दिल्लीवाला

लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला हे मोजक्या नेत्यांच्या श्रेणीत जाऊन बसलेले आहेत. याआधीही पाच नेत्यांनी सलग दोन वेळा लोकसभाध्यक्ष पद भूषवलं होतं. पण, सलग दहा वर्षं पूर्ण करणारे एकमेव नेता होते काँग्रेसचे बलराम जाखड. बिर्लांनी अजून दहा वर्षे पूर्ण केलेली नसली तरी ते जाखड यांच्या रांगेत जाऊन बसू शकतात. बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभाध्यक्ष झाले तेव्हा मोदी म्हणाले होते की, लोकसभाध्यक्ष पद हे असं आसन आहे की, तिथं बसून कारभार करणं म्हणजे तारेवरील कसरत आहे. सभागृह सांभाळताना स्वपक्षाच्या सदस्यांनाही दुखवावं लागतं. त्यामुळं सलग दुसऱ्यांदा एकाच लोकसभा मतदारसंघातून निवडून येणं अवघड असतं. बिर्लांनी हे अवघड काम करून यशस्वी केलेलं आहे… बिर्ला सलग तीन वेळा राजस्थानच्या विधानसभेचे सदस्य झाले. त्यानंतर आता लोकसभेचेही ते सलग तिसऱ्यांदा सदस्य बनले आहेत. २०२९ मध्येही ते कोटा लोकसभा मतदारसंघातून उभं राहू शकतात. लोकसभाध्यक्ष पद भूषवताना निवडून येण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे बिर्लांना माहीत असल्यानं त्यांनी आत्तापासून कोटा मतदारसंघाकडं लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. गेल्या वेळीही त्यांनी कोटाशी उत्तम संपर्क ठेवलेला होता. पण, पाच वर्षांच्या ताज्या सदस्यत्वामध्ये बिर्लांनी कोटाकडं अधिक लक्ष द्यायचं ठरवलेलं असावं असं दिसतंय. बिर्ला सातत्याने कोटा मतदारसंघामध्ये जाताना दिसतात. रात्री रेल्वेचा प्रवास करून सकाळी चार-पाच वाजता कोटामध्ये पोहोचल्यावर बिर्लांचे सकाळी आठ वाजल्यापासून जनसंपर्काचे कार्यक्रम सुरू होतात. सार्वजनिक समारंभ आटोपून ते त्याच रात्री दिल्लीला परत येतात. दिल्लीतही बिर्लांचं कामकाज घरातून होत नाही. संसदेचं अधिवेशन नसलं तरी बिर्ला संसदेच्या कार्यालयात असतात. संसदेबरोबरच कोटा मतदारसंघ सांभाळणं बिर्लांसाठी अत्यंत आवश्यक आहे, तरच चौथ्यांदा मतदार संधी देतील. त्यामुळं कदाचित बिर्लांनी दुसऱ्या कालखंडातील खासदारकीच्या पहिल्या वर्षातच कोटासाठी वेळेचा ‘कोटा’ राखून ठेवला असल्याचं दिसतंय.

Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?

 शिंदे-शेंडेंचा इतिहास!  
               
मुत्सद्दी मराठा सरदार महादजी शिंदेंचं राजघराणं आणि त्यांचं राजपौरोहित्य करणारं शेंडे घराणं या दोन घराण्यांच्या ऋणानुबंधावर प्रकाश टाकणारं ‘प्रकाशाकडून प्रकाशाकडं-स्थलांतर व स्थित्यंतर; शेंडे घराण्याचा बहुमआयामी प्रवास’ या पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीत केंद्रीयमंत्री व शिंदे घराण्याचे वारसदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. पत्रकार-लेखक दत्ता जोशी आणि डॉ. राजेंद्र शेंडे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव काँग्रेसमध्ये होते, ज्योतिरादित्य आता काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत! शिंदे-शेंडे घराण्यांच्या नातेसंबंधांवरील हे पुस्तक एकप्रकारे मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास अधोरेखित करणारा आहे, असं ज्योतिरादित्यांचं म्हणणं होतं. भारताचा इतिहास लिहिताना मराठ्यांचा इतिहास दडपला गेला होता. पोर्तुगीज, ब्रिटिश, मुघल अशा वसाहतवाद्यांचा इतिहास अधिक लिहिला गेलाय पण, मराठ्यांच्या इतिहासाला न्याय मिळालेला नाही… आता भारताचा इतिहास नव्यानं लिहिला जातोय, पुढील शंभर वर्षांच्या इतिहासाचं लेखन आत्ता सुरू झालंय, असं ज्योतिरादित्यांना सुचवायचं होतं. ज्योतिरादित्यांचं म्हणणं होतं की, शिंदे-शेंडे घराण्यावरील पुस्तकानं मराठ्यांच्या इतिहासाला संस्थात्मक रूप प्रदान केलं आहे. ते खरंही असेल. २०१४ नंतर भारताच्या प्राचीन-अर्वाचिन इतिहासाचं लेखन केलं जातंय. हे पुस्तकदेखील त्याचाच भाग असल्याचं म्हणता येऊ शकतं! शिंदे आणि शेंडे घराण्यांचे नातेसंबंध आजही टिकून आहेत. आजही शिंदे राजघराण्याचं राजपौरोहित्य शेंडे कुटुंबाकडून केलं जातं. संचारभवनातील शिंदेंच्या कार्यालयात झालेल्या या सोहळ्याच्या स्वागतपत्रिकेवर, ‘ज्योतिरादित्य सिंधिया’ यांच्या हस्ते प्रकाशन लिहिलेलं होतं. खरंतर ते ‘शिंदे’ असंच लिहायला हवं होतं. ही चूक ज्योतिरादित्यांनी अचूक हेरली. आम्ही शिंदेच आहोत. महाराष्ट्रात आम्हाला कोणी सिंधिया म्हणत नाही, तुम्हीही इथं शिंदेच लिहायला हवं होतं, असं म्हणत ज्योतिरादित्यांनी ‘मराठी बाणा’ दाखवला. ज्योतिरादित्य मराठी बोलत असल्यानं हा सगळा संवाद मराठीतून होत होता हे विशेष. शेंडे घराण्याला दिलेल्या सनदीसंदर्भात बोलताना ज्योतिरादित्य म्हणाले, ही सनद मोडी लिपीत आहे… नंतर ते म्हणाले, हे तर सगळं मोदी लिपीतच आहे… त्यांना मोडी म्हणायचं होतं की खरंच मोदी?… काही गोष्टी गुपित राहिलेल्या बऱ्या…

दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न?

भाजपसाठी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आश्चर्यकारकरीत्या आनंददायी होते. हरियाणा आपण जिंकू शकू असं भाजपच्या नेत्यांना वाटत नव्हतं. तिथं भाजपसाठी निवडणुकीचं काम करणारे संघाचे नेते भाजपला, तुम्ही जिंकू शकता, असं सांगत होते. भाजपच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार, संघाने हरियाणा पिंजून काढला होता. संघामुळं हरियाणा भाजपला जिंकता आला. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली असं मानलं जातंय. कोणी म्हणतं संघाने महाराष्ट्रातील निवडणूक ताब्यात घेतली होती. संघाच्या नेत्यांना विचारून भाजपचे उमेदवार निश्चित केले गेले. महाराष्ट्रात भाजपने प्रचंड विजय मिळवल्यामुळं संघाची सक्रियता मान्य करावी लागू शकते. महाराष्ट्रात संघाने वरिष्ठ स्तरावर निर्णयप्रक्रियेमध्ये सहकार्यवाह दर्जाच्या नेत्याची नेमणूक केली होती. मतदारसंघानिहाय संघाने वेगवेगळ्या नेत्यांना पाठवून बुथ स्तरावर काम केलेलं होतं. महाराष्ट्रात संघाने एक लाख बैठका घेतल्या. म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रनिहाय संघाने बैठक घेतली. आपल्या मतदारांशी थेट संपर्क करणं, त्यांना मतदानासाठी घरातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणं ही सगळी प्रक्रिया संघ परिवारातील संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजपने घडवून आणली असं म्हणता येईल. भाजपने मतदारसंघांचे अ, ब, क आणि ड असे चार वेगवेगळे स्तर केलेले होतेच. क आणि ड हे मतदारसंघ कमकुवत होते. प्रामुख्याने या दोन विभागांतील मतदारसंघांमध्ये मतांचा टक्का दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्याचं उद्दिष्ट होतं. त्यातही संघ आणि भाजपनं ओबीसीअंतर्गत विविध जातसमूहांशी थेट संवाद साधला होता. सुमारे ३५० ओबीसी जातींपैकी दीडशेहून अधिक ओबीसी जातींच्या नेते-कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी भोजनाचे कार्यक्रम आयोजित केले गेले. या समारंभांना भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित असत. हे सगळं सविस्तर मांडण्याचं कारण इतकंच की, दिल्लीत फेब्रुवारीमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून कदाचित महाराष्ट्राचा संघ पॅटर्न दिल्लीत राबवला जाऊ शकतो. दिल्लीतही संघाचे अधिकाधिक स्वयंसेवक विविध जातसमूहांच्या बैठका घेऊ शकतात. महाराष्ट्र, हरियाणाप्रमाणं विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांशीही संवाद साधला जाऊ शकतो. सेविका समिती, सेवा भारती आदी संघ परिवारातील संघटनांमधील कार्यकर्त्यांमार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील समूहांशी संवाद साधला जाऊ शकतो. भाजपला दिल्ली जिंकायची असेल तर संघाला अधिक काम करावं लागेल असं दिसतंय. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या तुलनेत दिल्लीत भाजपची पक्षसंघटना कमकुवत आहे. भाजपकडं नेता नाही, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. म्हणूनच कदाचित दिल्लीत भाजप स्वत:पेक्षाही काँग्रेसवर अवलंबून असल्याचं म्हटलं जातं. गेल्या वेळी भाजपनं केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्यापासून हजारो कार्यकर्त्यांची फौज निवडणूक प्रचारात उतरवली होती. यावेळीही हेच चित्र पाहायला मिळू शकतं.

‘आप’चा ‘गोट’

दिल्लीची विधानसभा निवडणूक आत्तापासून रंजक होऊ लागली आहे. या रंजकपटाचे नायक अर्थातच अरविंद केजरीवाल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा सुरू होतील तेव्हा राजकीय नॅरेटिव्ह बदलेल हे खरं पण, त्यापूर्वी भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये सुरू झालेली जुगलबंदी लक्षवेधी ठरू लागली आहे. दोन्ही पक्षांच्या ‘जाहिरातीं’मधले पात्र केजरीवालच आहेत. भाजपच्या जाहिरातातील पुजारी बनलेले केजरीवाल बॉलीवूडचे अभिनेते राजपाल यादव यांच्यासारखे दिसतात. भाजपनं केजरीवालांना ‘निवडणुकीपुरतं हिंदू’ ठरवलं आहे. केजरीवालांना निवडणूक असल्यामुळं पुजाऱ्यांच्या मानधनाचा कळवळा आहे, नाही तर त्यांना हिंदू धर्माशी काहीही देणंघेणं नाही. सनातन धर्माची केजरीवालांनी चेष्टा केलेली आहे, असा केजरीवालविरोधी प्रचार सुरू आहे. या कथित गैरप्रचारावर ‘आप’ने ‘गोट’चा पर्याय शोधून काढला आहे. गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम… केजरीवाल विकासाच्या राजकारणाचे ‘गोट’ आहेत. म्हणजे विकासाच्या राजकारणाचे महानायक आहेत. ‘आप’ने केजरीवालांना योद्ध्याच्या रूपात दाखवलेलं आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात सध्या भाजपची खोट आणि ‘आप’चा गोट चर्चेत आहे.

Story img Loader