आपल्याकडे शरद तळवलकर, राजा गोसावी, दादा कोंडके, सुहास भालेकर, राजा मयेकर, अशोक सराफ, विजय चव्हाण, सुधीर जोशी, प्रशांत दामले, भरत जाधव ते अगदी अलीकडच्या काळात वैभव मांगले, संतोष पवार, मकरंद अनासपुरे, भाऊ कदम, भारत गणेशपुरेपर्यंत विनोदी नटांचे अगदी मायंदाळ पीक कलाक्षेत्रात आलेले दिसते. त्यातही या प्रत्येकाची खासीयतही न्यारी. कुणी वाचिक अभिनयातून, तर कुणी देहबोलीतून, तर कुणी आपल्या हजरजबाबीपणाने विनोदाचे गारूड निर्माण करणारे. मुंबईच्या गिरणगावातून यातले अनेक कलाकार घडले. त्यात विजय कदम हे नावदेखील प्रकर्षाने घ्यावे लागेल. शिरोडकर हायस्कूलमध्ये जाताना वाटेत दिसणाऱ्या भिन्न भिन्न वृत्ती-प्रवृत्तीच्या नमुनेदार माणसांच्या गमती स्वत: अनुभवताना त्यांच्या नकला करायची सवयही त्यांना लागली. अशा चुणचुणीत, हरहुन्नरी मुलाकडे सर्वांचे लक्ष साहजिकच जाते. त्यामुळे शाळेत नकला आणि बालनाट्यापासूनच विजय कदम यांचे रंगमंचावर पदार्पण झाले नसते तरच नवल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा