भारताने प्रातिनिधिक संसदीय लोकशाही स्वीकारली. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेमध्ये चर्चा करतात. वादविवाद करतात. त्या मंथनातून सार्वजनिक धोरण ठरते. कायद्यांची निर्मिती होते. संसद भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी आहे. ही संसद मुळापासून समजून घेण्यासाठी माजी लोकसभा सचिव सुभाष कश्यप यांचे ‘अवर पार्लमेंट’ हे नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले पुस्तक उपयुक्त आहे. संसदेच्या कार्यांच्या आधी मुळात तिची रचना समजून घेणे महत्त्वाचे आहे. भारताच्या संसदेच्या रचनेत तीन प्रमुख घटक आहेत: १. राष्ट्रपती २. राज्यसभा ३. लोकसभा. याआधीच नोंदवल्याप्रमाणे राष्ट्रपतींच्या निवडीमध्येच राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य सहभागी असतात. राष्ट्रपती प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीनंतर विशेष अभिभाषण करू शकतात. तसेच प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला राष्ट्रपती अभिभाषण करू शकतात आणि महत्त्वाच्या विषयांच्या अनुषंगाने निवेदन करू शकतात. राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात. अगदी तात्पुरत्या वेळेकरता लोकसभा अध्यक्षांची (प्रोटम स्पीकर) नियुक्तीही राष्ट्रपती करू शकतात. विधेयकांवर पुनर्विचार करा, असा सल्लाही ते देऊ शकतात. राष्ट्रपतींचे संसदीय रचनेत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा