साठच्या दशकातील हॉलीवूड मदनिकांमध्ये इटली, फ्रान्स, ब्रिटन आदी युरोपीय आयात संख्येने बरीच राहिली. आजच्या जमान्यातही ‘आयएमडीबी’च्या ठोकताळ्यांनुसार त्या दशकात परमोच्च सौंदर्याच्या खाणीत पहिला क्रमांक लागतो, तो ‘वन्स अपॉन अ टाइम इन वेस्ट’ चित्रपटातील इटलीच्या क्लाऊडिया कार्डिनल हिचा. दुसरा ‘ज्यूल्स अॅण्ड जिम’मधील फ्रेंच ललना झान मॉरो हिचा आणि तिसरा फ्रेडरिको फेलीनींच्या ‘एट हाफ’ चित्रपटातील फ्रेंचच असलेल्या अनूक एमी यांचा. कोण ही अनूक एमी, तर ‘फ्रेंच न्यू वेव्ह’ ऐन बहरात असणाऱ्या काळात ‘अ मॅन अॅण्ड अ वुमन’ या सिनेमासाठी ऑस्करचे नामांकन मिळविणारी पहिली फ्रेंच मदन्तिका! २०१९ पर्यंत ती चित्रपटांत झळकत होती. साठ-सत्तरच्या जगात सध्या-आनंदी वृत्तपत्रांना गॉसिप-गठ्ठा वृत्त पुरवीत होती. आपल्याकडच्या संतुरी-सौंदर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिमी गरेवाल यांचा चेहरा किंचितचा पसरट केला, तर तो तंतोतंत अनूक एमी यांच्यासारखा भासेल. चित्रपटात येण्याआधीचे त्यांचे आयुष्यही चित्रकथेसारखे धाडसयोगांनी भरलेले होते. पॅरिसमध्ये चित्रपट कलाकार दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या अनूक एमी दुसऱ्या महयुद्ध काळात नाझींच्या तावडीतून बचावलेल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा