‘बडबडे बुडबुडे!’ हा अग्रलेख (११ नोव्हेंबर) वाचला. माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राचे जहाज बुडण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला हे फेसबुक, ट्विटर या अमेरिकी कंपन्यांनी केलेल्या कर्मचारी कपातीवरून स्पष्ट होते. या क्षेत्राकडून नोकरीची अपेक्षा असणाऱ्या नवोदितांनी याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. दुसरी गोष्ट म्हणजे रोजगारक्षम उद्योग कसे निर्माण करणार? आणि कारखानदारीला बळ देण्यासाठी काय नियोजन करणार? कारण बाजारात चीनने ‘वापरा आणि फेका’ स्वरूपाच्या अल्प दरातील वस्तूंचे मोठे आव्हान येथील छोटय़ा उद्योजकांसमोर उभे केले आहे. अशा परिस्थितीत नव्याने उद्योग चालू करण्याच्या विचारापासून नवीन उद्योजक, कारखानदार दूर राहतात. लहरी वातावरण आणि त्यामुळे शेतमालाची होणारी हानी, तसेच मालास रास्त भाव मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कृषी क्षेत्राकडे ओढा कसा वाढवणार, असा प्रश्न आहे. भारताला आर्थिक बळकटी प्राप्त करण्यासाठी येथील बाजारपेठेतून चीनला हद्दपार करून चीनच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या पाहिजेत. तसे झाल्यास येथील उद्योजकांना उभारी मिळेल आणि लोकांना काम मिळेल.

जयेश राणे, भांडुप, मुंबई

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?
nda government set up a national commission to review the performance of constitution zws
संविधानभान : संविधानाच्या कामगिरीचा आढावा 
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप

रोजगार संधींचा बुडबुडा फोडता येईल

‘बडबडे बुडबुडे’ हे संपादकीय वाचले. यातील अंतिम परिच्छेद अत्यंत महत्त्वाचा आहे. अधिकाधिक रोजगारक्षम उद्योग, कारखानदारी, कृषी क्षेत्राला प्राधान्य या सेवांमध्ये मनुष्यबळ, रोजगार उपलब्ध होण्याची संधी जास्त प्रमाणात असते. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांतील एमआयडीसी, आयटी पार्क, सेझ, टेक्स्टाइल्स पार्क यांच्या ४० हजारांच्या वर छोटय़ामोठय़ा कारखान्यांत १० लक्ष रोजगार उपलब्ध आहे.

गेल्या ५० वर्षांतील कापडगिरणी, हातमाग, सूतगिरणी, साखर कारखाने, सिमेंट कारखाने यांची आजची स्थिती समाधानकारक नसून वाईट आर्थिक अवस्थेत आहेत. या सर्व कारखान्यांची डागडुजी, आर्थिक बळ देऊन नूतनीकरण आणि गुंतवणुकीद्वारे येणारे नवीन प्रकल्प यांचा ताळमेळ साधला तर रोजगार संधी उपलब्धता करता येईल. त्याप्रमाणेच कृषी क्षेत्रात छोटय़ा शेतकऱ्यांसाठी स्थानिक पातळीवर कॉन्ट्रॅक्ट शेतीचा पर्याय स्वीकारून नांगरणी ते पीकविक्री करण्याची व्यवस्था निर्माण करून, एक ठरावीक उत्पन्न शेतकऱ्यास मिळेल, जेणेकरून कर्ज घेण्याची वृत्ती कमी होऊन स्थिरता प्राप्त होईल. या रोजगार उपलब्धतेवर, लोकांची क्रय शक्ती वाढून पुढची निवास, व्यापार, मनोरंजन, पर्यटन या क्षेत्रांची अर्थव्यवस्था हळूहळू मजबूत होण्यास विलंब लागणार नाही. 

विजय आप्पा वाणी, पनवेल

उत्पादने, बौद्धिक संपदेकडे आयटीचे दुर्लक्ष

‘बडबडे आणि बुडबुडे’ हा अग्रलेख (११ नोव्हेंबर) वाचला. अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गज कंपन्या (नजीकच्या काळात नफ्यात घसरण झाली असली तरी) नफा कमावत आहेत. त्यांचे बाजारमूल्य कितीही वर-खाली झाले तरी त्याचा कंपनीच्या कामगिरीशी प्रत्यक्ष संबंध मर्यादित स्वरूपाचाच असतो. अशा कंपन्यांनी कर्मचारी कपात करणे हादेखील त्यांच्या एकूण कार्यपद्धतीचा भाग म्हणून समजून घेता येतो.

रुपयाचाही नफा कधीही न कमावलेल्या, परंतु ज्यांचे केवळ बाजारमूल्यच अवाच्या सवा वाढले आहे अशा ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’कडे वेगळय़ा चष्म्यातून पाहावे लागते. स्वत:चा केवळ बोलबाला निर्माण करून बाजारभाव वाढवणे आणि कंपनी वा स्वत:चे समभाग विकून बक्कळ पैसे कमावणे इतकाच मर्यादित हेतू तेथे बरेचदा असतो. त्यांच्या कल्पनाही फारशा नावीन्यपूर्ण वा चमकदार नसतात. खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांतून बक्कळ पैसा मिळतो हे एकदा लक्षात आल्यावर त्यांचे अजीर्ण होण्याइतके पेव फुटले होते तसाच हा प्रकार. मागवलेल्या वस्तू घरपोच देणे, अ‍ॅप वापरून भाडय़ाने गाडय़ा वा चालक पुरवणे, खासगी घरांतून पर्यटकांना राहण्याची सोय करून देणे, हे सारे या प्रकारात मोडते. अशा कंपन्यांचे कौतुक करताना ‘स्वत:चे एकही हॉटेल नसतानाही जगातील सर्वात मोठी हॉटेल कंपनी’ अशी बिरुदावली मिरवणे हा एक विनोदच  वाटतो. वधू व वराचा परिचय घडवून आणणाऱ्या एखाद्या वधुवर सूचक मंडळाने स्वत:ला जगातील सर्वात मोठे एकत्र कुटुंब म्हणवून घ्यावे असे ते वाटते.

मुख्यत्वे सेवा पुरवणाऱ्या आयटी कंपन्या हे रूढार्थाने यशस्वी उद्योग आहेत. परंतु त्यांचे स्वरूप बहुतांशी भारतातून कापूस मँचेस्टरमध्ये आयात करून तयार कपडे जगभर विकावे तसेच आहे. काही मोजके अपवाद सोडले तर स्वत:ची उत्पादने व उत्तम व्यावसायिक मूल्ये असणारी बौद्धिक संपदा निर्माण करण्यात त्यांना उल्लेखनीय यश मिळालेले नाही. याचे भान ठेवून आयटी उद्योगाच्या विविध शाखांनी आपली उत्पादने, नाममुद्रा आणि उपयुक्त बौद्धिक संपदा निर्माण करणे गरजेचे आहे, असे वाटते.

प्रसाद दीक्षित, ठाणे

त्या दोघांची उद्दिष्टे समान नव्हती!

‘आंबेडकर, हेडगेवारांचे उद्दिष्ट समान’ हा (१० नोव्हेंबर) ‘विद्वत्ताप्रचुर’ विनोदी लेख वाचला. मुळात एक वेळ गांधी, आंबेडकरांची तुलना होऊ शकते, पण हेडगेवार आणि बाबासाहेबांची तुलना करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना येनकेनप्रकारेण बाबासाहेबांच्या बरोबरीला ‘वसविण्याचा’ अट्टहास करावा लागण्याच्या ‘वैचारिक कारवाया’ आजही का कराव्या लागताहेत? बाबासाहेब आणि त्यांच्या अनुयायांनी मुस्लीम वा ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही, हे त्यांचे मोठेपण मान्य करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा का त्याग केला, यावर लेखकाने वैचारिक मखलाशी करायला हवी होती. उच्चवर्णीय हिंदूंच्या कर्मठपणाला वैतागून बाबासाहेबांनी येवला येथे १३ ऑगस्ट १९३५ रोजी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली. त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करू नये म्हणून १४ ऑक्टोबर १९५६ पर्यंत लेखकाच्या मते ‘कट्टर हिंदू नसलेल्या’ हेडगेवार व त्यांच्या स्वयंसेवकांनी कोणते प्रयत्न केले?

आरएसएसची स्थापना १९२५ची. महाडच्या चवदार तळय़ाचा सत्याग्रह होतो २० मार्च १९२७ ला. या सत्याग्रहात डॉ. हेडगेवार आणि त्यांचे हिंदू धर्मात ‘समरसता’ आणू इच्छिणारे स्वयंसेवक सहभागी झाले असल्याचे पुरावे लेखकाकडून द्यायचे राहून गेले असावेत. त्यानंतर २ मार्च १९३० ला नाशिक येथील काळाराम मंदिराच्या प्रवेशाचे आंदोलन सुरू झाले; तेव्हा अस्पृश्यांसाठी मंदिर खुले करावे यासाठी संघाचे कोणते योगदान आहे? बाबासाहेबांनी ‘हिंदू कोड बिल’ मांडले तेव्हा त्या बिलाला कुणी विरोध केला? या संदर्भात संघाची ‘अधिकृत भूमिका’ कोणती होती? संघाच्या समरसतेमध्ये इतकी ‘नि:स्पृह पॉवर’ असेल तर आजवर हिंदू धर्मातील जातीयता संपून ‘निखळ’ आंतरजातीय विवाह सर्रास व्हायला हवे होते.

ज्या संघटनांकडे ‘बौद्धिका’च्या नावाने उथळ खळखळाट असतो, अशा संघटनांकडे वैचारिक दारिद्रय़ असते, म्हणून त्यांना दुसऱ्या विचारांचे महात्मे, नेते, पुढारी मनात नसतानाही दाखविण्यासाठी आपलेसे करावे लागतात. बाबासाहेब आणि हेडगेवार यांचे उद्दिष्ट समान कधीच नव्हते. ‘काळ सोकावू नये’ म्हणून लेखाची दखल घ्यावी लागते, इतकेच.

शाहू पाटोळेऔरंगाबाद

हेडगेवारांनी केवळ संकुचित हिंदूत्व जोपासले

‘आंबेडकर, हेडगेवारांचे उद्दिष्ट समान’ हा रवींद्र माधव साठे लिखित लेख वाचला. डॉक्टर आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनचरित्राला सन १९१६ पासून प्रारंभ झाला असे गृहीत धरले तर डॉक्टर हेडगेवार हयात असेपर्यंत (१९४०) उभयतांत किती वेळा संवाद झाला आणि कोणत्या मुद्दय़ांवर परस्परसहमती झाली, याचे थेट उत्तर लेखक देतील काय?

हेडगेवार हयात असेपर्यंत आंबेडकरांच्या संघर्षशील ध्येयवादाची दिशा स्पष्ट झाली होती. अस्पृश्यता, धर्मपरिवर्तनाचा पर्याय या त्यांच्या भूमिकांना हेडगेवार यांनी त्याला पाठिंबा दिला काय? जातिअंताच्या चळवळीत संघ का उतरला नाही? हिंदूत्ववाद्यांनी आम्ही स्वत: सुधारणा करतो असे अभिवचन डॉक्टर आंबेडकर यांना दिले होते काय?

अस्पृश्य ओळखू यावेत म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र ड्रेस कोड असावा असे म्हणणारे समान प्रतिष्ठेची भाषा कशी काय करू शकतात? आपलेच धर्मबांधव असलेल्या अस्पृश्यांशी समान वर्तन ठेवावे, असे मुल्लामौलवींच्या गळय़ात गळा घालून फिरणाऱ्या शंकराचार्याना का वाटले नाही? हेडगेवारांनी याबाबत कोणती भूमिका घेतली?

प्रा. डॉ. विठ्ठल दहिफळे, नांदेड

विचार व कृतीत तफावत

‘आंबेडकर, हेडगेवारांचे उद्दिष्ट समान’ हा रवींद्र माधव साठे यांचा लेख सामाजिक समरसता मंचाचे तत्कालीन कार्यवाह रमेश पतंगे यांनी १९८८ साली लिहिलेल्या ‘सामाजिक समरसता : डॉ. हेडगेवार व डॉ. आंबेडकर’ या पुस्तकाचे सार म्हणता येईल इतके दोहोंतील माहितीत साम्य आहे. अस्पृश्यतेचे कायमचे उच्चाटन करण्यासाठी भारतीय संविधानात तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधाननिर्मितीच्या प्रक्रियेपासून त्याविरोधात उभा राहिला.

४ जानेवारी १९४९ रोजी,  भारतीय संविधानाच्या मसुद्यातील अनुच्छेद ६७ वर चर्चा सुरू असताना संविधान सभेचे उपाध्यक्ष डॉ. एच. सी. मुखर्जी यांनी सभागृहाला माहिती दिली की, ‘आरएसएसच्या काही लोकांनी संविधान सभेच्या दर्शक गॅलरीमध्ये शिरून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना रोखण्यात आले.’

डॉ. आंबेडकर संघाला अत्यंत धोकादायक संघटन म्हणतात. उद्दिष्टे समान असती तर डॉ. आंबेडकरांनी हेडगेवार व संघावर इतकी कठोर टीका केली नसती – अमित इंदुरकर, भिवापूर, नागपूर</strong>

Story img Loader