केवळ मार्गदर्शनपर तत्त्वे सांगितली गेली नाहीत तर त्या तत्त्वांनुसार व्यवहार व्हावा, यासाठी कायदेशीर संरक्षण देण्याचे उपायही योजले गेले..

संविधानातील एकोणचाळिसाव्या अनुच्छेदाने ‘समाजवादाचे पंचशील’ मांडले. त्यानंतर मात्र या अनुच्छेदामध्ये एक दुरुस्ती झाली आणि एक उपकलम जोडले गेले. अनुच्छेद ३९ (क) मध्ये असे म्हटले की राज्याने समान संधीच्या तत्त्वाचा अवलंब केला पाहिजे. त्यातून सर्वाना न्याय प्राप्त होईल, हे सुनिश्चित केले पाहिजे. तसेच नागरिकांना समान संधी नाकारली जाऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. व्यक्तीला न्यायालयात जाऊन दाद मागता येत नसेल तर तिला कायदेविषयक मोफत साहाय्य मिळाले पाहिजे. या अनुच्छेदांमधील पाचही तत्त्वांशी सुसंगत अशी ही सुधारणा केली गेली. विशेषत: अनेकदा सर्वसामान्य माणसाला सल्ला दिला जातो की, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. मार्गदर्शक तत्त्वे मात्र सांगतात की प्रत्येकाला कोर्टाची पायरी चढता यावी यासाठी राज्यसंस्थेने साहाय्य केले पाहिजे. या अनुषंगाने १९८७ साली ‘लीगल सव्‍‌र्हिसेस अथॉरिटीज अ‍ॅक्ट’ पारित केला गेला. या कायद्यानुसार देशभर मोफत आणि संपूर्ण कायदेशीर मदत मिळण्यासाठी आराखडा आखला गेला. ‘लोक अदालत’ ही कायदेशीर संस्थात्मक रचना त्यातून पुढे आली. लोक अदालतीतून घेतलेले निर्णयही बंधनकारक असतात.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidhan bhan legal protection of socialist provisions amy
First published on: 03-07-2024 at 00:57 IST