‘‘बिबीं’चा ‘पुलवामा’’ हा अग्रलेख (९ ऑक्टोबर) वाचला. हमासचा हल्ला ही कोणत्याही ताज्या घटनेबद्दलची प्रतिक्रिया नव्हती. अनेक दशकांपासून पॅलेस्टिनींवर इस्रायली दडपशाही सुरू आहे आणि त्यांना वाचवण्याची ताकद किंवा स्वारस्य संपूर्ण जगात कोणाकडेच नाही. पिढय़ानपिढय़ा सतत दडपशाहीत जगणाऱ्या पॅलेस्टिनींना आता हे समजले आहे की, डोक्यावर कफन बांधून मृत्यूची चिंता न करता कोणताही हल्ला ते करू शकत असतील तर तोच इस्रायलचे नुकसान करण्याचा एकमेव मार्ग आहे. पॅलेस्टाईनच्या शांतताप्रिय लोकांपासून ते हमाससारख्या दहशतवादी संघटनांपर्यंत सर्वानी हे मान्य केले आहे की, जगातील कोणतीही शक्ती त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही, कारण अमेरिका नावाचा जगातील सर्वात मोठा गुंड इस्रायलच्या पाठीशी उभा आहे. अशा स्थितीत त्यांच्यातील एका वर्गाने दहशतवादी हल्ले हेच न्यायाचे एकमेव साधन मानले. त्याच निराशेतून झालेला हा हल्ला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगाचा हा छोटासा भाग बडय़ा शक्तीच्या लष्करी रणनीतीचे आणि जगातील दोन कट्टरतावादी धर्माच्या लोकांमधील धार्मिक संघर्षांचे मैदान बनला आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघ कुचकामी ठरला असून ही जगासाठी धोकादायक स्थिती आहे. काठीच्या जोरावर मालमत्ता आणि जमीन बळकावण्याची जुनी पद्धत २१व्या शतकातही सुरू ठेवायची असेल, तर देशांनी लोकशाहीचा भ्रम ठेवू नये.

हेही वाचा >>> लोकमानस: राजकारणामुळे क्रिकेटची ‘अभियांत्रिकी’ होऊ नये!

हे देखील समजून घेतले पाहिजे की कोणत्याही एका देशावर, समुदायावर किंवा वर्गावर सतत अत्याचार केल्यास ते एक दिवस जगातील सर्वात सुसज्ज लष्करी साम्राज्यावरसुद्धा हल्ला करून त्यांची सर्व शक्ती कुचकामी ठरवू शकतात. जगातील इतर देशांनी आणि वर्गानीही यातून धडा घेतला पाहिजे.

तुषार अशोक रहाटगावकर, डोंबिवली

आंतरराष्ट्रीय संस्थांची निष्क्रियता चव्हाटय़ावर

‘‘बिबीं’चा ‘पुलवामा’’ हा अग्रलेख वाचला. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू ही परिस्थिती कशी हाताळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एरवीचे हल्ले आणि हा हल्ला यात संख्यात्मक फरक आहे. नेहमीप्रमाणेच जागतिक स्तरावर सहानुभूतीचा जास्तीचा हिस्सा हा देश घेऊन जाणार आहे. सोबतीला मित्र देशांचा सढळ हात आहेच. अमेरिकेतील ज्यूंची लॉबी किती प्रभावशाली आहे हे सर्वपरिचित आहेच.

या जोडीला आहे ती आंतरराष्ट्रीय संस्थांची निष्क्रियता – सध्या सुरू असलेले रशिया- युक्रेन युद्ध असो वा चीनचा कित्येक देशांशी असलेला सीमावाद असो- या मुद्दय़ांवर उपाय काढण्यात या संस्था अपयशी ठरल्या आहेत. या संस्था नामधारी, कालबाह्य आणि पाश्चात्त्य देशांच्या हातचे खेळणे झाल्याचा आरोप वारंवार होतो. इस्रायल-हमास युद्धातसुद्धा तेच होणार. अशा वेळी भारतासारख्या प्रगल्भ देशाची आंतरराष्ट्रीय पटलावरील उपस्थिती किती महत्त्वाची आहे हे दिसून येते. अरब देश आणि इस्रायल या दोहोंशी सलोख्याचे संबंध असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. असे असले तरीही या युद्धाचा सर्वात मोठा झटका भारताला बसणार आहे, याचे कारण भारताच्या पुढाकाराने नुकताच मंजूर झालेला अमेरिका-युरोप-मध्य आशिया-भारत कॉरिडॉरला ब्रेक लागणार आहे.

