मथुरेच्या रस्त्यावर उभे राहून अर्धा तास झाला तरी येणाऱ्या-जाणाऱ्या गवळणींना पेंद्या अडवत नाही हे बघून कृष्ण चकित झाला. नक्कीच याचे काहीतरी बिनसलेले दिसते हे लक्षात येताच तो म्हणाला, ‘अरे तुला झालेय काय? आज दूध, दही नको का?’ हे ऐकताच पेंद्या भानावर आला. ‘देवा, कसला दूध-दह्याचा विचार करता, तिकडे महाराष्ट्रदेशी मलईदार खुर्चीवरून भांडणे चाललीत. प्रत्येकाला तीच ती सीएमची खुर्ची हवी आहे, जी रिकामीच नाही तरीही सारेच दावे करू लागलेत. अशाने कसे होईल त्या सुसंस्कृत राज्याचे. बारामतीकर, सांगलीकर, नागपूरकर, भंडाराकर सारे जणू संख्याबळ आपल्याच खिशात असल्याच्या थाटात बोलू लागलेत. वगापेक्षाही विनोदी प्रकार आहे हा!’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्याला थांबवत कृष्ण म्हणाला, ‘अरे, लोकशाहीत स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. राज्यातल्या प्रत्येक माणसाला जरी विचारले तर तोही म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचेय. म्हणणे आणि होणे यात फरक आहे. होऊ दे व्यक्त त्यांना, तेवढेच मनोरंजन होते लोकांचे. तुला कशाला याची चिंता? तू आपला दही-दुधाकडे लक्ष दे.’  हे ऐकून पेंद्या आणखी अस्वस्थ झाला. ‘देवा, पण याने अस्थिरता वाढेल ना! एकमेकांवरच्या संशयात वाढ होईल ती वेगळीच. हे सारे त्या भाजपच्या चाणाक्ष खेळीमुळे सुरू झालेय. बाहेरून या अन् मुख्यमंत्रीपद घ्या अशी खुली ऑफर ठेवायची काय गरज होती त्यांना.’ मग कृष्ण समजावून सांगू लागला. ‘अरे, फोडाफोडीने बदनामी होते, त्यापेक्षा लालूच दाखवली की बरे! अगदी साधा तर्क आहे हा. किती काळ नुसती मडकी फोडशील? कधी डोकं तर वापर’

यावर खजील होत पेंद्या बोलू लागला. ‘तरी पण एकटय़ा दादांच्या इच्छेची चर्चा जास्त का? इतरांनी काय घोडे मारले? साऱ्यांना समान न्याय या तत्त्वाचा विचार करून या खुर्चीचीच संख्या वाढवली तर! म्हणजे असे की प्रत्येक जिल्ह्याला एक मुख्यमंत्री, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाचा आणखी एक विभागीय मुख्यमंत्री. या साऱ्यांवर देखरेख ठेवणारा राज्याचा ‘महामुख्यमंत्री’. तशीही प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्याची घोषणा झालीच आहे. तिथेच एक नवा कक्ष उभारून बसतील सारे. एका झटक्यात ४५ लोकांचे स्वप्न साकार होईल. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची कल्पनासुद्धा साकार होईल. शिवाय या प्रत्येकाच्या दिमतीला आणखी दोन दोन मंत्रीपण द्यायचे. पाहिजे तर जिल्हामंत्री म्हणू त्यांना. ही योजना अमलात आणली तर निवडणूक झाल्याबरोबर विरोधक उरणारच नाहीत. सारेच सत्तेत सामील होण्यासाठी धडपडतील. भोगू द्या की सत्ता साऱ्यांना. तसेही विविध पक्षीय पद्धतीला लोक कंटाळलेच आहेत अलीकडे.’ हे ऐकून कृष्ण चिडला. ‘अरे पेंद्या, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? अशा कल्पना समोर आणून तू अखंड राज्याचे सुभेदारीत रूपांतर करतोस. बजबजपुरी माजेल याने. त्यातला एखादा शहाणा त्याच्या जिल्ह्यालाच स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊन टाकेल. असे विचार येतातच कसे तुझ्या डोक्यात? त्यापेक्षा तू दूधदुभते चोरण्याच्या कामावर लक्ष दे. बघू दे त्या मराठी नेत्यांना स्वप्ने. या दटावणीमुळे पेंद्या वरमला. त्याची नजर गवळणीकडे वळली.