अतुल सुलाखे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
साम्ययोगाचा मार्ग हृदय परिवर्तनाचा आहे हे सत्य आहेच, तथापि तो त्यापलीकडेही आहे. विनोबा ‘संक्रांती’ म्हणत ती प्रक्रिया तीन स्तरांची आहे. हृदय, विचार आणि समाज या तिन्ही पातळय़ांचे ऐक्य साधत ते संपूर्ण क्रांतीचा विचार मांडतात.
विनोबांचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत नेमकेपणाने आला आहे. ज्ञानदेवांनी गीतार्थाची थोरवी सांगितली आणि श्रोत्यांनी कशा प्रकारे गीतार्थाकडे पहावे याचे वर्णन केले. संपूर्ण क्रांतीचा विचार मांडताना विनोबांनी याच ओव्या समोर ठेवल्या असाव्यात इतक्या त्या चपखल आहेत.
माउलींना गीतार्थ नित्यनूतन रूपात दिसला. तर विनोबांना गीतार्थाप्रमाणेच नित्यनूतन क्रांति-तत्त्वाचेही दर्शन झाले. श्रोत्यांनी गीतार्थाचे श्रवण कसे करावे, हे माउलींनी मोठय़ा प्रेमाने सांगितले आहे. त्यात चित्ताचा हळुवारपणा महत्त्वाचा आहे.
विरोधी विचारांशी संवाद साधताना विनोबांनी याच हळुवारपणाचे मनोज्ञ दर्शन घडवले. साम्यवाद, समाजवाद आदी विचारांच्या समर्थकांसोबत त्यांनी हितगुज केल्याचे दिसते. सोबत सर्वोदयाचा परिवर्तनाचा विचार मांडल्याचे आढळते.
सर्वोदयप्रणीत परिवर्तन तीन स्तरांवरचे आहे. हृदय, विचार आणि समाज अशी सांगड आहे. हृदय परिवर्तनाचा स्तर संतांचा आहे. विचार परिवर्तनाचा स्तर आचार्याचा आहे आणि समाज परिवर्तनाचा स्तर साम्यवादी क्रांतिकारकांचा आहे.
संतांमधे ज्ञानदेव, तुकोबा आदी येतात. आचार्य अथवा तत्त्ववेत्त्यांमधे शंकराचार्य अॅरिस्टॉटल आदी येतात. विनोबांनी कार्ल मार्क्सलाही आचार्याच्या गटात घेतले आहे. मार्क्सने क्रांतीचा ‘विचार’ दिला म्हणून तो आचार्य! तिसऱ्या स्तरावर ते साम्यवादाचा समावेश करतात. विनोबांची समाज परिवर्तनाची प्रखर इच्छा यावरून ध्यानात यावी. या तिन्ही स्तरांचे ऐक्य साधत सर्वोदय, समाज परिवर्तन साधू इच्छितो.
हृदय परिवर्तन आणि विचार परिवर्तन व्यक्तींना लागू होते आणि अशा व्यक्ती एकत्र आल्यानंतर समाज परिवर्तन होते, म्हणजे कार्य पूर्ण होते. ही तिन्ही कार्ये आम्हाला एकत्र करायची आहेत. तिन्हींची गरज आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
परिवर्तनासाठी संघर्ष हाच एकमेव मार्ग आहे अशी भूमिका मांडणाऱ्या मंडळींशी विनोबांनी साधलेला संवाद आज अधिकच महत्त्वाचा आहे. परिवर्तन म्हणा की क्रांती, ती साचेबद्ध नसते. सृष्टीतही नित्यनूतन अनुभव येतात. हे अनुभव ध्यानात घेतले तर हृदय परिवर्तन आणि विचार परिवर्तनानेही क्रांती होऊ शकते.
मोहग्रस्ताचे हृदय परिवर्तन आणि सज्जनाचे विचार परिवर्तन केले की क्रांतीची प्रक्रिया पूर्ण होते.
विनोबा संघर्षांचा मार्ग नाकारत नाहीत, पण तेवढय़ा एकाच मार्गाने होणारे परिवर्तन त्यांना अमान्य आहे. संघर्षांत उभय पक्षांची हानी होते. सत्ता हाती घेण्याचा लोकशाहीतील मार्ग विचार परिवर्तन हाच आहे ही त्यांची भूमिका अत्यंत सखोल आहे. माझे तत्त्वज्ञान महावीरांचे आणि कार्य गौतम बुद्धाचे आहे, असे ते म्हणत. त्यांच्या कार्याचा अंतिम हेतू परम साम्य प्राप्त करणे हा होता. हे िबदू जोडले तर परिवर्तनाचा नवा विचार समोर येतो. तसेच या ‘साम्यचक्र-प्रवर्तना’ची एक छोटी प्रार्थना आकाराला येते. मी हृदय परिवर्तनाला शरण जातो. मी विचार परिवर्तनाला शरण जातो. मी समाज परिवर्तनाला शरण जातो आणि अंतिमत: मी परम साम्याला शरण जातो.
jayjagat24@gmail.com