‘लाश वही है…’ हा अग्रलेख (लोकसत्ता- २३ जानेवारी) वाचला. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील गटारांतून कचरा काढण्याचा घोटाळा बाहेर आला होता. ज्या वाहनांच्या नंबरवर बिले पास झाली, त्यातील अनेक नंबर रिक्षा, स्कुटर्सचे निघाले. जेवढा कचरा टाकल्याचे बिलांमध्ये उल्लेख होते तेवढा कचरा प्रत्यक्षात कुठे टाकला याबद्दल व्यवस्थित माहिती नव्हती. मागे महाराष्ट्रात काही कोटी वृक्षारोपण झाल्याचे दावे केले गेले, ज्यासाठी काही कोटींचा खर्च दाखवला गेला. एवढ्या प्रमाणात नेमके कुठे वृक्षारोपण झाले त्याची माहिती विचारली असता दिली गेली नाही. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने यासंदर्भात टीका केली असता सरकारला नाईलाजाने माघार घ्यावी लागली. मुंबईतील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला व त्याची चौकशी करा असे पत्र एकदा मुंबईच्या महापौरांनी पालिका आयुक्तांना दिले. पुढे त्याचे काय झाले, माहीत नाही. फार पूर्वी महाराष्ट्र भूविकास बँकेतर्फे असंख्य लिफ्ट इरिगेशन योजनांना कर्जवाटप केले गेले. त्यातील बहुतांश योजना केवळ कागदावरच होत्या. अनेक विहिरी गायब झाल्याचे आपण नेहमी वाचतो. असे म्हणतात, यूपी, बिहारमध्ये तर रस्ते अथवा पूलही गायब होतात, कारण ते केवळ कागदावर असतात. सत्ताधारी बदलतात, घोटाळे कायम राहतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा