केशव उपाध्ये
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा खोटा प्रचार करून मुस्लीम समाजात निर्माण केलेल्या भयगंडामुळे महाविकास आघाडीला अधिक जागा मिळाल्या. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कुशलतेने रणनीती आखली आणि रणांगणात उतरले. महायुती सरकारच्या कामांचा धडाक्याने प्रचार करत कामाच्या आधारावर जनतेकडे कौल मागितला. त्यांची रणनीती यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. महायुतीचा विजय हा फडणवीस नामक योद्ध्याचाही विजय आहे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधानसभा निवडणुकीत महायुतीला ‘न भूतो, न भविष्यती’ असा विजय मिळाला आहे. हा विजय आणि एकूणच विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेक अर्थांनी वेगळा, संस्मरणीय ठरतो. साडेपाच महिन्यांपूर्वी म्हणजे ५ जून, २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ३१ तर महायुतीला १७ मतदारसंघांत यश आले. त्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने पूर्णपणे फिरले आहे आणि या निकालाच्या आधारे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धुव्वा उडणार, अशी हवा तयार केली गेली. निकालांचे खोलात जाऊन विश्लेषण करणे गरजेचे आहेच, मात्र वरवर जरी अभ्यास केला तरी हे स्पष्ट होते की लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी महायुतीला स्पष्टपणे नाकारले, असे चित्र नव्हते.

महाविकास आघाडी १५५ तर महायुती १२५ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अनेक कंगोरे होते. त्या निकालाचा महाविकास आघाडीने विशेषत: ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सोयीस्कर अर्थ काढत महायुतीला मतदारांनी झिरकारले, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या निकालानंतर महाराष्ट्रात आपली सत्ता आलीच अशा आविर्भावात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते वावरत होते. या सर्वांना मतदारांनी सणसणीत चपराक दिली. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून राज्यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत जातीच्या आधारावर मतदारांचे धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. जरांगे यांनी राज्यभर मेळावे घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर असभ्य भाषेत टीका करत भारतीय जनता पक्षाची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला खतपाणी घालण्याचे काम इमाने इतबारे केले. जरांने यांनी आपल्या समर्थकांकरवी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करून या उमेदवारांना पाडण्याचा आदेश दिला होता. अशा अत्यंत प्रतिकूल वातावरण भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे होते.

कठीण प्रसंगात खऱ्या कर्णधाराची, नायकाची कसोटी लागते. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिकूल वातावरणाचा संधी म्हणून वापर करत प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीला एकहाती लोळवले. या निवडणुकीत फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होणार, अशी स्वप्ने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिवसाढवळ्या पडू लागली होती. या सर्वांना देवेंद्र फडणवीस पुरून उरले. २०१९नंतर फडणवीस हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार व काँग्रेसच्या हिटलिस्टवर होते. या वर्षात फडणवीस यांना असभ्य, अवामनकारक भाषेतील टिंगलटवाळीचा सामना करावा लागला.

२०१९ च्या निवडणुकीनंतर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या विश्वासघातावर कडाडून टीका करणे सुरू केले होते. त्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघातामुळे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही. लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर फडणवीस यांच्या पुढे संघटनेचे मनोबल टिकवण्याचे आणि कार्यकर्त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज करण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे बारकाईने विश्लेषण करून महायुती आणि महाविकास आघाडीतील मतांचा फरक अवघ्या पाऊण टक्क्यांचा आहे, हे दाखवून दिले होते. महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा फक्त दोन लाख मते अधिक मिळाली आहेत, हे दाखवून देत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे खोडून काढले होते.

लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा खोटा प्रचार करून मुस्लीम समाजात निर्माण केलेला भयगंड यामुळे महाविकास आघाडीला अधिक जागा मिळाल्या. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी काय करावे लागेल, याची रणनीती कुशलतेने तयार करत देवेंद्र फडणवीस रणांगणात उतरले होते. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादमुळे भारतीय जनता पक्षाचा- महायुतीचा किमान १२ मतदारसंघांत पराभव झाला, हे आकेडवारीनिशी दाखवून देत फडणवीस यांनी फतव्याच्या राजकारणाची बाजू मतदारांपुढे आणली. धार्मिक आधारावर होणारे मतदान हे राष्ट्रहिताविरोधातच असते, हे सप्रमाण सिद्ध करत फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी तयार केली. लोकसभा निवडणुकीत संविधान बदल आणि सीएएची भीती या दोन मुद्द्यांच्या आधारे विरोधकांनी खोट्या प्रचाराची पार्श्वभूमी तयार केली होती. विधासनभा निवडणुकीत मात्र फडणवीस यांनी आपण तयार केलेल्या खेळपट्टीवर महाविकास आघाडीला खेळायला लावले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या व्होट जिहादची पुनरावृत्ती करण्यासाठी उलेमा बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी जातीने मैदानात उतरले होते. उलेमा बोर्डाकडून महाविकास आघाडीला अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वणी देवस्थानासह महाराष्ट्रातल्या अनेक सार्वजनिक जागा वक्फ बोर्डाच्या नावे कराव्यात, मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, दंगलीतील मुस्लीम आरोपींवरचे खटले रद्द करावेत आदी मागण्या या नोमानी महाशयांनी केल्या होत्या. या फतव्याच्या राजकारणाच्या संकटामुळे महाराष्ट्रावर आणि संपूर्ण देशावर होणाऱ्या भयावह परिणामांची जाणीव करून देण्यात देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकसभा निवडणुकीत संघटना पातळीवर ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या दूर करून फडणवीस यांनी महायुती सरकारच्या कामांचा धडाक्याने प्रचार करत कामाच्या आधारावर जनतेकडे कौल मागितला. त्यांची ही रणनीती पूर्णपणे यशस्वी ठरली, असे सिद्ध झाले. महायुतीचा विजय हा फडणवीस नामक योद्ध्याचाही विजय आहे. आपल्यावरील टीकेचे हलाहल पचवत फडणवीस यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली. ‘जबड्यात घालुनी हात मोजितो दात, जात ही आमची… पहा पाने चाळून आमच्या इतिहासाची’ या काव्यपंक्ती प्रत्यक्षात आणून दाखविल्या.