साठच्या दशकातील हॉलीवूड मदनिकांमध्ये इटली, फ्रान्स, ब्रिटन आदी युरोपीय आयात संख्येने बरीच राहिली. आजच्या जमान्यातही ‘आयएमडीबी’च्या ठोकताळ्यांनुसार त्या दशकात परमोच्च सौंदर्याच्या खाणीत पहिला क्रमांक लागतो, तो ‘वन्स अपॉन अ टाइम इन वेस्ट’ चित्रपटातील इटलीच्या क्लाऊडिया कार्डिनल हिचा. दुसरा ‘ज्यूल्स अॅण्ड जिम’मधील फ्रेंच ललना झान मॉरो हिचा आणि तिसरा फ्रेडरिको फेलीनींच्या ‘एट हाफ’ चित्रपटातील फ्रेंचच असलेल्या अनूक एमी यांचा. कोण ही अनूक एमी, तर ‘फ्रेंच न्यू वेव्ह’ ऐन बहरात असणाऱ्या काळात ‘अ मॅन अॅण्ड अ वुमन’ या सिनेमासाठी ऑस्करचे नामांकन मिळविणारी पहिली फ्रेंच मदन्तिका! २०१९ पर्यंत ती चित्रपटांत झळकत होती. साठ-सत्तरच्या जगात सध्या-आनंदी वृत्तपत्रांना गॉसिप-गठ्ठा वृत्त पुरवीत होती. आपल्याकडच्या संतुरी-सौंदर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिमी गरेवाल यांचा चेहरा किंचितचा पसरट केला, तर तो तंतोतंत अनूक एमी यांच्यासारखा भासेल. चित्रपटात येण्याआधीचे त्यांचे आयुष्यही चित्रकथेसारखे धाडसयोगांनी भरलेले होते. पॅरिसमध्ये चित्रपट कलाकार दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या अनूक एमी दुसऱ्या महयुद्ध काळात नाझींच्या तावडीतून बचावलेल्या आहेत.

कॅथलिक म्हणून वाढल्या असल्या तरी ज्यू वडिलांमुळे हिटलरच्या फौजांनी त्यांच्या घरावर मोर्चा वळविला. सुरक्षेसाठी आई-वडिलांनी मग अनूकची रवानगी गावाकडे केली. तेथे त्यांनी नृत्य आणि अभिनयाचे शिक्षण घेऊन रंगभूमीकडे वाटचाल केली. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना पहिला चित्रपट मिळाला. पण अपुरा राहिल्याने तो पडद्यावर येऊ शकला नाही. काही वर्षांत त्यांची ओळख फ्रेडरिको फेलीनी यांच्याशी झाली. त्यातून मग ‘डोल्चे विटा’ (१९६०) आणि ‘एट हाफ’(१९६३) या फेलेनी यांच्या चित्रपटांत त्यांच्या भूमिका झळकल्या. ‘लोला’ (१९६१) चित्रपटातील कॅब्रे डान्सर आणि ‘अ मॅन अॅण्ड अ वूमन’ या सिनेमातील प्रेमळपूर्ण तरुणी या भूमिकांनी तत्कालीन घायाळप्रवण नेत्रचूषकांना बराच माल-मसाला पुरवला. ‘मला बिलकूल अभिनेत्री व्हायचे नव्हते. पण नृत्यांगना बनण्याची महत्त्वाकांक्षा मी बाळगून होते.’ हे एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे. साठच्या दशकात केवळ एकाच सिनेमात पुरेपूर नृत्यसंधी मिळाली असली, तरी पुढल्या काळात त्यांनी आपल्या तालावर अनेक कलावंत, सेलिब्रेटी यांना नाचायला लावले. सत्तरच्या दशकापर्यंत चार लग्ने आणि कैक प्रेमप्रकरणे यांनी त्यांच्यातील ‘लावण्यवती’ ही प्रतिमा वृद्धिंगत केली. वयाच्या सत्तरीमधील त्यांची छायाचित्रे आणि सिनेमांतील अभिनय पाहिला, तर या संतुरीसौंदर्याला वृद्धत्व कधी लाभणारच नाही, असा भ्रम नक्कीच तयार होईल. त्यामुळे परवा निधन झाले, तेव्हाही वय ९२ वर्षे असल्याचे अनेकांना खरे वाटले नाही!

star pravah new serial tu hi re maza mitwa starring sharvari jog and Abhijit amkar
नव्या मालिकांची मांदियाळी! ‘स्टार प्रवाह’वर पुनरागमन करतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, जाहीर केली मालिकेची वेळ अन् तारीख…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nagma actress link up with three married celebrities
तीन विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली होती ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री; बॉलीवूडसह दक्षिणेत केलेत अनेक सुपरहिट सिनेमे
raveena tandon 8 movies hit in a year
‘या’ अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर साफ केला कचरा, पहिलाच सिनेमा झाला फ्लॉप; नंतर एकाच वर्षात दिले आठ सुपरहिट सिनेमे
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी