‘भारताचे लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल १९४७ साली म्हणाले की, भारतातली नागरी सेवक हीच ‘भारताची पोलादी चौकट’ आहे. पटेलांच्या आधी ब्रिटिश मंत्री डेव्हिड लॉइड जॉर्ज यांनी १९२२ साली नागरी सेवांना ‘पोलादी चौकट’ असे संबोधले होते. ब्रिटिश साम्राज्यवादाचा डोलारा टिकवून ठेवण्यात या सेवांचा मोठा वाटा आहे, असे ते म्हणाले होते. त्यावर जवाहरलाल नेहरूंनी ही ‘भारतीय’ नाही, ‘सभ्य’ (सिविल) नाही आणि मुख्य म्हणजे सेवाही नाही, या भाषेत टीका केली होती. ब्रिटिशांनी मात्र ही व्यवस्था विकसित करण्यासाठी कष्ट घेतले. शिस्तबद्ध प्रयत्न केले. सत्येंद्रनाथ टागोर (रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ) हे या सेवांमध्ये रुजू झालेले पहिले भारतीय अधिकारी. यासाठीची परीक्षा सुरुवातीला इंग्लंडमध्ये होत होती. १९२२ सालापासून ती भारतात होऊ लागली. जयपालसिंग मुंडा असोत की सुभाषचंद्र बोस, असे अनेक लोक ही परीक्षा उत्तीर्ण झाले, मात्र नंतर त्यांनी या सेवेतून काढता पाय घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा