दहा वर्षांनतर पहिल्यांदाच देशाला २३६ जागा असलेला मजबूत विरोधी पक्ष मिळाला आहे. रोजगार हा देशापुढचा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. त्यावर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात चांगले उपाय सुचवले आहेत. विरोधी पक्षाने त्यांचा पाठपुरावा करावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच झालेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची फलश्रुती म्हणजे या निवडणुकीने आपल्याला एक समर्थ विरोधी पक्ष दिला आहे. १६ व्या आणि १७ व्या लोकसभेत हा विरोधी पक्षच गायब होता. आता तो या लोकसभेत आपली उपस्थिती दाखवून देईल. २०१४ आणि २०१९ या मागच्या दोन निवडणुकांमध्ये, काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष होता, पण त्याच्याकडे अनुक्रमे फक्त ४४ आणि ५२ जागा होत्या. त्या इतक्या नगण्य होत्या की काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळवता आले नाही. इतर भाजपेतर पक्षांनाही अगदी कमी जागा मिळाल्या होत्या. भाजप, त्याचे निवडणूकपूर्व सहकारी आणि अघोषित मित्रपक्ष (वायएसआरसीपी आणि बीजेडी) यांचे संख्याबळ आणि आवाजापुढे विरोधकांचा आवाज दबून गेला होता.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta samorchya bakavarun opposition party employment congress manifesto amy95
First published on: 23-06-2024 at 06:39 IST