उंची वाढण्यासाठी कुणी सायकल चालवतं तर कुणी आनुवंशिकतेवर भिस्त ठेवतं. पण हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांचा मात्र वेगळाच दावा आहे. त्यांच्या मते मोदी सरकारने घरोघरी पाणी आणि गॅसची व्यवस्था केल्यामुळे या सरकारच्या कार्यकाळात महिलांची उंची दोन दोन इंचाने वाढली आहे. त्यांच्या या दाव्यानंतर तो खोटा आहे हे सांगायला वैज्ञानिकांनी पुढे यायला हवं होतं. पण ते राहिलं बाजूला, उलट देशातल्या सगळय़ा बुटक्या पुरुषांची हरियाणाच्या दिशेने रांग लागली आहे म्हणे. या सर्वाचं म्हणणं असं आहे की, रोजच्या जगण्यात आम्हीही महिलांसारखेच काबाडकष्ट करतो. मग उंची वाढण्याच्या बाबतीत मोदी सरकारने स्त्री-पुरुष असा भेदभाव का करावा? आणि तो फक्त हरियाणापुरताच का असावा? आम्हालाही दोन दोन इंच उंची वाढवून हवी आहे..

सरकार उंची वाढवून देतं आहे म्हटल्यावर वजन कमी करण्यासाठी घाम गाळणाऱ्या आणि सतत डाएट करावं लागणाऱ्या स्थूल महिलाही पुढे सरसावल्या आहेत. कमी उंची असलेल्या महिलांना हे सरकार न्याय देतं आहे आणि त्यांची उंची दोन दोन इंचाने वाढवून देतं आहे ही चांगलीच गोष्ट आहे. पण मग आमच्यासारख्या स्थूल महिलांवर होणाऱ्या अन्यायाकडेही या सरकारने लक्ष द्यावं आणि आमचंही दोन दोन किलो वजन कमी करून द्यावं अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. त्यांचा हा पुढाकार बघून स्थूल पुरुषही पुढे सरसावले आहेत आणि त्यांनीही सरकारने आमचं दोन दोन किलो वजन कमी करून द्यावं अशी मागणी केली आहे. याउलट, सरकारनंच आमचं वजन वाढवून द्यावं, अशी मागणी करणाऱ्यांचीही रीघ हरियाणाकडे लागली आहे म्हणतात.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!

आपला रंग कसा असेल हे कुणाच्याच हातात नसतं, पण गोऱ्या रंगवाल्यांच्या वलयापुढे आपण कुणालाच दिसत नाही, ही खंत घेऊन जगणाऱ्या सावळय़ा, कृष्णवर्णीय लोकांच्या मनामध्येदेखील आपला रंग बदलण्याची क्षमता मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आहे, अशी आस निर्माण झाली आहे. जो उंची वाढवू शकतो तो रंग का बदलू शकत नाही, असा बिनतोड सवाल घेऊन ते काही वर्तमानपत्रवाल्यांना भेटलेत आणि टीव्ही वाहिन्यांवर या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांनी दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे, असे समजते.

या सगळय़ा रांगा, मागण्या आणि त्यांचा जोर बघून भांबावलेले पत्रकार आणखी एका रांगेचा शोध घेत आहेत. पण ‘बुद्धी वाढवून मिळेल का?’ अशी मागणी करणाऱ्या रांगेत एकही जण नाही, असे कळते.

Story img Loader