देशासाठी विविध संकल्पचित्रे मांडली जात असताना कोणत्या दिशेने जायचे नाही, हे समजणेही जरुरीचे होते.. 

स्वातंत्र्य आंदोलन १९३० च्या दशकात निर्णायक टप्प्यावर आले. नव्या संविधानाची चर्चाही पुढील टप्प्यावर पोहोचली. स्वातंत्र्य आंदोलन आणि संविधान निर्मिती प्रक्रिया ही एकत्रच घडत होती. १९२५ साली स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य आंदोलनात कुठेही सहभागी नव्हता. उलटपक्षी, लोकांनी ‘चले जाव’ चळवळीत सामील होऊ नये, असे संघाचे म्हणणे होते (श्री गुरुजी समग्र दर्शन, खंड ४, पृ ४०).   

maharashtra assembly election 2024 pm modi addresses a public meeting in mumbai
शपथविधीच्या आमंत्रणासाठी मुंबईत; महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधानांचा विश्वास
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
article 344 commission and committee of parliament on official language
संविधानभान : भाषिक संतुलनाचा विचार
Ramdas Athawale, Panvel Candidate Prashant Thakur,
राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
multiple languages issue considered in constituent assembly
संविधानभान : भारताचे बहुभाषिक कवित्व
Rahul Gandhi Devendra Fadnavis Red Book
Red Book : ‘संविधान बदलणार’ या मविआच्या नरेटिव्हला भाजपाचं प्रत्युत्तर; विधानसभेला ‘लाल पुस्तका’ची चर्चा का होतेय?
Surganas backward image will change says Dhananjay Munde
सुरगाण्याची अतिमागास प्रतिमा बदलणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, “राहुल गांधी संविधान बचाओच्या घोषणा करतात पण त्यांच्या हातातल्या लाल पुस्तकात..”

स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नसला तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नव्या राष्ट्राविषयीचा विशिष्ट विचार होता. हा विचार संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी लिहिलेल्या ‘वी ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड’ या १९३९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसतो.

सात प्रकरणांमध्ये विभागलेल्या या पुस्तकातून संघाचा विचार समजून घ्यायला मदत होते. गोळवलकरांच्या स्वप्नातील राष्ट्र हे ‘हिंदी राष्ट्र’ होते. या हिंदी राष्ट्रासाठी त्यांना विशुद्ध आर्य वंश हा पाया आहे, असे वाटत होते. हिंदी धर्म आणि हिंदी संस्कृती ही इतरांहून कशी वेगळी आहे, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची माता असून त्यातून नव्या देशाची उभारणी करणे जरुरीचे आहे, अशी आग्रही मांडणी त्यांनी केली. 

पहिल्या महायुद्धापूर्वीच्या त्या काळात मुसोलिनीच्या नेतृत्वातील इटली आणि हिटलरच्या नेतृत्वातील जर्मनी हे गोळवलकारांचे आदर्श होते. गोळवलकरांच्या मते, हिंदीुस्तान हिंदूंचे आहे आणि त्यामुळे इतर अल्पसंख्याकांना येथे राहायचे असल्यास त्यांनी हिंदूंचे वर्चस्व स्वीकारले पाहिजे. गोळवलकरांच्या साऱ्या मांडणीवर वि. दा. सावरकर यांचे ‘हिंदीुत्व’ (१९२३) आणि बाबाराव सावरकरांचे ‘राष्ट्रमीमांसा’ (१९३४) या पुस्तकांचा प्रभाव आहे.

गोळवलकर या पुस्तकात चातुर्वण्र्य व्यवस्थेचे समर्थन करतात. जातव्यवस्था ही सामाजिक नियमनाकरिता उपयुक्त असल्याची मांडणी करतात. थोडक्यात, चार प्रमुख मुद्दय़ांवर गोळवलकरांचे राष्ट्र उभारले आहे : (१) हिंदूंचे राष्ट्र (२) अल्पसंख्याकांना दुय्यम स्थान (४) नाझी जर्मनीप्रमाणे एकचालकानुवर्ती राज्ययंत्रणा (४) उतरंड असलेला समाज.

प्रा. शमसुल इस्लाम यांनी गोळवलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांत (२००६) या पुस्तकाचा अतिशय चिकित्सक प्रतिवाद केला आहे. गोळवलकरांची दृष्टी भारतीय संविधानाशी विसंगत आणि विघातक होती हे त्यांनी सुस्पष्ट दाखवले आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी या विचारांचा विरोध केला. समता हे मूल्य मानणाऱ्या बाबासाहेबांनी हिंदी धर्मातील विषमतेवर बोट ठेवले. हिंदी म्हणून जन्माला आलो, मात्र हिंदी म्हणून मरणार नाही, अशी ऐतिहासिक घोषणा बाबासाहेबांनी १९३६ साली केली; तर १९३९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात गोळवलकरांनी हिंदी राष्ट्राचे स्वप्न मांडले. पं. नेहरू यांनीही जर्मनी आणि इटली येथील फॅसिस्ट हुकूमशाहीचा धिक्कार केला होता. नाझी जर्मनीमुळे मानवतेचे किती मोठे अध:पतन झाले आहे, हे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळेच पुढे संघाच्या परंपरेतील श्यामाप्रसाद मुखर्जी संविधान सभेत असले तरी गोळवलकरांना अपेक्षित असलेले संविधान भारताने नाकारले कारण ते विषमतेवर आधारित होते.

गांधीहत्येनंतर या पुस्तकावर इतकी टीका झाली की, गोळवलकरांनी आपण हे पुस्तक लिहिल्याचाच इन्कार केला; मात्र धीरेंद्र झा यांनी गोळवलकर गुरुजींचे हे असत्य सप्रमाण दाखवून दिले. गोळवलकरांनी हे पुस्तक लिहिल्याने संघाचा विचार सुस्पष्टपणे मांडला गेला. देशाच्या नव्याने सुरू होणाऱ्या वाटचाली साठी विविध संकल्पचित्रे मांडली जात असताना कोणत्या दिशेने जायचे नाही, हे समजणेही जरुरीचे होते. त्या अनुषंगाने गोळवलकरांचे योगदान महत्त्वाचे मानले पाहिजे. 

 डॉ. श्रीरंजन आवटे