लोक काहीही म्हणोत हो! तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका दादा. गुलाबी रंगाचा वसा घेतला म्हणजे घेतला. आता मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळेपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. सध्या रिकामटेकड्यांची संख्या भरपूर झालेली. ते या काहीबाही बोलत असतात. जसे की, तुमच्यासमोर गुलाबी वेष्टणातली फाइल आली की तुम्ही लवकर क्लीअर करता. तुम्हाला गुलाबी पेन आवडू लागलाय. तहान भागवण्यासाठी गुलाबपाणीच लागते. सर्व साहाय्यकांनी ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी’ या गाण्याची रिंगटोन ठेवलीय. हा कल्पनाविलास विचलित करण्यासाठीच. तेव्हा याकडे लक्ष न देता ‘खुर्चीध्येय’ गाठणे हेच योग्य. हा रंग दिसायला आकर्षक. सौंदर्यवाद सांगणारा, प्रेम, धुंदीच्या जवळ जाणारा. दादांचा रोखठोक स्वभाव याच्याशी मेळ खाणारा नाहीच. त्यामुळे पतन अटळ ही टीकाही अयोग्य. सारे जग जिंकायची ताकद केवळ याच रंगात. त्यामुळे तुम्ही हे मतांचे युद्ध प्रेमाचा वर्षाव करून सहज जिंकाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ : थेट भरतीचे धोके

हेही वाचा >>> अन्वयार्थ : थेट भरतीचे धोके

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article on deputy chief minister ajit pawar remark about pink color zws
Show comments