बीडमधील जवळपास सर्वपक्षीय, मूक मोर्चाची बातमी (रविवार लोकसत्ता – २९ डिसेंबर) वाचली. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी यात दुमत नाही. परंतु ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवले जात आहे त्यामुळे या प्रकरणी न्याय मिळवून देण्यापेक्षा राजकारणातील हिशेब चुकते करण्याची मनीषा तर वरचढ होत नाही ना अशी शंका येते. याचे कारण असे की धनंजय मुंडे हे ‘अपवाद’ नसून, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाळू माफियांना वा गुत्तेदारांना वा अत्याचारींना पाठीशी घालणारे राजकारणी आणि त्यांची ‘जी हुजुरी’ करणारे पोलीस अधिकारी वारंवार आढळून आले आहेत. संतोष देशमुख प्रकरणामुळे उजेडात आलेली बीड जिल्ह्यातील दादागिरी आश्चर्यजनक वाटू नये, कारण नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंतची परिस्थिती थोड्याफार फरकाने एकसारखीच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संवेदनशील प्रकरणात तक्रार नोंदवून घेण्यापूर्वी आमदार / खासदारांचा कल अजमावण्याची जणू सवयच तपास यंत्रणांना लागली आहे की काय? तसे असेल तर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असे म्हणावे लागेल. महाविकास आघाडीची अडीच वर्षे वगळता गेली दहा वर्षे महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत आणि त्यांची कार्यक्षमता वादातीत आहे. तरीही भीमा कोरेगाव ते मस्साजोग व्हाया बदलापूर या दीर्घ प्रवासातील गृह खात्याची वाटचाल स्पृहणीय नव्हे तर निंदनीय असेल तर पाणी नेमके मुरते कुठे? पोलिसांना शिस्त लावण्यात सरकार कमी पडतेय की शिस्त न लावण्यातच सरकारचे हित आहे याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे.

हेही वाचा : अन्यथा : ‘जीन’थेरपी!

संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत असतील तर ते स्वागतार्ह आहे. ही एकजूट तोवर टिकावी जोवर आरोपीला अटक करा म्हणून कुणावरही मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये.

● वसंत शंकर देशमाने, परखंदी. (ता. वाई, जि. सातारा)

राजकीय दबावामुळे यांना अटक होत नाही?

संतोष देशमुख यांच्या खुन्याला १८ दिवस उलटल्यानंतरही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील शिवपुतळा कोसळल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या जयदीप आपटेला अटक करण्यास दहा दिवस लागले. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा दोषी अक्षय शिंदेला व सहआरोपी शाळेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यासही बरेच दिवस लागले होते. गुन्ह्यातील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने संतापाची तीव्र लाट उसळली जाते व आंदोलने होतात. पोलिसांना दोषींना अटक करण्यास वेळ का लागतो? यामागे राजकीय हस्तक्षेप असतो का? राजकारण असते का? राजकीय दबावामुळे यांना अटक होत नाही का? पोलिसांची तपास यंत्रणा काय करते? पोलिसांचा तपास योग्य दिशेने होत नाही का? फरार आरोपीला पडकण्यास लागणारा जास्त वेळ असल्याने राज्यातील पोलिसांच्या कारवाईला दोष दिला जात आहे. पूर्वी पोलीस आरोपींना तात्काळ पकडत असत. मग हल्ली आरोपीला अटक उशिरा का होते? गंभीर गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याच्या तळाशी तपास यंत्रणांनी लवकरात लवकर जावे आणि गुन्हेगारांना त्वरित शिक्षा व्हावी ही अपेक्षा समाजाने बाळगावी की नाही?

● विवेक तवटे, कळवा (ठाणे)

लालबहाद्दूर शास्त्री यांची आठवण ठेवा…

संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात त्यांच्या हत्येला जबाबदार असलेले वाल्मीक कराड यांना अटक करा मागणी होत आहे. सगळा गाव ज्या वेळी कराड यांच्या विरोधात उठतो त्या वेळी त्यात काही तथ्य असणारच. वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे या मंत्रीमहोदयांचे अगदी जवळचे मानले जातात. तेव्हा मुंडेंनीही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. यावरून आठवते की लालबहाद्दूर शास्त्री नेहरू मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते त्या वेळी उत्तरेकडे कुठेतरी रेल्वे अपघात झाला. केवळ ते रेल्वेमंत्री होते म्हणून जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे आपला या खुनाशी काहीही संबंध नाही हे सिद्ध होईपर्यंत मंत्रीपदाचा राजीनामा देणार काय?

