‘साहेब, तुमची फिरत्या मंत्रीपदाची आयडिया चांगलीच आहे, पण अडीच वर्षांनंतर एखाद्याने पद सोडण्यास नकार दिला, या नकारामागे भाजपची फूस असल्याचे लक्षात आले, याचेच अनुकरण इतरांनी केले तर करायचे काय? तेलही गेले व तूपही अशी अवस्था होईल आपली.’ हे ऐकताच एकनाथरावांचा चेहरा आणखी चिंताग्रस्त झाला. गद्दारी आपल्या पाचवीलाच पुजली की काय असेही त्यांना वाटून गेले. यावर एक उपाय आहे, असे सल्लागाराने सांगताच त्यांचे कान टवकारले. आपण पक्षातर्फे पाच किलोमीटर धावण्याची अडथळा शर्यत घ्यायची. यात सर्व ५७ आमदारांना सामील व्हायला सांगायचे. यात बॅटन महत्त्वाचे असते. ठरावीक टप्प्यावर ते दुसऱ्याला सोपवावे लागते. हे कार्य जो प्रामाणिकपणे पार पाडेल त्यालाच मंत्रीपद द्यायचे. यामागचा हेतू हाच की आपल्या जवळचे दुसऱ्याला देण्याची तयारी कोण कोण दाखवतो ते ओळखणे. मात्र, तो या आमदारांना सांगायचाच नाही. पक्षाप्रति निष्ठा, सांघिकता दिसावी म्हणून ही शर्यत आहे असेच साऱ्यांना सांगायचे. ही भन्नाट कल्पना ऐकताच एकनाथरावांचे डोळे चमकले. त्यांनी लगेच फतवा काढला. सर्वांनी उद्या सकाळी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सकाळी सहाला जमायचे. आदेश मिळताच आमदार क्रीडावेशात पहाटे पाचलाच पोहोचले. हे नेमके कशासाठी अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली. तेवढ्यात वातकुक्कुट म्हणून प्रसिद्ध असलेल्या अब्दुलभाईंनी गेल्या कार्यकाळात मंत्री असलेल्या सगळ्यांच्या कानात काहीतरी सांगायला सुरुवात केली. काही इच्छुकांनी ते ऐकण्याचा प्रयत्न करताच त्यांना दूर ढकलण्यात आले. अपवाद फक्त शिरसाट व गोगावलेंचा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा