गुजरात माझा देश आहे, सारे गुजराती माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.. ‘व्हायब्रंट गुजरात’ या संमेलनात मुकेसभाईंनी एका दमात ही प्रतिज्ञा म्हटली आणि तमाम मराठी माणसांच्या मनावरचं एक ओझं कायमचं उतरलं. कारण ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..’ ही शाळेत शिकलेली प्रतिज्ञा मोठेपणी रोजच्या व्यवहारातदेखील आचरणात आणली पाहिजे, असा दंडकच सगळ्या देशाने मराठी माणसाला घालून दिला होता. महाराष्ट्रात, मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या गुजराती, उत्तर भारतीयांमुळे भूमिपुत्र म्हणून आपल्यावर अन्याय होतो अशी त्याने कुजबूज केली तरी लगेच सगळ्या देशाकडून त्याला प्रांतवादी ठरवलं जात होतं. पण आता देशातला सगळ्यात श्रीमंत माणूसच आपल्या प्रांताचा अभिमान बाळगणार असेल तर बाकीच्या मराठी, पंजाबी, बंगाली अशा  ‘गोरगरिबांना’ही आपापल्या अस्मितांच्या तलवारी परजायला काहीच हरकत नाही. बाकी गरिबांकडे त्याशिवाय असतंच काय म्हणा. नाही का? 

पण दुसरीकडे आपण, आपली कंपनी गुजराती असल्याचा, आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी गुजराती असल्याचा अभिमान बाळगणारे मुकेसभाई मुंबईत, अगदी दक्षिण मुंबईत आलिशान घरात राहतात. मुंबईजवळच असलेल्या नवी मुंबईत त्यांच्या  या ‘गुजराती’ कंपनीचं भलंमोठं कार्यालय आहे. त्यासाठीची जागा महाराष्ट्राचीच आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार मुंबई- महाराष्ट्रात झाला आहे. व्यवसायाचं सोडून द्या, त्यांनी अगदी आयपीएलची क्रिकेट टीमसुद्धा गुजरातची नाही, तर ‘मुंबई इंडियन्स’चीच विकत घेतली आहे. आणि तरीही त्यांना अभिमान मात्र गुजरातचा आहे हे गणित काही केल्या सोडवता येत नाही बुवा..

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
delhi high court slammed aap government over cag bjp criticizes after court comment
‘कॅग’वरून ‘आप’ सरकारवर ताशेरे ; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर भाजपची टीका
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

मुकेसभाईंची सगळी उत्पादनं समस्त भारत वापरत असताना त्यांना, देशाच्या सीमा ओलांडून आपण आंतरराष्ट्रीय व्हावं, जी ट्वेंटीमध्ये आपल्या देशाने ढोल वाजवले, त्याप्रमाणे वसुधैव कुटुम्बकम व्हावं असं न वाटता आपण गुज्जु असल्याचा अभिमान बाळगावा, असं बरं का वाटत असेल?

आणि असं विधान करताना मुकेसभाईंनी नरेंद्रभाईंशी चर्चा केली होती की नाही, ते काही समजत नाही. कारण एक देश, एक संस्कृती, एक देश एक भाषा असे नारे सुरू असताना मुकेसभाईंना त्यांची ओळख ते फक्त गुजरातचे अशी हवी असेल तर आपोआपच कुणीतरी महाराष्ट्राचा, कुणीतरी बंगालचा, कुणीतरी आंध्रचा असा वेगवेगळी ओळख ठरणार. मग एक देश एक संस्कृती या नाऱ्याचं काय करायचं?

‘काय करायचं म्हणजे काय.. सगळ्या देशाची ओळखच गुजरात अशी करायची आहे.. तोच एक देश, तीच एक संस्कृती.. हे माहीत नाही की काय?’

तिकडे दूर कोपऱ्यात कोण बरं पुटपुटतंय हे?

Story img Loader