● सुधीर ब. देशपांडे, ठाणे</p>

बेगडी आदराचे राजकारण

‘लोकसत्ता रविवार विशेष’मधील (२९ डिसेंबर) सुधींद्र कुलकर्णी यांचा ‘स्वपक्षाने पंख छाटलेला सक्षम पंतप्रधान’ हा लेख त्यांच्या मनातली काँग्रेसबद्दल असलेली द्वेष आणि गांधी कुटुंबाबद्दलच्या तिरस्काराची भावनाच व्यक्त करणारा आहे. मनमोहन सिंग यांच्या स्वच्छ, पारदर्शक, देशउभारणीच्या कामामुळे त्यांच्याविषयी वाईट काही लिहिता येत नाही. म्हणून ओढूनताणून काँग्रेसला दोष देण्यासाठी लेख लिहिला की काय अशी शंका येते. काँग्रेस पक्षानेच मनमोहन सिंग यांचे नेतृत्व सार्वजनिक केले व देशासाठी त्यांचा लाभ करून घेतला, हे कुलकर्णी सोयीस्करपणे विसरले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यांना पंतप्रधानांचे सल्लागार नेमण्यात आले. त्यापूर्वी काँग्रेसनेच त्यांना महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी दिली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि देशाचे अर्थमंत्री काँग्रेसनेच केले होते. १९९१ पासून २०२३ ला स्वत: मनमोहन सिंग यांनी प्रकृतीच्या कारणास्तव नकार देईपर्यंत सलग ३३ वर्षे त्यांना खासदार बनविणारा काँग्रेस पक्षच होता. २००४ साली त्यांना पंतप्रधान बनवणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच होत्या. त्या वेळी संघ व भाजप सिंग यांच्याविरोधात आग ओकत होता. मौनी बाबा, रेनकोट घालून अंघोळ करणारे, दुबळे पंतप्रधान अशी अभद्र, गैरलागू टीका कोणी केली होती हेही सर्वांना माहीत आहे. सुधींद्र कुलकर्णी यांना मनमोहन सिंग यांच्याबद्दल आदराचा आताच आलेला पुळका बेगडी ठरतो, तो त्या वेळी त्यांनी ती टीका न रोखल्यामुळे.

● राजेंद्र शेलार, सातारा

‘मध्यमवर्गीय’ राजकारणाची गत…

‘स्वपक्षाने पंख छाटलेला सक्षम पंतप्रधान’ हा लेख (२९ डिसेंबर) वाचला. राजकीय पार्श्वभूमी – व राजकीय नेतृत्व म्हणावे असा पिंड – नसताना सुशिक्षित मध्यमवर्गीय म्हणावेत असे डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्री व नंतर पंतप्रधानही झाले. त्यांच्या करकीर्दीतून अशा व्यक्तींची बलस्थाने व मर्यादा दोन्ही पुढे येतात असे वाटते. लोकांमधून निवडणूक जिंकण्यासाठी ‘जे जे’ म्हणून करावे लागते ते अशा व्यक्तींना आवडत नाही व जमतही नाही. त्यामुळे डॉ. सिंग कायम राज्यसभेतच राहिले. नरसिंह राव यांनी त्यांना अर्थमंत्रीपदी ‘नेमले’ कारण देशाची आर्थिक स्थिती तेव्हा अत्यंत नाजूक झालेली असल्यामुळे ‘कुशल शल्यविशारदा’चीच गरज होती. सत्ताधारी व विरोधकांना डॉ. सिंग यांना त्यांचे काम करू द्यावे‘च’ लागले कारण दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता! पंतप्रधान म्हणूनही त्यांनी आर्थिक बाजू उत्तम सांभाळली; परंतु राजकीय नेतृत्वाचा धाक निर्माण करण्याची त्यांची वृत्तीच नव्हती. त्यामुळे नरसिंह राव यांनी जसे ‘समांतर सत्ताकेंद्र’ निर्माण होऊच दिले नाही तसे काही करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा वा इच्छाही नसावी.

हेही वाचा : भूगोलाचा इतिहास : देणे भूगोलाचे!

कशा प्रकारच्या व्यक्तींनी देशाच्या राजकारणात येण्याची खरी गरज आहे, तशा व्यक्ती सक्रिय राजकारणात येणे का टाळतात, त्यांना निवडणूक जिंकणे का शक्य होत नाही, त्यांना राजकारणात ‘आणल्यास’ त्याचे फायदे-तोटे काय होतात, रूढार्थाने ज्यांना ‘कसलेले राजकारणी’ म्हटले जाते ते अशा व्यक्तींना कशी वागणूक देतात, कुठल्या गोष्टी ते सहन करतात वा करू शकत नाहीत, या व अशा अनेक गोष्टींचे प्रतिबिंब डॉ. सिंग यांच्या कारकीर्दीत पडलेले दिसते. कशा व्यक्ती राजकारणात येणे हे आपल्याकरताच फायद्याचे आहे, व त्याकरता आपण काय केले पाहिजे याचा विचार सामान्य मतदारांनी करण्याची गरजही त्यातून अधोरेखित होते असे वाटते.

● प्रसाद दीक्षित, ठाणे

‘मै मूर्ख नही हूं’

‘रविवार विशेष’ (२९ डिसें.) पानावरील ‘जगण्याच्या रियाजातूनच कलाकार घडतो…’ हे पंकज त्रिपाठी यांचे मत, ‘आपण आयुष्यभर अभिनय करत असतो’ हे त्यांचे म्हणणे सहजपणे गळी उतरवणारे आहे. कलाकाराची स्वत:ची अभिनयशैली, अभिनयातील देहबोली विकसित होण्यासाठी रोजच्या आयुष्यातील ‘जगण्याची कला’ आवश्यकच आहे. पंकज त्रिपाठींच्याच आजकालच्या सायबर गुन्ह्यांपासून सावध करणाऱ्या जाहिरातीमधून ते जेव्हा ‘मै मूर्ख नही हूं’ हे वाक्य बोलतात तेव्हा ते आक्रमक वा अतिशयोक्त वाटत नाही, पण योग्य तो संस्कार मनावर कोरणारे नक्कीच असते. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा उपक्रमाद्वारे अशा दिग्गज कलाकारांकडून नवोदितांना मार्गदर्शन देण्याचे उत्तम काम होते आहे!

● श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे