क्षी जिनपिंग हे २०१३ मध्ये चीनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले, त्यानंतर सेमीकंडक्टर क्षेत्रातील चीनची महत्त्वाकांक्षा कैक पटींनी वाढली. इतर आग्नेय आशियाई देशांप्रमाणे अमेरिका नियंत्रित सेमीकंडक्टर पुरवठा साखळीशी जुळवून घेण्याऐवजी चीनला सेमीकंडक्टर उद्याोगाच्या मध्यभागी ठेवून चिप पुरवठा साखळीला जागतिक स्तरावर पुनर्स्थापित करण्याची क्षी यांची ईर्षा व त्यासाठी साम दाम दंड भेद अशा सर्व उपायांचा सर्रास वापर करून वाटेल तो मार्ग चोखाळण्याची त्यांची मानसिकता लपून राहिली नव्हती. चिपनिर्मिती उद्याोगात आपलं स्थान प्रस्थापित करण्याचे चीनचे प्रयत्न माओच्या अंतापासूनच सुरू झाले असले तरी जिनपिंग चिनी सत्ताकारणाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर या प्रयत्नांच्या आक्रमकतेत पुष्कळ फरक पडला. २०१५ सालापासून अमलात आणलेली ‘मेड इन चायना २०२५’ योजना ही त्याचीच निष्पत्ती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा