समाजवादी व्यवस्था लोकशाहीसाठीची मशागत करते. सर्वाना न्याय मिळू शकेल अशी भूमी तयार करते..

साऱ्याच मूलभूत संकल्पनांबाबत गैरसमज असतात तसेच ते समाजवादाबाबतही आहेत. अनेकदा प्रत्यक्ष अंमलबजावणी केलेल्या समाजवादी व्यवस्थेमुळे मूळ समाजवाद ही संकल्पनाच चुकीची आहे की काय, असे वाटण्याचा संभव असतो. उदाहरणार्थ, चीन किंवा रशियातील समाजवादाचे प्रारूप हेच खरे समाजवादाचे प्रारूप आहे, असे मानून विचार केला तर गैरसमज होऊ शकतात. त्यामुळेच या संकल्पनेबाबतचे गैरसमज दूर करू या..

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

समाजवाद वैयक्तिक संपत्ती संपुष्टात आणतो.

अनेकदा समाजवादी विचारवंत उत्पादनाच्या साधनांच्या लोकशाहीकरणाविषयी भाष्य करतात. संसाधने एका व्यक्तीच्या हातात असू नयेत, अशी त्यांची मांडणी असते. सुरुवातीला संविधानामध्ये संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क मानला गेला होता. नंतर तो मूलभूत हक्काऐवजी कायदेशीर हक्क मानला गेला. समाजवादी विचार वैयक्तिक संपत्ती संपवण्याची भाषा करत नाही, मात्र उत्पादनाची साधने सर्वाना मिळावीत यासाठी आग्रही मांडणी करतो. कारण समता या मूल्यावरच समाजवाद उभा आहे. मुळात समाजवादाने खासगी मालमत्ता आणि वैयक्तिक संपत्ती यातील हा फरक समजून घेतला की समाजवादाचे तत्त्व ध्यानात यायला मदत होते.

समाजवादामुळे लोक आळशी होतात.

एखाद्या व्यवस्थेची अंमलबजावणी कशी होते, यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात. समाजातील सर्वाधिक वंचित घटकापर्यंत मूलभूत बाबी पोहोचल्या पाहिजेत, यासाठी राज्यसंस्थेने सक्रिय पुढाकार घेतला पाहिजे, अशी समाजवादात अपेक्षा असते. लोककल्याणकारी आयाम समाजवादी व्यवस्थेत महत्त्वाचा आहे. त्यासोबतच समाजवादामध्ये श्रमाचे मूल्य मूलभूत आहे. त्यामुळे ‘श्रमानुसार मोबदला’ हे पायाभूत तत्त्व यात अंतर्भूत आहे. त्यामुळे लोक आळशी न बनता श्रमाच्या आधारे आपले जीवन बदलवू शकतात. ही शक्यता समाजवादी व्यवस्थेत आहे. उलटपक्षी, भांडवलशाही व्यवस्थेत मोजक्या लोकांच्या हाती सारी संसाधने असतात तसेच तिथे श्रमाची चोरीही होते. त्यामुळे भांडवली व्यवस्था आळसासाठी अधिक पोषक ठरण्याची शक्यता असते. समाजवादी व्यवस्था सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक न्याय्य बनण्याचा प्रयत्न करते. आवश्यक वस्तूवाटप ही रेवडी नसते तर लोकांचा तो न्याय्य हक्क असतो.

समाजवादाचे तत्त्व लोकशाहीविरोधी व हुकूमशाहीस प्रोत्साहन देणारे आहे.

समाजवाद समतेला अधिक महत्त्व देतो. त्यामुळे स्वातंत्र्यावर गदा येते. स्वातंत्र्य हे लोकशाहीतील मूलभूत तत्त्व असल्यामुळे लोकशाहीविरोधी वातावरण तयार होण्यास समाजवाद कारणीभूत ठरतो. समाजवादी तत्त्वांचा उद्घोष करतच स्टॅलिनसारखे हुकूमशहा निर्माण झाले. इटलीमधील मुसोलिनीही समाजवादी पक्षामध्ये होता. त्यामुळे समाजवाद हे तत्त्वच लोकशाहीच्या विरोधी आणि हुकूमशाहीस पोषक असे आहे, असा गैरसमज होतो.

प्रत्यक्षात समाजवाद आणि लोकशाही ही दोन्ही मूल्ये परस्पर-पूरक आहेत. समाजवाद समन्यायी वाटपावर भर देतो. सर्वाना सामावून घेतो. समतेला महत्त्व देतो. तसेच लोकशाहीही सर्वसमावेशकतेवर उभी असते. समाजवादी व्यवस्था लोकशाहीसाठीची मशागत करते. सर्वाना न्याय मिळू शकेल अशी भूमी तयार करते. शिवाय एकाच्याच हाती सर्व मालकीची साधने असू नयेत, यासाठी समाजवादी व्यवस्था प्रयत्नशील असते. म्हणजेच ती हुकूमशाहीस ठोस विरोध करते. हुकूमशाही आणि समाजवाद हे शब्द एका वाक्यात वापरल्यास त्यातून अंतर्विरोध निर्माण होतो. लोकशाही आणि समाजवाद हे शब्द एका वाक्यात वापरले जातात तेव्हा द्विरुक्ती होऊ शकते, इतक्या या संकल्पना परस्परांसाठी पुरक आहेत.

डॉ. श्रीरंजन आवटे 

Story img Loader