दिवाळी संपली असल्याने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांच्या जागावाटपाचे आकडे समोर येतील. अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली होती. त्यापैकी किती बंडखोरांची मनधरणी करण्यात आघाडी व युतीला यश आले हेही समजू शकेल. मैत्रीपूर्ण लढतींची माहिती मिळेल. रिंगणात उरलेले बंडखोर कोणाचे याचाही अंदाज येईल. या कथित अपक्षांची मदत आघाडीतील वा महायुतीतील कोणाला होऊ शकेल हे कदाचित उघड होऊ शकेल. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये, पहिल्यामधून अन्य कुठल्या तरी पक्षात अशी नेत्यांची प्रचंड वेगवान वाहतूक झाली होती, तीही थांबेल. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महिना-दीड महिन्याच्या काळात इतक्या घडामोडी आणि रस्सीखेच सुरू होती की, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून कोणी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर ‘गोंधळात गोंधळ’चा अचंबित करणारा प्रयोग दिसला असेल. देशाच्या प्रत्येक राज्यामधील विधानसभेची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण असते हे खरे; पण यंदाच्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नाट्यमयतेची तुलना कुठल्याही निवडणुकीशी होऊ शकत नाही हे मान्य करावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा