क्रिकेटचे कर्कश व्यावसायिकीकरण होण्याच्या आधीच्या काळात फारुख इंजिनीयर यांची कारकीर्द फुलली आणि खुलली. हल्लीच्या प्राधान्याने फ्रँचायझी क्रिकेटच्या जमान्यात फलंदाज-यष्टिरक्षक या जमातीला बरकत आलेली दिसते. पण फारुख इंजिनीयर यांच्यासारख्यांनी त्या स्वरूपाचा खेळ १९६०-१९७०च्या दशकात करून दाखवला. एका अर्थी गिलख्रिस्ट-धोनी यांच्यासारख्यांचे ते पूर्वज. उत्तम यष्टिरक्षक होते आणि आक्रमक फलंदाजीही करायचे. १९६७मध्ये त्यावेळच्या मद्रासमधील कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी उपाहारापर्यंत पहिल्याच सत्रात नाबाद ९४ धावा चोपल्या. ‘बॅझबॉल’ वगैरे खूळ मूळ धरू लागल्याच्या काही दशके आधीचा तो काळ. तेही हॉल, ग्रिफिथ, सोबर्स आणि गिब्ज यांच्या माऱ्यासमोर. त्या डावात त्यांनी शतकही पूर्ण केले. जिंकण्यापेक्षाही क्रिकेट आस्वादणे हे त्यावेळी अधिक महत्त्वाचे मानले जात असे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा