराचा मारा करून आंदोलकांना रोखून धरलं जाईल. शेतकऱ्यांना शंभू सीमा ओलांडण्यात यश आलं तरी दिल्लीला येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पोलिसांची प्रचंड तटबंदी उभी केलेली असेल. त्यामुळं यावेळी शेतकरी आंदोलक दिल्लीच्या वेशीवर वा दिल्लीत घुसण्याची शक्यता नाही. आत्ता शेतकरी दोनशे किमीवर असले तरी दिल्लीभर पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे. आंदोलकांनी ‘दिल्ली चलो’चा इशारा देताच पोलिसांनी लालकिल्ल्यातील प्रवेश बंद केला होता. यावेळी केंद्रानं आंदोलकांशी तातडीनं बोलणी सुरू केली. आंदोलनाला सुरुवात होण्याआधीच केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांशी संपर्क साधला होता. यावेळी चर्चा दिल्लीत नव्हे तर चंडीगडला होत आहेत, शेतकरी नेतेही चंडीगडमध्येच चर्चा करण्याचा आग्रह धरताहेत. गेल्या वेळी झालेल्या चर्चांमध्ये प्रामुख्यानं केंद्रीय मंत्री पीयुष गोयल दोन्ही बाजूंनी समन्वय साधत होते. मोदी-शहांचे विश्वासू म्हणून गोयल यावेळीही बैठकांना हजर असतात. केंद्रीय कृषिमंत्री मात्र बदललेले आहेत. गेल्या वेळी नरेंद्र तोमर केंद्र सरकारच्या वतीनं चर्चांचा चेहरा होते, यावेळी हंगामी कृषिमंत्री अर्जुन मुंडांनी तोमर यांची जागा घेतली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा