हिरवं सोनं म्हणून बांबूची ओळख करून दिली जाते. तृणवर्गीय बहुवर्षीय पर्यायी पीकपध्दती म्हणून बांबू लागवडीकडे पाहण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. बांधकाम क्षेत्रात आवश्यक असलेल्या लाकडाला पर्याय म्हणून बांबूकडे पाहिले जात असताना त्याची मागणीही वाढत चालली असून शेतीमध्ये शाश्वत उत्पन्नासाठी बांबू लागवडीकडे पाहिले जात आहे. बहुवर्षीय पीक असल्याने आणि बदलत्या वातावरणाबरोबरच रोगराईचा धोकाच नसल्याने शेतकऱ्यांनी आता बांबू लागवडीकडे वळण्याची गरज आहे. एक वेगळा प्रयोग म्हणूनही याकडे पाहिले पाहिजे.

मानवी जीवनात खाद्यान्न म्हणून ज्याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो ती सर्व पिके तृणवर्गीय आहेत. ज्वारी, मका, बाजरी, गहू ही मुख्य पिके एक प्रकारे गवताचाच प्रकार आहे. याचबरोबर ऊसही गवतच म्हणून ओळखले जाते. याच पध्दतीने बांबूसुध्दा एक गवताचाच प्रकार आहे. अनादी काळापासून या बांबूचा वापर प्रामुख्याने घरासाठी केला जात आहे. झोपडी बांधण्यापासून ते आधुनिक काळातील बांबू हाऊसपर्यंत बांबूचा वापर केला जात आहे. याशिवाय घरामध्ये वापरण्यात येत असलेल्या बैठक व्यवस्थेसाठीही बांबूचा वापर केला जात आहे. तसेच बांबूच्या कोवळ्या कोंबाचा वापर भाजीसाठी आणि लोणच्यासाठीही करण्यात येतो. बांधकाम क्षेत्रात बांबूचा वापर अमर्याद पध्दतीने केला जातो. तसेच इंधन निर्मितीबरोबरच कागद उद्याोगामध्येही बांबूचा वापर होत असल्याने बाजारातील बांबूची मागणी वाढतच आहे. आजच्या घडीला बांबू उद्याोगातील देशांतर्गत उलाढाल २५ हजार कोटींची आहे.

Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Narendra modi urban naxal
मोदीजी, एकसाचीपणाचे तुमचे उद्दिष्ट असाध्यच नव्हे, अयोग्यही आहे…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!

बांबू हे जलदगतीने वाढणारे काष्ठ गवत आहे. माणगा बांबू अशी याची ओळख असली तरी राज्यात चिवा, माणगा, कर्नाटकात सिमे, बिदूर गोव्यात कोंडवा तर केरळमध्ये ओविये या स्थानिक नावाने बांबूला ओळखले जाते. उष्ण दमट प्रदेशात याची वाढ चांगली होत असली तरी नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता उपजतच असल्याने पाण्याचा निचरा होणाऱ्या काळ्या, लाल मातीतही बांबूची उपज चांगली होते. पाणलोट, पाणस्थळ जमिनीवर सागरी किनारपट्टीत याची लागवड लाभदायी ठरते. शेताला नैसर्गिक सजीव कुंपन म्हणूनही याची लागवड करता येते. यामुळे पर्यावरण संतुलनालाही चांगली मदत होते. हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यासाठी बांबू लागवडीची मोलाची मदत होते.

बांबूमधील माणगा ही प्रजाती काटेविरहीत, सुटसुटीत काठ्या यामुळे प्राधान्याने या जातीचा उपयोग लागवडीसाठी केला जातो. याची उंची दहा ते बारा मीटरपर्यंत असते, टोकाशी सरळ, जास्त फांद्या नसलेले ताठ, मजबूत आणि भरीवपण असतो तर पेरातील अंतर पंधरा ते ३० सेंटीमीटर आणि व्यास अडीच ते सहा सेंटीमीटर असतो.

लागवड व व्यवस्थापन

बांबू लागवड पावसाळ्यात जून-जुलै महिन्यात किंवा सिंचन सुविधा असेल तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केली तर चालते. ३ बाय ३ मीटर किंवा १० बाय १० मीटरवर लागवड केली तर खरीप व रब्बी हंगामाची पिके घेता येतात. लागवडीसाठी दोन बाय दोन फुटाचा खड्डा काढून पाच ते दहा किलो शेणखत अथवा गांडूळ खत १०० ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांचे मिश्रण घालावे, तसेच बुरशीनाशक, वाळवी नाशकाचा वापर करून तयार रोपे लावावीत. गरजेनुसार दोन वेळा खुरपणी करावी. आठवड्यातून एकवेळ पाणी द्यावे.

बांबूची काढणी कोंब आल्यानंतर तिसऱ्या वर्षापासून करता येते, मात्र पूर्ण वाढ होण्यासाठी चार वर्षे वाट पाहावी लागते. त्यापुढे तसाच बांबू ठेवला तर ठिसूळपणा वाढण्याचा धोका असतो. चांगली देखभाल असलेल्या बेटाकडून तीन चार वर्षानंतर सरासरी आठ ते दहा बांबू मिळतात, तर पाच ते पंधरा काठ्या मिळतात. आजच्या बाजारभावाने प्रत्येक काठीचा दर ५० रुपयांच्या पुढे आहे. एक एकर बांबू लागवडीपासून दर वर्षी ७० ते ८० हजाराचे उत्पन्न मिळू शकते. तसेच बांबू मिशनने बारपूर इंडस्ट्रीशी केलेल्या करारानुसार बांबू खरेदीसाठी शाश्वत बाजारपेठ असून या ठिकाणी साडेतीन हजार रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला आहे. बहुवर्षीय पीक असल्याने उत्पन्न दरवर्षी मिळते. एकदा लागवड केली की दर वर्षी मशागत, पेरणी, मेहनत, मजुरी यावर खर्च करावा लागत नाही.

बांबू लागवड बिया, शाकीय, कंदाद्वारे, उतिसंवर्धित रोपाद्वारे केले जाते. शाकीय प्रजननसाठी कंद, खोड, फांदी याचा वापर करता येतो. सामाजिक वनीकरण विभागाकडून शाकीय पध्दतीचा प्रामुख्याने वापर रोपनिर्मितीसाठी केला जातो.

गृहबांधणीसाठी नैसर्गिक साधनांचा वापर वाढत चालला असून पर्यावरणपूरक म्हणून बांबूचा वापर वाढताच राहणार आहे. यामुळे बांबू लागवडीला भविष्यात चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. हे ओळखून शेतीसाठी सजीव कुंपन म्हणून बांबूची लागवड एक शाश्वत उत्पन्नाचा स्राोत म्हणून याकडे पाहिले पाहिजे. आटपाडी तालुक्यात यावर्षी एक हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे.

माणगा बांबूची वैशिष्ट्ये

● भरीव बांबू म्हणून ओळख.

● प्रबळ पेरांची रचना, नैसर्गिक घनता, टिकण्यासाठी टणकपणा.

● सोलण्यासाठी सुलभ असल्याने विणकामासाठी उत्कृष्ट.

● लागवड व देखभाल खर्च कमी.

उपयुक्तता

● विणकाम व हस्तकलेच्या वस्तू निर्मितीसाठी.

● कागद, लगदा उद्याोग, बांधकाम उद्याोगामध्ये स्लॅबच्या कामांना आधारासाठी.

● द्राक्ष, टोमॅटो, केळी, मिरचीसह वेलवर्गीय भाज्यांच्या आधारासाठी.

● पिकांसह, राहत्या घरांना सजीव कुंपण.

● प्रक्रिया केलेल्या बांबूंचा वापर हरितगृहे, उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये केला जातो.

● नदीकाठी, ओढ्याकाठी होत असलेली जमिनीची धूप थोपविण्यासाठी बांबू उपयुक्त ठरतो.

digambarshinde64 @gmail. com

Story img Loader