गुजरात माझा देश आहे, सारे गुजराती माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.. ‘व्हायब्रंट गुजरात’ या संमेलनात मुकेसभाईंनी एका दमात ही प्रतिज्ञा म्हटली आणि तमाम मराठी माणसांच्या मनावरचं एक ओझं कायमचं उतरलं. कारण ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..’ ही शाळेत शिकलेली प्रतिज्ञा मोठेपणी रोजच्या व्यवहारातदेखील आचरणात आणली पाहिजे, असा दंडकच सगळ्या देशाने मराठी माणसाला घालून दिला होता. महाराष्ट्रात, मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या गुजराती, उत्तर भारतीयांमुळे भूमिपुत्र म्हणून आपल्यावर अन्याय होतो अशी त्याने कुजबूज केली तरी लगेच सगळ्या देशाकडून त्याला प्रांतवादी ठरवलं जात होतं. पण आता देशातला सगळ्यात श्रीमंत माणूसच आपल्या प्रांताचा अभिमान बाळगणार असेल तर बाकीच्या मराठी, पंजाबी, बंगाली अशा ‘गोरगरिबांना’ही आपापल्या अस्मितांच्या तलवारी परजायला काहीच हरकत नाही. बाकी गरिबांकडे त्याशिवाय असतंच काय म्हणा. नाही का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा