शांततेचे नोबेल पारितोषिक कुणा व्यक्तीला न देता जपानमधल्या अणुबॉम्ब-बाधितांनी अणुसंहाराला विरोध करण्यासाठी स्थापलेल्या ‘निहॉन हिदान्क्यो’ या संस्थेला यंदा देण्यात आले, ही संस्थादेखील अशी की तिला कुणी एक अध्यक्षच नाही. चौघे बुजुर्ग लोक या ‘निहॉन हिदान्क्यो’चे अध्यक्ष. पण प्रत्यक्ष नोबेल पारितोषिक सोहळा गेल्याच आठवड्यात झाला. त्यातले ‘नोबेल व्याख्यान’ तेरुमी तनाका यांनी दिल्यामुळे या संस्थेतलेच नव्हे तर अणुसंहार- विरोधाच्या क्षेत्रातले त्यांचे मोठेपण अधोरेखित झाले. तनाका हे या संस्थेमध्ये स्थापनेपासून कार्यरत आहेत आणि गेली काही वर्षे ते या संस्थेच्या चौघा सह-अध्यक्षांपैकी आहेत. कुणाही व्यक्तीचा बडिवार माजवायचा नाही (आणि साऱ्या जिवांना समान मानायचे), अशा विचाराने चालणाऱ्या या संस्थेत जरी नेतेपद त्यांच्याकडे नसले, तरी त्यांचा अधिकार अशा प्रकारे मान्य झाला. ‘नोबेल’च्या निमित्ताने पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांना (अगदी ‘बीबीसी’च्या ‘हार्ड टॉक’लासुद्धा) तनाका यांनीच मुलाखती दिल्या. वयाच्या ९२ व्या वर्षी ठामपणे बोलणारे, अणूच्या संहारक वापराबद्दलच नव्हे तर पुरेशा काळजीविना उभारलेल्या अणुवीज भट्ट्यांनाही आक्षेप घेणारे तनाका या मुलाखतींतूनही लक्षात राहातील… त्याहीपेक्षा लक्षात राहील तो, हे आग्रही- काहीसे टोकाचेच- विचार मांडतानाचा त्यांचा सच्चेपणा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा