शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील राजकारण तीन दिवस दिल्लीच्या पटांगणात रंगले. दिल्लीत फक्त उद्धव ठाकरेच यायचे राहिले होते, ते येऊन गेल्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले असे म्हणता येईल. काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत येण्याशिवाय पर्यायच नाही. शरद पवार दिल्लीत येतातच. महायुतीतील घटक पक्षांचा सगळाच कारभार दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरून चालतो; त्यामुळे तिथे डोके ठेवायला तीनही पक्षांतील नेते अधूनमधून येत असतात. उद्धव ठाकरेही दिल्लीत येऊन गेल्यामुळे प्रत्येकाला एकमेकांकडे बोट दाखवण्याची संधी मिळाली. उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन गेले असले तरी, त्यांच्या पक्षाचे आणि शरद पवार यांच्या पक्षाचे निर्णय मुंबईतून होणार आहेत. पण महायुतीतील घटक पक्षांना हे स्वातंत्र्य मिळणार नाही. त्यामुळे दोन आघाड्यांमध्ये जास्त परावलंबी कोण हे ओघाने आलेच! असे जरी असले तरी विधानसभा निवडणुकीमधील चित्र इतके सोपे-सरळ असणार नाही असे दिसते. राज्यात आघाड्या दोन असल्या तरी त्यांचे एकमेकांच्या हातात हात आणि पायात पाय आहेत. सोयीसुविधेनुसार कधी हात पुढे केला जाईल, तर कधी पाय आडवा घालून पाडलेही जाईल. हात देणारे कदाचित दुसऱ्या आघाडीतील असतील तर पायात पाय घालून पाडणारे स्वत:च्याच आघाडीतील असतील. खरेतर त्यामुळेच दिल्लीत कोण येते याला फार महत्त्व देण्याची गरज नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा