साधारणत: २०१९ मध्ये डेमी मूर या अभिनेत्रीचे ‘इनसाइड आऊट’ नामक आत्मचरित्र आले, तेव्हा हॉलीवूडच्या सेलिब्रिटी विश्वामधून तिला बाद होण्याचे डोहाळे लागल्याच्या चर्चा फिरू लागल्या होत्या. या वर्षी एका औषध कंपन्यांसाठी तिने शरीराचे अपचन आणि वायुविजनाचा संबंध सांगणारा व्हिडीओदेखील सादर केला. तर एकाच साठच्या दशकात जन्मलेल्या आणि नव्वदीचे दशक गाजवून सोडणाऱ्या निकोल किडमन, टिल्डा स्विण्टन, पामेला अॅण्डरसन आणि डेमी मूर या साठीपारच्या सुपरिचित ललना मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या सिनेमांतून नव्याने गाजाव्यात हा या वर्षातील विशेष योग. पैकी ‘गोल्डन ग्लोब’च्या ‘कॉमेडी अथवा म्युझिकल’ गटात डेमी मूरने बासष्टाव्या वर्षी आपले पहिले पारितोषिक पटकावून आपली कर्तुकी सिद्ध केली.

ऑस्कर पुरस्कारांसाठीचे रंगीत तालमी वातावरण तयार करणारा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार रविवारी झाला. त्यात डेमी मूर पुरस्कारासह आपल्या मनखेचक भाषणानेदेखील झळाळून निघाली. ‘सबस्टन्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला पारितोषिक मिळाले. एका लोकप्रिय फिटनेस टीव्ही शोमधील प्रमुख नाव असलेली व्यक्ती वाढत्या वयामुळे काढली जाण्याच्या मार्गावर असते. एका अवघड औषधाचा वापर करून आपले तरुण रूप तयार करते, अशी शरीरभयाची कहाणी असलेल्या ‘सबस्टन्स’ चित्रपटाचे गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड कौतुक होत आहे ते त्यांतील मार्गारेट क्वाली आणि डेमी मूर यांनी वठवलेल्या भूमिकांमुळे.

Loksatta editorial on Rivalry in many districts for the post of Guardian Minister Cabinet
अग्रलेख: मारक पालक नकोत!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन

डेमी मूर हे नाव सिनेमासाठी अमेरिकेतर लोकांच्या लक्षात केवळ ‘घोस्ट’ या चित्रपटासाठी राहिले. ‘स्टार मूव्हीज’ने एकेकाळी भारतात ‘स्ट्रिपटीज’ या सिनेमाचा दैनंदिन रतीब लावला, त्यामुळे अधिक खोलात ती इथल्या प्रेक्षकांना कळली. या चित्रपटासाठी तब्बल सव्वा कोटी डॉलर इतके (त्या काळातील सर्वाधिक) मानधन तिने घेतले होते.

सोळाव्या वर्षी हॉलीवूडच्या एका निर्मितीसंस्थेत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी ही तल्लखबुद्धी ललना पहिल्या संगीतकार पतीसह गाणी वगैरे लिहून गायिका बनण्याच्या वाटेवर होती. मग टीव्ही मालिका नंतर ‘ब्लेम इट ऑन रिओ’ हा मूकपट करून पाहिला तरी गोष्ट कळेलसा चित्रपट, त्यानंतर हॉलीवूडच्या मुख्य धारेत तिचा प्रवास सुरू झाला. एका निर्मात्याने आपल्याला ‘पॉपकॉर्न गर्ल’ हे शिवीयुक्त बिरुद दिल्याची आठवण गोल्डन ग्लोब पटकावताना सांगत स्वत:च्या क्षमतेबद्दलचे गणित उलगडून सांगितले.

ब्रूस विलीसशी केलेल्या लग्नातून आलेल्या मातृत्वाची ग्लॉसी मासिक मुखपृष्ठे, मी-टू मोहीम काळात पंधराव्या वर्षी झालेल्या बलात्काराची वाच्यता, तिसऱ्या लग्नाची टॅब्लॉइडवृत्ते असा बराच अभिनयबाह्य कारभार करून पुन्हा अभिनयपथावर ही अभिनेत्री पोहोचली आहे. त्यामुळे ती भावी मेरिल स्ट्रीप बनते का, हे याच दशकाअखेरपर्यंत ठरणार आहे.

Story img Loader