‘साहेब, तुमची फिरत्या मंत्रीपदाची आयडिया चांगलीच आहे, पण अडीच वर्षांनंतर एखाद्याने पद सोडण्यास नकार दिला, या नकारामागे भाजपची फूस असल्याचे लक्षात आले, याचेच अनुकरण इतरांनी केले तर करायचे काय? तेलही गेले व तूपही अशी अवस्था होईल आपली.’ हे ऐकताच एकनाथरावांचा चेहरा आणखी चिंताग्रस्त झाला. गद्दारी आपल्या पाचवीलाच पुजली की काय असेही त्यांना वाटून गेले. यावर एक उपाय आहे, असे सल्लागाराने सांगताच त्यांचे कान टवकारले. आपण पक्षातर्फे पाच किलोमीटर धावण्याची अडथळा शर्यत घ्यायची. यात सर्व ५७ आमदारांना सामील व्हायला सांगायचे. यात बॅटन महत्त्वाचे असते. ठरावीक टप्प्यावर ते दुसऱ्याला सोपवावे लागते. हे कार्य जो प्रामाणिकपणे पार पाडेल त्यालाच मंत्रीपद द्यायचे. यामागचा हेतू हाच की आपल्या जवळचे दुसऱ्याला देण्याची तयारी कोण कोण दाखवतो ते ओळखणे. मात्र, तो या आमदारांना सांगायचाच नाही. पक्षाप्रति निष्ठा, सांघिकता दिसावी म्हणून ही शर्यत आहे असेच साऱ्यांना सांगायचे. ही भन्नाट कल्पना ऐकताच एकनाथरावांचे डोळे चमकले. त्यांनी लगेच फतवा काढला. सर्वांनी उद्या सकाळी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सकाळी सहाला जमायचे. आदेश मिळताच आमदार क्रीडावेशात पहाटे पाचलाच पोहोचले. हे नेमके कशासाठी अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली. तेवढ्यात वातकुक्कुट म्हणून प्रसिद्ध असलेल्या अब्दुलभाईंनी गेल्या कार्यकाळात मंत्री असलेल्या सगळ्यांच्या कानात काहीतरी सांगायला सुरुवात केली. काही इच्छुकांनी ते ऐकण्याचा प्रयत्न करताच त्यांना दूर ढकलण्यात आले. अपवाद फक्त शिरसाट व गोगावलेंचा.

हेही वाचा : व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी

madhav gadgil loksatta editorial
अग्रलेख : ‘ड्युरेबल ऑप्टिमिस्ट’
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
donald trump policies
लेख : घोंघावणारी आर्थिक वादळे!
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
skill basis degree loksatta
अन्वयार्थ : कौशल्याला पदवीचे कोंदण
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…

बरोबर सहाला पाच कमी असताना एकनाथरावांनी शिट्टी वाजवली. जे मंत्री होते त्यांना पहिल्या टप्प्यात उभे करण्यात आले. अडीच किलोमीटर धावल्यावर हातातले बॅटन तिथे उभ्या असलेल्यांच्या हाती सोपवायचे अशी सूचना दिली गेली. दुसऱ्या टप्प्यावर शिरसाट, गोगावले व इतर इच्छुकांना उभे करण्यात आले. तिसरी शिट्टी वाजताच शर्यत सुरू झाली. अब्दुलभाईंनी कानात सांगितलेले सत्य मनात साठवत शंभुराजे, केसरकर, गुलाबराव, दादा भुसे, उदयराव, तानाजीराव आपले शरीर सांभाळत पळू लागले. अब्दुलभाई त्यात सर्वांत पुढे होते. ही शर्यत असली तरी याचा संबंध मंत्रीपदाशी नक्की असावा याची कल्पना असल्याने सर्वांनी बॅटन हातात घट्ट धरून ठेवले होते. पळता पळता गुलाबरावांनी हातातला बॅटन कमरेत दडवण्याचा प्रयत्न केला, पण एकनाथरावांनी जोरात शिट्टी वाजवून तो हाणून पाडला. अडीच किलोमीटरचा टप्पा जवळ येताच तो उत्कंठावर्धक क्षण जवळ आला. प्रत्येकाचे लक्ष आता काय होते याकडे लागले होते. पळणारे सारे या टप्प्यावर येताच तिथे उभे असलेले इच्छुक बॅटन घेण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, पळणाऱ्यांपैकी कुणीही ते द्यायला तयार होईना. यावरून तिथे थोडी झटापटसुद्धा झाल्याचे दृश्य साऱ्यांना दिसले. कुणीही बॅटन सोपवायला तयार नाही, हे लक्षात येताच शिरसाट व गोगावलेंनी कपड्यात दडवून आणलेले बॅटन काढून धावायला सुरुवात केली व क्षणार्धात ते साऱ्यांच्या समोर निघून गेले. बाकीचे इच्छुक बघतच राहिले. या नियमभंगामुळे संपूर्ण शर्यतीचाच विचका झाला. हे सारे हताशपणे बघणाऱ्या एकनाथरावांसमोर नंतर सारे गोळा झाले तेव्हा अब्दुलभाई हळूच म्हणाले, ‘आमची क्षमता पूर्णवेळ म्हणजे पाच वर्षे धावण्याची आहे हेच यातून सिद्ध झाले. तेव्हा फिरतेबिरते काही नकोच’ हे ऐकून एकनाथरावांनी कपाळावर हात मारून घेतला. त्यांनी मागे बघितले तर सल्लागार गायब झालेला होता.

Story img Loader