भक्तिरसाचे झरे जेव्हा दुथडी भरून वाहू लागतात तेव्हा विवेकबुद्धी खुंटीवर टांगली जाते, मग अमेरिका असो वा भारत. घृणा, अनादर आणि वैरभाव जेवढ्या तत्परतेने पसरतो तेवढ्याच तत्परतेने आपल्या झोळीत भरभरून मते पडतात, याची जाण सत्तेच्या केंद्रस्थानी येणाऱ्यांना पुरेपूर असते, म्हणूनच द्वेषाचे बी पेरून आपले राजकीय ईप्सित साध्य करण्यास हल्लीचे बरेच राजकारणी पटाईत झाले आहेत. विज्ञाननिष्ठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा नॅरेटिव्ह रेटले जाते, तेव्हा ही महासत्ता जगाचे प्रतिनिधित्व करण्यास योग्य आहे का, हा प्रश्न पडतो. विज्ञान आणि विकासाच्या कल्पनांपेक्षा भावनांना चुचकारणे सोपे असते. तीच गोष्ट अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अमेरिकेचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प करू पाहत आहेत. बहुमत सुज्ञांचे की सैतानकथांचे हे काही दिवसांत जगासमोर येणारच आहे.- परेश बंग, मूर्तिजापूर (अकोला)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकशाहीविषयी सामूहिक समज आवश्यक

‘सुज्ञ की सैतान?’ हा अग्रलेख (४ नोव्हेंबर) वाचला. जगभरातील लोकशाही देशांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरली जाणारी पद्धत आता बहुतांशी एकसारखीच झाली आहे. यामुळे, प्रचार यंत्रणेत अनेक साम्यस्थळे दिसून येतात. जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते. त्याऐवजी, आपल्याला हवे ते मुद्दे जनतेपुढे मांडून तीच देशाची व जनतेची गरज असल्याचे जनतेच्या मनावर बिंबविणे ही एक सोपी आणि प्रभावी पद्धत झाली आहे.

विरोधकांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे आणि त्यांच्या दोषांचे अतिरंजित चित्रण करणे हे तर आता निवडणुकीच्या प्रचाराचे नियमित घटक बनले आहेत. यासाठी, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा वापर ठळक झाला आहे. अगदी सुशिक्षितांची लोकशाही म्हणून गणली जाणारी अमेरिकादेखील याला अपवाद नाही. लोकशाही आदर्शाचा आणि जागतिक सहकार्याचा बालेकिल्ला म्हणून आपली स्थिती मजबूत करण्याची गरज असताना या निवडणुकीत धर्म, अंधश्रद्धा आणि राष्ट्रीयता यासारख्या संवेदनशील मुद्द्यांचा मनोवैज्ञानिक वापर करून जनतेच्या भावना उत्तेजित करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे बहुसांस्कृतिकता, स्थलांतरितांचे राष्ट्र आणि लोकशाही तत्त्वांचे प्रणेते अशी ओळख असलेली अमेरिका या मूल्यांपासून दूर जात असल्याचे दिसते. ध्रुवीकरण हा निवडणूक प्रचाराचा मुख्य भाग झाल्याने ‘आम्ही आणि ते’ असे विभाजन होत आहे. यामुळे मतदारांमध्ये भेदभाव वाढत आहे. प्रचाराच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. खरे तर, आजच्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेतील बदलांविषयी जनतेने सजग असणे गरजेचे आहे. आज लोकशाहीत केवळ मतदानाचे स्वातंत्र्य पुरेसे नाही तर लोकशाही तत्त्वे आणि मूल्यांविषयी सामूहिक समज विकसित होणेदेखील आवश्यक आहे. लोकशाहीचे खरे यश हे जनतेच्या सामूहिक जागृतीत असल्याने सुज्ञ आणि जागरूक नागरिकांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे.– हेमंत पाटीलनालासोपारा

महाराष्ट्रातील चित्र संभ्रमित करणारे

‘भाजपचा प्रचार करणार कोण?’ हा महेश सरलष्कर यांचा ‘लालकिल्ला’ सदरातील लेख (४ नोव्हेंबर) वाचला. येत्या १०-१५ दिवसांत महाराष्ट्रावर ‘न भूतो…’ प्रकारच्या गोष्टी पाहण्याची वा ऐकण्याची वेळ येणार असेच वाटू लागले आहे.

महायुतीकडे गेल्या दोन-अडीच वर्षांत केलेल्या कामांबाबत सांगण्यासारखे काही नाही तर महाविकास आघाडीतील साऱ्या पक्षांना, तेच आघाडीची गाडी ओढताहेत या कल्पनेने ग्रासल्याचे दिसते. सत्तेत असल्यास ‘काय काय’ करता येते हे भाजपने गेल्या दहा वर्षांत दाखवून दिल्याने सारीच मंडळी ही शेवटची संधी असल्याप्रमाणे मैदानात उतरलेली दिसतात. मतविभाजनासाठी बहुतेक अपक्षांची भिस्त त्यांच्या पुरस्कर्त्यांवर आहे. असली कोण आणि नकली कोण, असे काहीसे संभ्रमित करणारे चित्र दिसते. थोडक्यात, महाराष्ट्रात एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभ्या असणाऱ्या दोनही आघाड्या वास्तविक अशक्य ते शक्य करून दाखवू शकणाऱ्यांच्या शोधात दिसतात. सामान्य नागरिकांना मात्र पुढील २० दिवस सहनशीलतेची परिसीमा गाठावी लागणार आहे.– शैलेश पुरोहितमुलुंड (मुंबई)

राजकारणातील धर्माचे महत्त्व वाढले

‘सुज्ञ की सैतान?’ हा अग्रलेख (४ नोव्हेंबर) वाचला. अमेरिकेतील राजकारणाची भारतातील राजकारणाशी तुलना करता येईल. भारतातही धर्म, समाजमाध्यमे आणि स्थलांतरितांविषयीच्या मुद्द्यांवर राजकारण होताना दिसते. ट्रम्प यांच्या विचारसरणीची काहीशी छाया जगभरच्या राजकारणातही पडलेली दिसून येते. धर्म आणि सामाजिक ओळख हे सध्या राजकारणातील सर्वांत महत्त्वाचे मुद्दे ठरू लागले आहेत. पर्यावरणीय प्रश्नांबाबत अमेरिकेप्रमाणेच भारतातही काही प्रमाणात उदासीनता दिसून येते. निवडणुकीच्या प्रचारात पर्यावरणाला महत्त्व देण्याऐवजी इतर तात्कालिक विषयांवर भर दिला जातो. त्यामुळे, या निवडणुकीतील निर्णय जगभरातील लोकांच्या मतांवर परिणाम करू शकतो, भारतातील वाचकांनी, भविष्यातील जागतिक राजकीय बदलांच्या संदर्भात अधिक सजग होण्याची गरज आहे.- फ्रान्सिस आल्मेडानिर्मळ (वसई)

मनसेसाठी ‘प्रथमग्रासे मक्षिकापात:’?

बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मनात येईल त्याला उमेदवारी देत, असे पुष्कळदा घडल्याचे ऐकिवात आहे. आज ते आठवायचे कारण राज ठाकरे यांनीही त्याच पद्धतीने माहीम विधानसभा मतदारसंघातून आपल्या मुलाची- अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर केली. त्या मतदारसंघात युतीकडून कोण उमेदवार असेल याची फिकीरही त्यांनी केली नाही. तिथे शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यामान आमदार सदा सरवणकर रिंगणात आहेत. त्यातच वर शिंदेंना खिजवण्यासाठी ‘निवडणुकीनंतर मनसेच्या पाठिंब्याने भाजपचाच मुख्यमंत्री असेल,’ असे जाहीरही केले. संपूर्ण महाराष्ट्रात सव्वा टक्का मते घेणाऱ्या पक्षाचा हा आत्मविश्वास थक्क करणारा आहे. सदैव हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला आतुर असलेला भाजप सरवणकरांनी अमित ठाकरेंसाठी माघार घ्यावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर दबाव आणत होता.

आधीच अजित पवार युतीत सहभागी झाले, त्यात आता राज ठाकरेंसारखा आणखी एक भिडू वाढवण्याची गरजच काय होती? त्यातच ‘कार्यकर्त्यांच्या मनाचाही विचार केला पाहिजे’ असे ‘द्रष्ट’ वाक्य उच्चारून सदा सरवणकरांना ‘माघार घेऊ नका’ असा जाहीर संदेशही देण्यात आला. राज ठाकरे यांनी ‘गेल्या निवडणुकीत वरळी मतदारसंघातून पुतण्या आदित्य उभा राहिला तेव्हा मी आमचा उमेदवार तिथे दिला नव्हता,’ असा सूर आळवला. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महेश सावंत यांना उद्धव ठाकरेंनी माघार घ्यायला लावावी, अशी अपेक्षाही अप्रत्यक्षपणे व्यक्त केली गेली. मात्र अखेर सारेच मुसळ केरात गेले आहे. त्यामुळे भाजपने आतून अमित ठाकरे यांना मदत केली तर शिंदे सेनेचे सरवणकर व अमित ठाकरे यांच्यात युतीच्या मतांचे विभाजन होईल व महेश सावंत यांचा मार्ग सुकर होईल. असे झाले तर अमित ठाकरेंसाठी ‘प्रथमग्रासे मक्षिकापात:’ची दाट शक्यता दिसते.– सुहास शिवलकरपुणे

पेराल तेच उगवेल!

‘आज माघारवार’ हे वृत्त (लोकसत्ता- ४ नोव्हेंबर) वाचले. मराठीतील काही म्हणी कालातीत असल्याची प्रचीती अधूनमधून येते. ईडी, सीबीआयचा धाक दाखवून, आमिषे दाखवून दोन-दोन पक्षांतील काही नेत्यांना बंड करण्यास भाग पाडले गेले. त्यामागचा स्पष्ट हेतू ते पक्ष फोडून तेव्हाचे सरकार उलथवून टाकणे हा होता. हे सारे नाट्य घडवून आणणाऱ्यांवर आता अर्ज माघारीसाठी त्याच बंडखोर नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ आली आहे. याला काळाने उगवलेला सूड म्हणावे की काव्यगत न्याय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न पण त्या निमित्ताने ‘पेराल तेच उगवेल’, ‘करावे तसे भरावे’, ‘विषारी वृक्षाला विषारीच फळे’ अशा मराठी म्हणींची कालातीतता प्रत्ययास येते. करमणूक वाटावी असा भाग म्हणजे महायुतीत ज्यांना निवडणुकीची तिकिटे दिली आहेत त्यांच्यापैकी काहींचा त्याच सरकारच्या घटक पक्षांनी प्रचारास उघडपणे नकार देणे, असे कधी घडले आहे काय?- श्रीकृष्ण साठेनाशिक