संविधानातील केंद्र पातळीवरील रचना संविधानाच्या पाचव्या भागात स्पष्ट केलेली आहे. ढोबळमानाने केंद्र पातळीवरील शासनव्यवस्थेप्रमाणे राज्य पातळीवरील व्यवस्थेचा आराखडा मांडलेला आहे. ही शासनव्यवस्थेची रूपरेखा संविधानाच्या सहाव्या भागात मांडलेली आहे. या भागात एकूण ६ प्रकरणे आहेत. अनुच्छेद क्र. १५२ ते २३७ यांमध्ये ही प्रकरणे विभागलेली आहेत. पहिले प्रकरण हे केवळ १५२ व्या अनुच्छेदाबाबत आहे. राज्याबाबतच्या व्याख्येचा विचार करताना तो जम्मू आणि काश्मीर वगळून केला गेला आहे, हे येथे नमूद केले आहे. दुसरे प्रकरण आहे ते राज्याच्या कार्यकारी यंत्रणेबाबतचे. या प्रकरणात राज्यपाल, मंत्रीपरिषद, राज्याचा महाअधिवक्ता आणि सरकारी कामकाज चालवणे या अनुषंगाने तरतुदी आहेत. राज्यपाल हे पद आणि त्याचे महत्त्व या भागातून स्पष्ट होते. राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोन्ही पदांचे आपापले महत्त्व वेगवेगळे असले तरी ढोबळमानाने केंद्रासाठी राष्ट्रपतींचे पद जसे आहे तसेच राज्यासाठी राज्यपालांचे संवैधानिक पद स्थापित केलेले आहे. तसेच या प्रकरणातून राज्यपाल आणि मंत्री परिषद यांचे परस्परांशी असलेले नाते लक्षात येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा