संगणकीय दृष्टी ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक अविभाज्य घटक झाली आहे. मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांत तिचा उपयोग केला जात आहे. त्यातील काही बाबींचा या लेखात उल्लेख केलेला आहे.

आपण कॅमेऱ्यापुढे उभे राहिलो की आपल्या चेहऱ्याची वैशिष्टय़े नोंदवून ती संगणकात साठवून ठेवली जातात. या माहितीच्या आधारे संगणकीय दृष्टी चेहऱ्याची ओळख करू शकते. कधी कधी आपल्याला संदेश येतो की आपला फोटो फेसबुकवर अपलोड केला आहे. तिथे याच तंत्राचा वापर केलेला असतो. चेहरा ओळखण्याच्या तंत्राचा वापर करून गुन्हेगाराची ओळख पटविता येते. गुन्हा करताना त्या व्यक्तीने मेकअप केला असेल तरी काही अडत नाही.

Loksatta kutuhal System Reliability Self Driving Artificial Intelligence
कुतूहल: प्रणालींची विश्वासार्हता
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
cravings can indicate hidden health issues and nutritional deficiencies
Nutritional Deficiencies : तुम्हाला सतत चॉकलेट किंवा चिप्स खाण्याची इच्छा होते? शरीरात ‘या’ पौष्टिक घटकांची असू शकते कमतरता; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Strong economic growth opportunities Financial sector in economics
लेख: …तरच सशक्त आर्थिक वाढीच्या भरपूर संधी!
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
BSA Star Gold 650
BSA Star Gold 650 : नव्या रेट्रो मोटारसायकलची वैशिष्ट्ये आहेत खास, जाणून घ्या काय आहे किंमत?
rbi concerns decline in bank deposits marathi news
अग्रलेख: पिंजऱ्यातले पिंजऱ्यात…
Why every sister should also promise to protect her brother this Raksha Bandhan
प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचे का केले पाहिजे रक्षण? लक्षात ठेवा या ६ महत्त्वाच्या गोष्टी

संगणकीय दृष्टीचा वैद्यकीय क्षेत्रात खूप उपयोग होतो. दवाखान्यात क्ष किरण (एक्स-रे) चित्र, एमआरआय चित्र, ईसीजी, अँजिओग्राफी, अल्ट्रासाऊंड इमेजिंग अशा अनेक प्रकारच्या चाचण्या घेण्यात येतात. त्यात मिळणाऱ्या चित्रांचे निरीक्षण करून डॉक्टर रोगाचे निदान करतात. हे काम संगणकीय दृष्टी लीलया करू शकते. विशेषत: रोगी आणि डॉक्टर एकमेकांपासून दूर असतील तर या तंत्राचा फारच उपयोग होतो. यात केवळ रोगाचे निदान केले जात नाही तर त्यावर उपाययोजना सुचविण्याचे कामदेखील संगणकीय प्रणाली करते.

आजकाल स्वयंचलित वाहनांचे प्रस्थ वाढत चालले आहे. चालकाविना चालणाऱ्या वाहनात अनेक कॅमेरे असतात. ते रस्त्यांची स्थिती, आजूबाजूला असलेल्या वस्तू, सिग्नल या सगळय़ा बाबींची माहिती वाहनातील संगणकाला देतात. त्या माहितीचे विश्लेषण करून संगणक वाहनाला चालण्याची किंवा थांबण्याची सूचना देते. विमान चालवताना ते ठरावीक उंचीवर गेले की ऑटोपायलटवर टाकले जाते.

कारखान्यात मोठय़ा प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन केले जाते. या वस्तू विक्रीला पाठविण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासणे आवश्यक असते. हे काम संगणकीय दृष्टीची मदत घेऊन करण्यात येते. यंत्राला दिलेल्या सूचनेनुसार वस्तू योग्य की अयोग्य अशी विभागणी केली जाते.

शेतात पीक उगवले की त्याची निगा राखावी लागते. गरज असेल त्यानुसार पाणी द्यावे लागते, खत घालावे लागते, कीटकनाशके फवारावी लागतात. या सगळय़ा कामांत संगणकीय दृष्टी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. शेतात ठिकठिकाणी लावलेले कॅमेरे शेतपिकांची माहिती देतात. त्याचबरोबर काय करण्याची गरज आहे याची सूचना संगणक देतो. त्यानुसार उपाययोजना करून शेतात चांगले उत्पन्न घेता येते.

उज्ज्वल निरगुडकर ,मराठी विज्ञान परिषद