मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अद्याप मिळालेला नसला, तरी मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वाला जाण्याच्या टप्प्यावर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे होणाऱ्या मराठी भाषा विद्यापीठासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. अविनाश आवलगावकर यांची पहिले कुलगुरू म्हणून निवड केली आहे.

राज्य सरकारने डिसेंबर २०२३मध्ये मराठी भाषा विद्यापीठाला मंजुरी दिली. त्यानंतर विद्यापीठाच्या स्थापनेसाठी नेमलेल्या साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्येही डॉ. अविनाश आवलगावकर यांचा समावेश होता. आता एक वर्ष किंवा कुलपतींकडून नियमित कुलगुरूंची निवड होईपर्यंत डॉ. आवलगावकर कुलगुरुपदी राहणार आहेत. आवलगावकर यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातीलच आहे. डॉ. आवलगावकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सुवर्णपदक पटकाविले होते, तर एम. फिल. अभ्यासक्रमात ते विद्यापीठात पहिले आले होते. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात अध्यापन केले. विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी निभावली. साहित्यविचार आणि समीक्षा, मध्ययुगीन साहित्य, लोकसाहित्य हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. अध्यापनासह त्यांनी विपुल ग्रंथनिर्मितीही केली. ‘किलबिल’, ‘सांजबावरी’ हे काव्यसंग्रह, ‘श्री गोविंदप्रभूंविषयक साहित्य : शोध आणि समीक्षा’, ‘वि. स. खांडेकरांची कविता’, ‘वि. स. खांडेकरांचे साहित्य : एक आकलन’, ‘मराठी साहित्य : संशोधनाच्या नव्या दिशा’, ‘महानुभाव साहित्य : शोधसंचार’ अशी विविध पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ‘मराठीचे भवितव्य’, ‘लीळाचरित्र – संशोधन आणि समीक्षा’ अशा पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
cultural and educational rights under indian constitution article 29 and 30
संविधानभान : भाषेचा मायाळू विसावा
article pay tribute to world renowned mridangam scholar varadarao kamalakara rao
व्यक्तिवेध : व्ही. कमलाकर राव
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज

डॉ. आवलगावकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दीर्घकाळ काम केले असल्याने त्यांना विद्यापीठीय रचनेत काम करण्याचा अनुभव आहे. आता कुलगुरू म्हणून त्यांना मिळालेली संधी मराठी भाषा, साहित्याचे अभ्यासक म्हणून महत्त्वाची आहेच, त्याशिवाय मराठी भाषेला दिशा देणारे काम करण्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे.

विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचे विभाग पूर्वीपासून आहेत. मात्र, मराठी भाषेचे विद्यापीठ म्हणून वेगळ्या, नावीन्यपूर्ण, रोजगारक्षम अभ्यासक्रमांची निर्मिती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला असल्याने त्या दृष्टीने विद्यापीठ काय करू शकेल, याचा पथदर्शी आराखडा तयार करणे अशी कामे त्यांना करावी लागणार आहेत. त्यामुळे मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून झालेली निवड ही गौरवाची आणि जबाबदारीचीही ठरणार आहे.