संकेत रामराव पांडे, नांदेड

हायकमांडची टिंगल करणाऱ्यांकडेही तेच सुरू आहे

‘दिल्लीपुढे मान तुकवण्याची परंपरा’ हा ‘लालकिल्ला’ सदरातील महेश सरलष्कर यांचा लेख (९ ऑक्टोबर) वाचला. दिल्लीपुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरा केला नाही, आता काळ बराच पुढे गेला आहे. शिंदे व पवार दिल्लीचा हुकूम मानतात. ‘हायकमांड’, ‘रिमोटकंट्रोल’ या दोन शब्दांवरून काँग्रेसची टिंगल करणाऱ्या भाजपमध्ये १० वर्षांत तेच घडत आहे. ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र  धर्म वाढवावा’, ‘मराठय़ाविना राष्ट्रगाडा न चाले’, ‘सह्यद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला’ इत्यादी स्फुरण चढवणारी वाक्ये आता निष्प्रभ ठरली आहेत. आम्हाला नुसती वाघनखे नकोत, मराठी बाणा हवा आहे. सध्या जे राजकारण सुरू आहे ते २०२४ चे  गाजर आहे, खरी गरज नंतर कळेल. शिवसेना व राष्ट्रवादी हे प्रादेशिक पक्ष खिळखिळे करण्याचे उद्दिष्ट सफल होत आहे.

श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)

येथे परंपरांचासन्मान नित्य आहे..

‘दिल्लीपुढे मान तुकवण्याची परंपरा’ फार जुनी आहे. ‘दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा’ हा जगन्नाथ पंडित यांचा श्लोक आणि ‘खाविंदचरणारिवदी मिलिंदायमान होणे’ हे शब्द प्रचारात नसले तरी ती वृत्ती कायम आहे. ‘दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हेही आपले पाठ आहे. शिंदे आणि अजितदादा यांना खुणा करून आवतण देण्याची कल्पनासुद्धा दिल्लीतल्या मूर्धन्य (इंदिरा गांधींच्या काळातले हायकमांड) नेत्यांचीच असणार हे निश्चित. आता त्याला पर्याय नाही. एकनाथांनी ‘महाशक्ती’ म्हटले तेव्हा सर्वाना काय वाटले आठवा! ‘येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे’ हे गदिमांनीही नोंदले आहे.

गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

रुग्णमृत्यू हा आभासच!

‘मोठय़ा प्रमाणावर रुग्णमृत्यू झाल्याचा आभास’ हे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य वाचले आणि खरोखरच आपण किती मूर्ख आहोत, याची जाणीव झाली. मृत्यू हाच एक आभास हे तथ्य इंद्राशिवाय कोण जाणणार? कारण मृत्यूनंतरही आत्मा जिवंत राहातो हे भगवंतांनी अर्जुनाला सांगूनच ठेवले आहे. शिवाय ते पुढे असेही म्हणतात, ‘मी मारतो’ असे तू म्हणतोस हाही आभासच आहे. त्यामुळे रुग्ण त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा औषधे न मिळाल्यामुळे मरण पावले हा एक आभासच आहे, हे अगदी १०० टक्के सत्य!

श्याम कुलकर्णी, पुणे

..तसे हिंदूंना भडकवणेही अयोग्यच

‘हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे सूत्रधार कोण?’ हा ज्युलिओ रिबेरो यांचा लेख (८ ऑक्टो.) वाचला. कॅनडातील शीख समुदायाला काही शीख भडकवत आहेत हे चिंतेचे आहेच पण आज भारतात हिंदू युवकांनादेखील एका विशिष्ट धर्मीय लोकांविषयी भडकवले जात आहे त्याचे काय? वास्तविक पंजाब हातातून निसटत चालला होता आणि त्यावर अंतिम पर्याय म्हणजे त्याचा म्होरक्या भिंद्रनवाले याचा खात्मा करणे आवश्यक होते अशा वेळी जिवाची पर्वा न करता आणि देशाच्या सुरक्षेसाठी सुवर्णमंदिर परिसरात लष्कर घुसवण्याचे धाडस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी केले होते. त्यानंतर रिबेरो, के.पी.एस. गिल अशा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पंजाब शांत झाला. आता कॅनडामधील शीख पुन्हा फुटीरतावादाला खतपाणी घालत आहेत. मात्र हल्ली काही हिंदू युवकांनादेखील सोशल नेटवर्करवर एका विशिष्ट धर्मीय लोकांचे खच्चीकरण करून त्यांच्याकडे काही खरेदी करायची नाही अशी आवाहने केली जात आहेत. तरुणांची माथी अशा प्रकारे भडकवणे कोणत्याही देशात, कोणत्याही संदर्भात अयोग्यच.

सुनील समडोळीकर, कोल्हापूर

पंतप्रधान अशाच प्रवर्गातील आहेत म्हणे!

‘‘एवढे ‘मागास’ हे देशाला लांच्छनास्पदच ना?’’ हे पत्र (लोकमानस- ९ ऑक्टोबर) वाचले. मागासवर्गाच्या प्रमाणाचा मागासलेपणाशी संबंध जोडणे उचित नाही. ओबीसींचे प्रमाण जास्त असणे म्हणजे देश अधिक मागासलेला असे कसे म्हणता येईल? जात प्रवर्ग या देशात अस्तित्वात असलेल्या बाबी आहेत. मागासलेपण नष्ट करता येऊ शकते, पण असे प्रवर्ग कायमचेच राहणार. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेल्या जातीनिहाय जनगणनेत ओबीसींचे प्रमाण ६३ टक्के आढळून आले. देशभर असेच मोठय़ा प्रमाणात ओबीसी आढळून आल्यास ते देशातील ओबीसींचे प्रमाण असेल, त्या देशाचे मागासलेपण नव्हे. देशभर आणि देशाबाहेर रुबाबात मिरवणारे पंतप्रधान अशाच प्रवर्गातील आहेत म्हणे! राष्ट्रपती महोदया आदिवासी प्रवर्गातील आहेत. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाचे वा मागास प्रवर्गाचे अधिक प्रमाण म्हणजे देशाचे मागासलेपण नव्हे! जातीनिहाय जनगणना केल्याने जाती वर्ग प्रमाणाचे वास्तव चित्र समोर येऊन त्याआधारे विकासाच्या योजना आखल्या जाऊन सर्व जाती प्रवर्गाना न्याय मिळेल आणि विकासाचा समतोल राखला जाईल असे वाटते!

श्रीकांत मा. जाधव, अतीत (जि. सातारा)

आयुष्यभर उपचारांची तयारी हवी

‘अडकलेली रेकॉर्ड’ हा ‘आरोग्याचे डोही’ सदरातील लेख (९ ऑक्टोबर) वाचला. ओसीडी दैनंदिन जीवनात अडसर ठरतो, तेव्हाच डॉक्टर गाठला जातो आणि तोही थोडेफार बरे वाटेपर्यंत. मानसोपचारांत सातत्य आवश्यक असते. कधी कधी आयुष्यभरही हे उपचार घ्यावे लागतात, हे भारतीयांना पटत नाही आणि त्यामुळेच आजार पुन्हा डोके वर काढतात. जोपर्यंत मानसिक आजार हा शारिरीक आजारासारखाच असून त्यासाठी सतत डॉक्टर/ समुपदेशकाकडे जाणे अत्यावश्यक असते, हे पचनी पडत नाही, तोपर्यंत या समस्येचे निराकरण होणार नाही.  माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)