शांततेचे नोबेल पारितोषिक कुणा व्यक्तीला न देता जपानमधल्या अणुबॉम्ब-बाधितांनी अणुसंहाराला विरोध करण्यासाठी स्थापलेल्या ‘निहॉन हिदान्क्यो’ या संस्थेला यंदा देण्यात आले, ही संस्थादेखील अशी की तिला कुणी एक अध्यक्षच नाही. चौघे बुजुर्ग लोक या ‘निहॉन हिदान्क्यो’चे अध्यक्ष. पण प्रत्यक्ष नोबेल पारितोषिक सोहळा गेल्याच आठवड्यात झाला. त्यातले ‘नोबेल व्याख्यान’ तेरुमी तनाका यांनी दिल्यामुळे या संस्थेतलेच नव्हे तर अणुसंहार- विरोधाच्या क्षेत्रातले त्यांचे मोठेपण अधोरेखित झाले. तनाका हे या संस्थेमध्ये स्थापनेपासून कार्यरत आहेत आणि गेली काही वर्षे ते या संस्थेच्या चौघा सह-अध्यक्षांपैकी आहेत. कुणाही व्यक्तीचा बडिवार माजवायचा नाही (आणि साऱ्या जिवांना समान मानायचे), अशा विचाराने चालणाऱ्या या संस्थेत जरी नेतेपद त्यांच्याकडे नसले, तरी त्यांचा अधिकार अशा प्रकारे मान्य झाला. ‘नोबेल’च्या निमित्ताने पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांना (अगदी ‘बीबीसी’च्या ‘हार्ड टॉक’लासुद्धा) तनाका यांनीच मुलाखती दिल्या. वयाच्या ९२ व्या वर्षी ठामपणे बोलणारे, अणूच्या संहारक वापराबद्दलच नव्हे तर पुरेशा काळजीविना उभारलेल्या अणुवीज भट्ट्यांनाही आक्षेप घेणारे तनाका या मुलाखतींतूनही लक्षात राहातील… त्याहीपेक्षा लक्षात राहील तो, हे आग्रही- काहीसे टोकाचेच- विचार मांडतानाचा त्यांचा सच्चेपणा.

हा सच्चेपणा चेहऱ्यावर दिसतो, पण तोंडदेखला नाही. स्वत: अणुबॉम्बची झळ सोसल्यामुळे तो आलेला आहे. जपानमध्ये अणुबॉम्ब-बाधितांना ‘हिबाकुशा’ म्हणतात. आज जिवंत असलेले सगळे हिबाकुशा हे लहानपणीच तो संहार सोसावा लागलेले. नागासाकीतले तेरुमी तनाकाही साडेबारा वर्षांचे होते. मुळात इथे आले होते नातेवाईकांकडून सांभाळ व्हावा म्हणून. पण सगळेच नातेवाईक त्या संहारात गेले. सरकारने अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला, तनाका इंजिनीअर झाले, अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवू लागले. पण अमेरिकेने दोन शहरांमधल्या निरपराध रहिवाशांना होत्याचे नव्हते करणारा हल्ला घडवला- तोही केवळ ताकद दाखवून देण्यासाठी- ही जखम तरुणपणी भळभळत होती. त्यातूनच ऑगस्ट १९५६ मध्ये ‘निहॉन हिदान्क्यो’ स्थापन झाली. तिला जपानभरातून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. विशेषत: तेरुमी तनाकांसह अन्य अनेकांनी केेलेली ‘अमेरिकेने माफी मागून भरपाई द्यावी’ ही मागणीही अनेकांना पटू लागली, तेव्हाच नेमका या संस्थेविरुद्ध, ‘हे डावे आहेत, यांना कम्युनिस्टांची फूस आहे’ असा प्रचार सुरू झाला आणि लगोलग एक प्रति-संस्थाही अमेरिकी आशीर्वादाने उभी राहिली. अखेर बराक ओबामा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या भाषणाचे खास निमंत्रण ‘निहॉन हिदान्क्यो’ला आले. आता ‘नोबेल’देखील मिळाल्याने तेरुमी तनाकांच्या- आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या- निष्ठेवरही शिक्कामोर्तब झाले आहे.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
lokmanas
लोकमानस: उद्याोग हवे तर अणुऊर्जा अपरिहार्य
Story img Loader